Current Affairs : 28 नोव्हेंबर 2019 चालू घडामोडी

99

चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाईट ला रोज भेट द्या.

Visit Regularly our site to check Current Affairs

Current Affairs : 28 November 2019 | चालू घडामोडी : 28 नोव्हेंबर 2019

चालू घडामोडी – उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे २९वे मुख्यमंत्री

  • शिवतीर्थावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राचे २९वे मुख्यमंत्री म्हणून आज शपथ घेतली.
  • राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.
  • शिवसेनेकडून शिवसेना विधीमंडळ गटनेते एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, राष्ट्रवादीकडून जयंत पाटील, छगन भुजबळ, काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात आणि नितीन राऊत यांनी शपथ घेतली.
  • आमदार नसताना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आठवे नेते ठरले आहेत…

# Current Affairs


चालू घडामोडी –मालदीवचे माजी अध्यक्ष गयूम यांना ५ वर्षांचा कारावास

  • मालदीवचे माजी अध्यक्ष यामीन अब्दुल गयूम यांना आर्थिक गैरव्यवहाराच्या (मनी लाँडरिंग) आरोपाखाली दोषी ठरवून देशातील एका न्यायालयाने त्यांना ५ वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली.
  • गयूम यांनी ५० लाख डॉलरचा दंड भरावा, असाही आदेश पाच सदस्यांच्या एका फौजदारी न्यायालयाने दिला.न्यायालयाने यामीन यांनी सरकारी खजिन्यातील १० लाख डॉलर रकमेचा वैयक्तिक कामासाठी गैरव्यवहार केल्याचा निर्णय न्यायालयाने दिला.
  • यामीन यांनी २०१३ ते २०१८ या काळात मालेचे नेतृत्व केले. त्यांच्या कारकीर्दीत त्यांच्यावर भ्रष्टाचार, माध्यमांची मुस्कटदाबी करणे, आणि राजकीय विरोधकांना हद्दपार करणे असे आरोप लावण्यात आले होते.
  • गेल्या वर्षीच्या निवडणुकीत विद्यमान अध्यक्ष इब्राहिम मोहमद सोली यांनी त्यांचा पराभव केला होता.

# Current Affairs


चालू घडामोडी – स्पाइक’, ‘ब्राह्मोस’ची चाचणी यशस्वी

  • लष्कराने दीर्घ पल्ल्याच्या ‘स्पाइक’ या रणगाडाविरोधी क्षेपणास्त्रांची बुधवारी यशस्वीरीत्या चाचणी घेतली. महू येथे दोन क्षेपणास्त्रांची चाचणी घेण्यात आली. 
  • लष्कर जवळपास तीन दशके दुसऱ्या पिढीची आणि आता कालबाह्य झालेली क्षेपणास्त्रे वापरत होते.
  • ‘स्पाइक’मुळे आता आधुनिक क्षेपणास्त्राची उणीव भरून निघणार आहे.
  • ‘स्पाइक’ हे चौथ्या पिढीतील क्षेपणास्त्र असून ते चार किलोमीटर अंतरापर्यंत अचूक मारा करते.
  • हे क्षेपणास्त्र डागल्यानंतर ते मध्येच दुसऱ्या लक्ष्याला भेदण्यासाठी वळवता येते. या क्षेपणास्त्रांची निर्मिती इस्रायलच्या ‘राफेल अॅडव्हान्स डिफेन्स सिस्टीम’ने केली आहे.

# Current Affairs


चालू घडामोडी – चार वर्षांत देशात १५०० बालविवाह

  • सन २०१३ ते २०१७ या कालावधीत देशभरात बालविवाहाची दीड हजारांहून अधिक प्रकरणे उघड झाली असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री स्मृती इराणी यांनी गुरुवारी राज्यसभेत दिली. 
  • एका प्रश्नाच्या उत्तरात इराणी यांनी बालविवाहांबाबतची गेल्या पाच वर्षांतील माहिती सादर केली. बालविवाहाची सर्वाधिक प्रकरणे सन २०१७मध्ये (३९५) उघड झाली.
  • सन २०१६मध्ये हे प्रमाण ३२६, सन २०१५मध्ये २९३, २०१४मध्ये २८० आणि २०१३मध्ये २२२ इतके होते, असे इराणी यांनी ‘नॅशनल क्राइम रेकॉर्ड्स ब्युरो’च्या माहितीच्या आधारे सांगितले.सन २०१७मध्ये सर्वाधिक बालविवाह कर्नाटकात झाले.

 # Current Affairs


 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Join Us on Telegram

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम