दिनविशेष : ४ डिसेंबर [भारतीय नौसेना दिन]

194

४ डिसेंबर  : जन्म

१८३५: इंग्लिश लेखक सॅम्युअल बटलर यांचा जन्म. (मृत्यू: १८ जून १९०२)

१८५२: रशियन भौतिकशास्त्रज्ञ ओरेस्ट ख्वोल्सन यांचा जन्म.

१८६१: आइसलँड देशाचे पहिले पंतप्रधान हंगेस हफस्टाइन यांचा जन्म. (मृत्यू: १३ डिसेंबर १९२२)

१८९२: स्पेनचा हुकुमशहा फ्रान्सिस्को फ्रँको यांचा जन्म.

१९१०: भारताचे माजी राष्ट्रपती आर. व्यंकटरमण यांचा जन्म. (मृत्यू: २७ जानेवारी २००९)

१९१०: आपल्या ऐटबाज व्यक्तिमत्त्वाने व सहजसुंदर अभिनयाने रसिकांवर मोहिनी घालणारे अभिनेते मोतीलाल राजवंश ऊर्फ मोतीलाल यांचा जन्म. (मृत्यू: १७ जून १९६५)

१९१६: पंजाबी नाटककार, दिग्दर्शक, कादंबरीकार व लघुकथाकार, पंजाब विद्यापीठातील भारतीय रंगभूमी विभागाचे प्रमुख बळवंत गार्गी यांचा जन्म. (मृत्यू: २२ एप्रिल २००३ – मुंबई)

१९१९: भारताचे माजी पंतप्रधान इंद्रकुमार गुजराल यांचा जन्म.

१९३२: दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष रोह तै-वू यांचा जन्म.

१९३५: पंडित विष्णू दिगंबर पलुसकर यांच्या परंपरेतील गायक शंकर काशिनाथ बोडस यांचा जन्म. (मृत्यू: २० जुलै १९९५)

१९४३: मराठी लेखक कॅथोलिक ख्रिस्ती फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचा जन्म.

१९७७: भारतीय क्रिकेटर अजित आगरकर यांचा जन्म.

४ डिसेंबर : मृत्यू

१८५०: विद्युत मोटरचे शोधक विल्यम स्टर्जन यांचे निधन. (जन्म: २२ मे १७८३)

१९०२: डो जोन्स एंड कंपनी चे सहसंस्थापक चार्ल्स डो यांचे निधन. (जन्म: ६ नोव्हेंबर १८५१)

११३१: पर्शियन तत्त्वज्ञ, गणितज्ञ, खगोलशास्त्रज्ञ आणि कवी ओमर खय्याम यांचे निधन. (जन्म: १८ मे १०४८)

१९७३: कवी गिरीश तथा शंकर केशव कानेटकर यांचे निधन. (जन्म: २८ ऑक्टोबर १८९३)

१९७५: जर्मन तत्त्वज्ञ आणि लेखक हाना आरेंट यांचे निधन.

१९८१: मराठी चित्रकार ज. ड. गोंधळेकर यांचे निधन.

२०००: सुरिनाम प्रजासत्ताकचे पहिले पंतप्रधान हेन्क अर्रोन यांचे निधन. (जन्म: २५ एप्रिल १९३६)

२०१४: भारतीय वकील आणि न्यायाधीश व्ही. आर. कृष्ण अय्यर यांचे निधन. (जन्म: १५ नोव्हेंबर १९१५)

४ डिसेंबर : महत्वाच्या घटना

१७९१: द ऑब्जर्व्हर हे जगातील पहिले रविवार वृत्तपत्र प्रकाशित झाले.

१८२९: भारतीयांचा कट्टर विरोध असूनही लॉर्ड बेंटिंगने जाहीरनामा काढून सतीच्या प्रथेला मदत करणाऱ्यांना खुनी ठरवले जाईल असा कायदा केला. तसेच सतीप्रथा बंद केली.

१८८१: लॉस ऍन्जेलिस टाइम्स वृत्तपत्राचा पहिला अंक प्रकाशित झाला.

१९२४:  गेट वे ऑफ इंडिया या वास्तूचे व्हाईसराय लॉर्ड रीडिंग यांच्या हस्ते उद्घाटन.

१९६७: थुंबा येथील तळावरुन रोहिणी या पहिल्या भारतीय अग्निबाणाचे यशस्वी उड्डाण.

१९४८: भारतीय लष्कराचे सरसेनापती म्हणून जनरल करिअप्पा यांची नेमणूक झाली.

१९७१: भारत पाकिस्तान तिसरे युद्ध-ऑपरेशन ट्रायडेंट भारतीय आरमाराने कराची वर हल्ला केला.

१९७५: सुरीनामचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश.

१९९१: पॅन अ‍ॅम या अमेरिकन विमानकंपनीने दिवाळखोरी जाहीर केली.

१९९३: उस्ताद झिया फरिदुद्दीन डागर आणि पंडित एस. सी. आर. भट यांना मध्यप्रदेश सरकारचा तानसेन सन्मान जाहीर.

१९९७: संगीत दिग्दर्शक कल्याणजी-आनंदजी यांना मध्यप्रदेश सरकारचा लता मंगेशकर पुरस्कार प्रदान.

 

 

 

निमित्त हार्दिक शुभेच्छा !!!

 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Join Us on Telegram

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

 

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम