दिनविशेष : ७ जानेवारी

218

७ जानेवारी   : जन्म

१८९३: स्वातंत्र्य वीरांगना जानकीदेवी बजाज यांचा जन्म. (मृत्यू: २१ मे १९७९)

१९२०: लोकसाहित्याच्या अभ्यासक सरोजिनी बाबर यांचा जन्म. (मृत्यू: १९ एप्रिल २००८)

१९२१: अभिनेते चंद्रकांत गोखले यांचा जन्म. (मृत्यू: २० जून २००८)

१९२५: स्वातंत्र्यवीर सावरकर यांची कन्या प्रभात यांचा जन्म.

१९४८: विदुषी व लेखिका शोभा डे यांचा जन्म.

१९६१: अभिनेत्री सुप्रिया पाठक यांचा जन्म.

१९७९: हिंदी चित्रपट अभिनेत्री बिपाशा बासू यांचा जन्म.

७ जानेवारी: मृत्यू

१९८९: दुसर्‍या महायुद्धाच्या आधी व नंतरच्या काळातील जपानी सम्राट मिचेनोमिया हिरोहितो यांचे निधन. (जन्म: २९ एप्रिल १९०१)

२०००: विद्यार्थी सहायक समितीचे संस्थापक व स्वातंत्र्यसैनिक डॉ. अच्युतराव आपटे यांचे निधन.

७ जानेवारी : महत्वाच्या घटना

१६१०: गॅलेलिओ यांनी दुर्दार्शीच्या सहाय्याने इयो, युरोपा, गॅनिमिडी आणि कॅलिस्टो या गुरूच्या चार उपग्रहांचा शोध लावला.

१६८०: मुंबई कौन्सिलने शिवाजी महारांजाबरोबर करायच्या कराराचा मसुदा तयार केला.

१७८९: अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष म्हणून जॉर्ज वॉशिंग्टन निवडून आले.

१९२२: पंजाब केसरी लाला लजपतराय आणि त्यांचे सहकारी पंडित संतानम यांना राजद्रोहाच्या आरोपावरुन १८ महिन्यांची शिक्षा झाली.

१९२७: न्यूयॉर्क ते लंडन अशी अटलांटिक महासागर पार करणारी दूरध्वनीसेवा सुरू झाली.

१९३५: कोलकाता येथे इंडियन नॅशनल सायन्स अ‍ॅकेडमीचे (INSA) उद्‌घाटन झाले.

१९५९: क्यूबातील फिडेल कॅस्ट्रो यांच्या सरकारला अमेरिकेने मान्यता दिली.

१९६८: अमेरिकेचे सर्व्हेयर यान चंद्राच्या टायको या विवराच्या किनारी उतरले.

१९७२: कन्याकुमारी येथील विवेकानंद केन्द्राचे काम पूर्ण झाले.

१९७८: एम. व्ही. चंद्रगुप्त ही मालवाहू नौका ६९ कर्मचार्‍यांसह होनोलुलू जवळील महासागरात बेपत्ता झाली.


 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Join Us on Telegram

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

 

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम