दिनविशेष : २३ ऑक्टोबर

0 12

२३ ऑक्टोबर: जन्म

१७७८: कित्तूरची राणी चन्नम्मा यांचा जन्म.

१८७९: वैदिक धर्माचे पुरस्कर्ते शंकर रामचंद्र तथा अहिताग्नी राजवाडे यांचा जन्म.

१९००: इंग्लिश क्रिकेटपटू डग्लस जार्डिन यांचा जन्म.

१९२३: श्री विद्या प्रकाशन चे संस्थापक दामोदर दिनकर तथा मधुकाका कुलकर्णी यांचा जन्म.

१९२३: भारतीय-पाकिस्तानी भाषाशास्त्रज्ञ, लेखक आणि विद्वान असलम फारुखी यांचा जन्म.

१९२४: संगीतकार, गायक व नट संगीतभूषण पं. राम मराठे यांचा जन्म.

१९३७: भारतीय अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते देवेन वर्मा यांचा जन्म.

१९४०: ब्राझिलियन फुटबॉल खेळाडू पेले यांचा जन्म.

१९४५: अभिनेते व नाट्यनिर्माते शफी इनामदार यांचा जन्म.

१९७४: भारतीय पत्रकार आणि लेखक अरविंद अडिगा यांचा जन्म.

२३ ऑक्टोबर: मृत्यू

१९१०: थायलँडचा राजा चुलालोंगकोर्ण तथा राम (पाचवा) यांचे निधन.

१९१५: इंग्लिश क्रिकेटपटू डब्ल्यू. जी. ग्रेस यांचे निधन.

१९२१: चाकाच्या आत हवा भरलेली नळी (tube) वापरण्याच्या तंत्राचा शोध लावणारे स्कॉटिश संशोधक तसेच डनलॉप रबर चे संस्थापक जॉन बॉईड डनलॉप यांचे निधन.

१९५७: ख्रिश्चन डायर एस.ए. चे संस्थापक ख्रिश्चन डायर यांचे निधन.

२०१२: बंगाली कवी व कादंबरीकार सुनील गंगोपाध्याय यांचे निधन.

२३ ऑक्टोबर: महत्वाच्या घटना

१७०७: ग्रेट ब्रिटनची पहिली संसदेची बैठक.

१८५०: अमेरिकेत पहिले राष्ट्रीय महिला हक्क संमेलन सुरु झाले.

१८९०: हरी नारायण आपटे यांनी करमणूक या आपल्या साप्तहिकातून स्फूट गोष्टी लिहिण्यास प्रारंभ केला आणि मराठी लघुकथेचा पाया घातला गेला.

१९४४: दुसरे महायुद्ध – सोविएत लाल सैन्याने (Red Army) हंगेरीत प्रवेश केला.

१९७३: संयुक्त राष्ट्रांनी (United Nations) निर्बंध घातल्यामुळे इस्त्रायल व सीरीयामधील युद्ध संपुष्टात आले.

१९९७: सामाजिक कार्यासाठीचे जर्मनीचे योजेफ ब्यूज पारितोषिक किरण बेदी यांना प्रदान

 

 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज- MPSCExam’s

अपडेट राहण्यासाठी आम्हाला इंस्टाग्राम  वर फॉलो करा : @mpscexam07

आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा :

 

आपली प्रतिक्रिया नोंदवा

नमस्कार मित्रांनो,
चालू घडामोडी , अभ्यासक्रमानुसार लेख, मोफत ऑनलाइन सराव पेपर्स तुमच्या मोबाईल वर
तुम्हाला पाहिजे असतील तर कृपया खालील लिंक ला क्लिक करून आमची सेवा सबस्क्राईब करा
जॉईन लिंक : Click Here

%d bloggers like this: