Dinvishesh 15 January | दिनविशेष :१५ जानेवारी [ भारतीय लष्कर दिन]

Dinvishesh 15 January [ भारतीय लष्कर दिन]

313

Dinvishesh 15 January | दिनविशेष :१५ जानेवारी [ भारतीय लष्कर दिन] 

Dinvishesh 15 January : जन्म

१७७९: ग्रँट मेडिकल कॉलेज मुंबईचे एक संस्थापक रॉबर्ट ग्रँट यांचा जन्म.

१९२०: कन्नड साहित्यिक, कर्नाटक विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. आर. सी. हिरेमठ यांचा जन्म. (मृत्यू: ३ नोव्हेंबर १९९८)

१९२१: महाराष्ट्राचे ९ वे मुख्यमंत्री बाबासाहेब भोसले यांचा जन्म. (मृत्यू: ६ ऑक्टोबर २००७)

१९२६: भारतीय कुस्तीगीर खाशाबा जाधव यांचा जन्म. (मृत्यू: १४ ऑगस्ट १९८४)

१९२९: गांधीवादी नेते आणि नोबेल पारितोषिक विजेते मार्टिन ल्युथर किंग यांचा जन्म. (मृत्यू: ४ एप्रिल १९६८)

१९३१: मराठीह कथाकार शरच्चंद्र वासुदेव चिरमुले यांचा जन्म.

१९४७: पत्रकार नितीश नंदी यांचा जन्म.

१९५६: बहुजन समाज पक्षाच्या नेत्या मायावती यांचा जन्म.

Dinvishesh 15 January : मृत्यू

१९७१: अत्यंत लोकप्रिय व प्रतिभावान चित्रकार दीनानाथ दलाल यांचे निधन. (जन्म: ३० मे १९१६)

१९९४: गुजराथी लेखक, कवी व ज्योतिषी हरिलाल उपाध्याय यांचे निधन. (जन्म: २२ जानेवारी १९१६)

१९९८: भारताचे दुसरे पंतप्रधान गुलजारीलाल नंदा यांचे निधन. (जन्म: ४ जुलै १८९८)

२००२: राष्ट्रपतिपदक विजेत्या तमाशा कलावंत विठाबाई भाऊ (मांग) नारायणगावकर यांचे निधन.

२०१३: समाजसेवक डॉ. शरदचंद्र गोखले यांचे निधन. (जन्म: २९ सप्टेंबर १९२५)

२०१४: दलित साहित्यिक नामदेव लक्ष्मण ढसाळ यांचे निधन. (जन्म: १५ फेब्रुवारी १९४९)

Dinvishesh 15 January : महत्वाच्या घटना

१५५९: राणी एलिझाबेथ (पहिली) यांची इंग्लंडची राणी म्हणून वेस्टमिन्स्टर अ‍ॅबे येथे राज्याभिषेक झाला.

१७६१: पानिपतचे तिसरे युद्ध संपले.

१८६१: एलिशा जी. ओटिस या संशोधकाला सुरक्षित उद्‌वाहकाचे (Lift) जगातील पहिले पेटंट मिळाले.

१८८९: द पेंबरटन मेडिसिन कंपनी या कंपनीची अटलांटा, जॉर्जिया, यू. एस. ए. येथे स्थापना झाली. ही कंपनी सध्या द कोका कोला कंपनी

म्हणून प्रसिद्ध आहे.

१९४९: जनरल करिअप्पा यांनी ब्रिटिशांकडुन भारतीय सेनेची सूत्रे हाती घेतली.

१९७०: मुअम्मर गडाफी लीबीयाचे सर्वेसर्वा झाले.

१९७३: जनरल गोपाळ गुरुनाथ बेवूर यांनी भारताचे ९ वे लष्करप्रमुख म्हणून सूत्रे हाती घेतली. हे लष्करप्रमुख होणारे पहिले महाराष्ट्रीयन आहेत.

१९९६: भारतातील रेल्वेयुगाच्या प्रारंभापासून ब्रिटिश परंपरा व संस्कृतीचा डौल मिरवणाऱ्या बोरीबंदर (व्हिक्टोरिया टर्मिनस) या स्थानकाचे नाव बदलुन ते छत्रपती शिवाजी टर्मिनस (CST) असे करण्यात आले.

१९९९: गायिका ज्योत्स्‍ना भोळे यांना राज्य सरकारच्या वतीने गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान करण्यात आला.

२००१: सर्वांना मोफत असलेला ज्ञानकोश विकीपिडिया हा इंटरनेटवर प्रथमच उपलब्ध झाला.

 

 

भारतीय लष्कर दिन निमित्त हार्दिक शुभेच्छा !!!

 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Join Us on Telegram

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

 

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम