१७८६: मेक्सिको देशाचे पहिले राष्ट्रपती ग्वाडालुपे व्हिक्टोरिया यांचा जन्म. (मृत्यू: २१ मार्च १८४३)

१८९०: पंचांगकर्ते ल. गो. तथा नानाशास्त्री दाते यांचा जन्म.

१८९९: बॉलपोइंट पेनचे संशोधक लस्झो बियो यांचा जन्म. (मृत्यू: २४ ऑक्टोबर १९८५)

१९०१: नोबेल पारितोषिक विजेते इटालियन अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ एनरिको फर्मी यांचा जन्म.

१९२५: समाजसेवक डॉ. शरदचंद्र गोखले यांचा जन्म.

१९२८: राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार ब्रजेश मिश्रा यांचा जन्म.

१९३२: विनोदी अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते मेहमूद यांचा जन्म.

१९३२: मुस्लिम सत्यशोधक चळवळीचे अध्वर्यू हमीद दलवाई यांचा जन्म.

१९३३: मोजाम्बिक देशाचे पहिले राष्ट्रपती समोरा महेल यांचा जन्म.

१९३६: इटली देशाचे पंतप्रधान सिल्व्हियो बेर्लुस्कोनी यांचा जन्म.

१९३८: नेदरलँड्स देशाचे पंतप्रधान विल्यम कॉक यांचा जन्म.

१९४३: नोबेल पारितोषिक विजेते पोलंड देशाचे राष्ट्राध्यक्ष लेक वॉलेसा यांचा जन्म.

१९४७: भारताचे ३८वे सरन्यायाधीश एस. एच. कपाडिया यांचा जन्म.

१९५१: चिली देशाच्या पहिल्या स्त्री राष्ट्राध्यक्ष मिशेल बाशेलेट यांचा जन्म.

१९५७: इंग्लिश क्रिकेटपटू व पंच ख्रिस ब्रॉड यांचा जन्म.

१९७८: अमेरिकन कसरतपटू मोहिनी भारद्वाज यांचा जन्म.