चालू घडामोडी : 06 फेब्रुवारी 2020

113

चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाईट ला रोज भेट द्या.

Visit Regularly our site to check Current Affairs

Current Affairs : 06 Februar 2020 | चालू घडामोडी : 06 फेब्रुवारी 2020

चालू घडामोडी – देशातील सर्वात मोठे बंदर महाराष्ट्रात उभारणार; केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी!

  • जेएनपीटी आणि मुंद्रा ही देशातील सर्वात मोठी कंटेनर हाताळणारी बंदरे (केवळ मध्यम आकाराच्या कंटेनर जहाजांसाठी) असून तिथे अनुक्रमे 15 M आणि 16 M चे ड्राफ्ट आहेत, तर जगातील सर्वात मोठी कंटेनर हाताळण्यासाठी 18M-20M चे आधुनिक खोल ड्राफ्ट पोर्ट्स आवश्यक आहेत.
  • डहाणूजवळील वाढवण येथे बंदर उभारायला तत्वत: मंजुरी देण्यात आली आहे. हे बंदर ‘लँड लॉर्ड मॉडेल’च्या धर्तीवर विकसित केले जाईल. प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यासाठी जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी) सह 50% किंवा त्याहून अधिक इक्विटी भागीदारीसह प्रमुख भागीदार म्हणून ‘स्पेशल पर्पज व्हेईकल’ (एसपीव्ही)ची स्थापना केली जाईल, अशी माहितीही यावेळी देण्यात आली.
  • एसपीव्ही बंदरासाठी पायाभूत सुविधा विकसित करेल, यामध्ये रिक्लेमेशन अर्थात भराव टाकून भूखंड तयार करणे, ब्रेक वॉटरचे बांधकाम तसेच किनाऱ्याच्या मागील भागात संपर्क सुविधा उभारणे इत्यादींचा समावेश असेल.

# Current Affairs


चालू घडामोडी –  रपो दर ‘जैसे थे’! रिझर्व्ह बँकेचे आर्थिक पतधोरण जाहीर

  •  आरबीआयने आर्थिक वर्षात (2020-21) विकास दर 6 टक्के राहील असा अंदाज वर्तवला आहे.
  • रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) गुरुवारी दुपारी आर्थिक पतधोरण जाहीर करताना व्याज दरात कोणताही बदल केलेला नाही. आरबीआयने रेपो तसेच रिव्हर्स रेपो दर कायम ठेवले आहे. त्यामुळे कर्जदारांना किंवा नवीन कर्ज घेण्याच्या तयारीत असणाऱ्या ग्राहकांना स्वस्त कर्जासाठी अजून वाट पाहावी लागणार आहे. तसेच, रेपो दर जैशे थेच ठेवल्यामुळे शेअर बाजारात निराशाचे वातावरण असल्याची शक्यता आहे.
  •  आरबीआयने रेपो दर ५.१५ टक्के तर, रिव्हर्स रेपो दर ४.९०% टक्के कायम ठेवला. तर सीआरआर 4 टक्के आणि एसएलआर 18.5 टक्के इतका ठेवला आहे. याशिवाय, आरबीआयने आर्थिक वर्षात (2020-21) विकास दर 6 टक्के राहील असा अंदाज वर्तवला आहे. दरम्यान, रिझर्व्ह बॅंकेने डिसेंबरमधील पतधोरणाआधी सलग पाचवेळा बँकेने रेपो दरात कपात केली होती. मात्र, बँकांनी व्याजदर कपातीला फारसा प्रतिसाद दिला नाही.

 काय असतो रेपो रेट ?

  • रेपो रेट म्हणजे ज्या दराने बँका रिझर्व बँकेकडून अल्पमुदतीची कर्जे घेते तो दर. रेपो रेट वाढणं म्हणजे बँकांना रिझर्व बँकेकडून मिळणाऱ्या कर्जदरात वाढ होणं, तर रेपो रेट कमी होणं म्हणजे बँकेला स्वस्तात कर्ज मिळणं. म्हणजेच आरबीआयने रेपो रेट वाढवला तर पर्यायाने सर्व बँकांना ग्राहकांना द्यावयाची कर्जाचे दरही वाढवावे लागतात. तर हा दर कमी झाल्याने व्याज दर कमी होतो

# Current Affairs


चालू घडामोडी –  सलग तिसऱ्या वर्षी विराट ब्रँड व्हॅल्यूत अव्वल स्थानी

  •  क्रिकेट जगात अव्वल स्थानावर असलेला भारताचा कर्णधार विराट कोहलीने टॉप सेलिब्रेटींच्या ब्रँड व्हॅल्यूतदेखील अव्वल स्थान मिळवले आहे. विशेष म्हणजे विराटने सलग तिसऱया वषी पहिले स्थान मिळवले आहे. विराटची ब्रँड व्हॅल्यू 237 कोटी रुपये आहे.
  •  दरम्यान, रोहित आणि सचिन तेंडूलकरपेक्षा विराट कोहलीची ब्रँड व्हॅल्यू दहापटीने जास्त आहे. उप कर्णधार रोहित शर्माची ब्रँड व्हॅल्यू 164 कोटी रूपये तर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची ब्रँड व्हॅल्यू 179 कोटी रूपये आहे.
  •  विराट कोहलीने शाहरुख खान, सलमान खान, अक्षय कुमार, दीपिका पादुकोण, रणबीर सिंह, यासारख्या आघाडीच्या कलाकारांना मागे टाकले आहे.

# Current Affairs


चालू घडामोडी –  सॉइल हेल्थ कार्डमुळे रासायनिक खतांचा वापर कमी झाला आहे: राष्ट्रीय उत्पादकता परिषद

  •  राष्ट्रीय उत्पादकता परिषदेने (NPC) केलेल्या अभ्यासानुसार, सॉइल हेल्थ कार्ड (SHC) याच्या शिफारशींच्या अंमलबजावणीमुळे रासायनिक खतांचा वापर 8 ते 10 टक्क्यांनी कमी झाला आहे.
  • -जे शेतकरी बहुतेक सर्व गोष्टींमध्ये खतांचा जास्त प्रमाणात वापर करतात, त्यांना सॉइल हेल्थ कार्ड (SHC) यामुळे हळूहळू त्यांच्या धोकादायक प्रथेपासून दूर केले जात आहे.
  • -या उपक्रमामुळे मृदेच्या आरोग्याच्या बाबी समजून घेण्यास आणि मातीच्या पोषक तत्त्वांचा योग्य वापर करुन उत्पादनात सुधारणा करण्यास शेतकर्‍यांना सक्षम केले आहे.
  • पंजाब, हरयाणा, उत्तरप्रदेश, राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र ही राज्ये आणि बिहार, झारखंड, मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश, तामिळनाडू या राज्यांमधल्या काही भागात मृदेमध्ये सर्व प्रोटीन घटकांना तयार होण्यासाठी आवश्यक असलेले ‘नायट्रोजन’ कमी आहे.
  • -हिमाचल, हरियाणा, उत्तरप्रदेश, राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र ही राज्ये आणि बिहार, झारखंड, मध्यप्रदेश, आसाम, आंध्रप्रदेश, तामिळनाडू, पश्चिम बंगाल या राज्यांमधल्या काही भागात मृदेमध्ये वनस्पतींना प्रकाशाला अन्नात रुपांतर करण्यात मदत करणारे ‘फॉस्फोरस’ कमी आहे

योजनेविषयी

  • -खतांच्या अत्याधिक वापरामुळे मृदेमधली पोषकद्रव्ये कमी होण्याच्या पार्श्वभूमीवर 2014-15 या आर्थिक वर्षात सॉइल हेल्थ कार्ड योजना लागू केली गेली. कृषी मंत्रालयाच्या अंतर्गत चाललेल्या या योजनेच्या पहिल्या टप्प्यात (वर्ष 2015-17) 10.74 कोटी कार्डांचे वाटप करण्यात आले, तर दुसर्‍या टप्प्यात (वर्ष 2017-19) 11.69 कोटी कार्डांचे वाटप करण्यात आले.
  • – “आदर्श खेड्यांचा विकास” हा एक पथदर्शी प्रकल्प राबविला जात असून त्याच्या अंतर्गत शेतकर्‍यांच्या भागीदारीने कृषक मातीचे नमुने घेणे आणि त्यांची चाचणी करण्यास प्रोत्साहन दिले जात आहे. “आदर्श खेड्यांचा विकास” या योजनेचा एक भाग म्हणून वर्ष 2019-20 मध्ये 13.53 लक्ष कार्ड वाटली गेली आहेत.
  • -या योजनेंतर्गत ‘मृदा आरोग्य प्रयोगशाळा’ची स्थापना करण्यासाठी, राज्यांना 429 अचल प्रयोगशाळा, 102 नवीन चल प्रयोगशाळा, 8752 लघू प्रयोगशाळा, 1562 ग्राम-स्तरीय प्रयोगशाळा आणि विद्यमान 800 प्रयोगशाळांची सुधारणा करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
  • – या योजनेत प्रत्येक दोन वर्षात एकदा राज्य सरकारकडून मृदेच्या रचनेचे विश्लेषण केले गेले आहे जेणेकरून जमिनीतील पोषक द्रव्ये सुधारण्यासाठी उपाययोजना करता येतील.
  • – योजनेंतर्गत 40 वर्षे वयोगटातले ग्रामीण युवा आणि शेतकरी प्रयोगशाळा स्थापन करण्यास व चाचणी घेण्यास पात्र आहेत. एका प्रयोगशाळेला 5 लक्ष रुपये खर्च येतो, ज्यापैकी 75 टक्के रक्कम अनुदान स्वरुपात केंद्र आणि राज्य सरकार देते.

 # Current Affairs


चालू घडामोडी – जागतिक वैद्यकीय माहिती चोरी जाण्याच्या बाबतीत महाराष्ट्र राज्य अव्वल

  •  जर्मनीच्या ग्रीनबोन सस्टेनेबल रेसिलीयन्स या कंपनीचे केलेल्या एका अभ्यासात असे आढळून आले आहे की, आज, इंटरनेटवर 120 दशलक्ष भारतीयांची वैद्यकीय माहिती उघडपणे विनामूल्य उपलब्ध आहे आणि हा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे.

 अहवालातल्या ठळक बाबी

  • – वैद्यकीय माहिती चोरी जाण्यामुळे प्रभावित झालेल्या राज्यांमध्ये महाराष्ट्र राज्य अव्वल आहे. महाराष्ट्रच्या खालोखाल कर्नाटक राज्याचा क्रमांक लागतो आहे.
  • – वैद्यकीय माहितीमध्ये रुग्णांचे सीटी स्कॅन, एक्स-रे, MRI आणि छायाचित्र अश्या संवेदनशील वैयक्तिक माहितीचा समावेश आहे. अशी माहिती भारतात साठवण केंद्रावर साठवितात आणि त्या सर्व केंद्रावर ती माहिती कोणत्याही सुरक्षेशिवाय विनामूल्य उपलब्ध आहे.
  • – इतर चिंतेची बाब म्हणजे, तो तपशील वापरून बनावट ओळख तयार केली जाते, ज्याचा कोणत्याही संभाव्य मार्गाने गैरवापर केला जाऊ शकतो.
    जागतिक पातळीवर वैद्यकीय माहिती चोरी जाण्याच्या बाबतीत “चांगले”, “वाईट” आणि “कुरुप” अश्या तीन श्रेणीत देशांचे वर्गीकरण करण्यात आले होते. त्यात “कुरुप” गटात अमेरिका या देशानंतर भारताचा द्वितीय क्रमांक लागतो आहे.

     # Current Affairs


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Join Us on Telegram

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

Table of Contents

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम