चालू घडामोडी : 31 डिसेंबर 2019

184

चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाईट ला रोज भेट द्या.

Visit Regularly our site to check Current Affairs

Current Affairs :31 December 2019 | चालू घडामोडी : 31 डिसेंबर 2019 

चालू घडामोडी – भारतीय वनसर्वेक्षण अहवाल 2019सघन वनक्षेत्र विरळ वनक्षेत्र आणि सामान्य वनक्षेत्र अशा तिन्ही श्रेणींमध्ये वाढ होणारा भारत हा एकमेव देश

  • देशातील वनक्षेत्र वाढले; कर्नाटक, आंध्र आणि केरळात सर्वाधिक वाढ देशातील वनक्षेत्रात आणि वृक्षाच्छादित क्षेत्रात ५१८८ चौरस किलोमीटरने वाढ झाली असून, खारफुटीचे क्षेत्रफळदेखील वाढल्याचे ‘इंडियन स्टेट ऑफ फॉरेस्ट रिपोर्ट-२०१९’ या वनसर्वेक्षण अहवालातून दिसून आले आहे.
  • केंद्रीय वनमंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते वनसर्वेक्षण अहवालाचे प्रकाशन झाले.
  • जगात मोजक्या देशांमध्ये वनक्षेत्र वाढले असून, त्यात भारताचाही समावेश आहे. २०१४ ते २०१९ पर्यंत १३… वृक्ष आणि वन क्षेत्रात वाढ असणारी राज्ये:-
  1. कर्नाटक
  2.  आंध्र प्रदेश
  3.  केरळ
  4. जम्मू, काश्मीर
  5. हिमाचल प्रदेश

वृक्ष आणि वन क्षेत्रात घट असणारी राज्ये:-

  1.  मणिपूर
  2.  अरुणाचल प्रदेश
  3. मिझोराम
  4. मेघालय
  5.  नागालँड

# Current Affairs


चालू घडामोडी – तिहेरी तलाक पीडितांना मिळणार वर्षाला 6 हजार रुपये पेन्शन.

  • उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सरकारने तिहेरी तलाक पीडित महिलांना पुढील वर्षापासून पेन्शन देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार तिहेरी तलाक पीडित महिलांना वर्षाला सहा हजार रुपये पेन्शन देण्याची तरतूद करण्यात आली आहे.
  • तर यासंबंधीचा प्रस्ताव सरकारने तयार केला असून पुढील कॅबिनेटच्या बैठकीत मांडला जाणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एफआयआर किंवा फॅमिली कोर्टातील खटल्याच्या आधारावर ही पेन्शन दिली जाणार आहे.
  • तसेच यासाठी सरकारने राज्यातील तिहेरी तलाक पीडित 5 हजार महिलांची नोंद घेतली आहे. पहिल्या टप्प्यात या पीडित महिलांसाठी पेन्शनची योजना लागू करण्यात येणार असल्याचे समजते.

# Current Affairs


चालू घडामोडी – बिपिन रावत भारताचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ, सरकारकडून घोषणा

  • केंद्रीय सुरक्षा समितीने मागच्या मंगळवारी सीडीएस पदाला मंजुरी दिली.
  • भारताच्या चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ पदावर लष्करप्रमुख जनरल बिपिन रावत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते भारताचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ आहेत.
  • बिपिन रावत उद्या लष्करप्रमुख पदावरुन निवृत्त होत आहेत.
  • केंद्रीय सुरक्षा समितीने मागच्या मंगळवारी सीडीएस पदाला मंजुरी दिली.
  • सीडीएस फोर स्टार जनरल अशी माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली होती.

सीडीएस म्हणजे काय?

  • भूदल, हवाई दल आणि नौदल या तिन्ही सैन्य दलाचे सीडीएस प्रमुख सल्लागार असणार आहेत. भारतासमोर असणाऱ्या संरक्षणविषयक आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी तिन्ही सैन्य दलात ताळमेळ वाढवण्याची जबाबदारी चीफ ऑफ डिफेंस स्टाफची(सीडीएस) असणार आहे.

काय असेल सीडीएसवर जबाबदारी ?

  • तिन्ही सैन्य दलांमध्ये समन्वय राखण्याबरोबरच सीडीएसवर लष्करी विषयांवर सरकारला सल्ला देण्याची जबाबदारी असेल. लष्कराच्या विविध मोहिमांमध्ये समन्वय राखण्याबरोबरच शस्त्रास्त्र खरेदीमध्ये सीडीएसची महत्वाची भूमिका असेल. सीडीएसचा कार्यकाळ किती असेल ते अद्याप निश्चित झालेले नाही.
  • तिन्ही सैन्य दल प्रमुखांच्या वेतना इतकाच पगार सीडीएसला दिला जाईल. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पत्रकार परिषदेत मंगळवारी ही माहिती दिली. सध्याच्या रचनेत लष्करप्रमुख बिपिन रावत हे चीफ ऑफ स्टाफ कमिटीच्या अध्यक्षपदी आहेत.
  • सीडीएस नियुक्तीची पहिली मागणी कधी झाली?
  • १९९९ साली कारगिल युद्धानंतर स्थापन झालेल्या समितीने सर्वप्रथम चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ पदाची निर्मिती करण्याची मागणी केली होती. कारगिल युद्ध घडले त्यावेळी सुरक्षेमध्ये नेमक्या काय त्रुटी राहिल्यात, पुढच्यावेळी काय सुधारण्या कराव्या लागतील त्यासाठी ही समिती स्थापन करण्यात आली होती.

# Current Affairs


चालू घडामोडी – सरकारने प्रथमच ‘औषध किंमत नियंत्रण अध्यादेश-2013’ लागू केला.

  • सरकारने प्रथमच ‘औषध किंमत नियंत्रण अध्यादेश-2013’ लागू केला असून, त्याद्वारे औषधांची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी किंमती नियंत्रणाच्या अंतर्गत असलेल्या 21 औषध वा औषधी-घटकांच्या किंमतीत वाढविण्यात येत आहे.
  • नॅशनल फार्मास्युटिकल प्राइसिंग अथॉरिटी (NPPA) यांच्या नियंत्रणात असलेल्या औषधांच्या सध्याच्या कमाल मर्यादेच्या किंमतींमध्ये 50 टक्के वाढ केली जाणार आहे. ही वाढ एकदाच केली जाणार.
  • या निर्णयामुळे, BCG लस, पेनिसिलिन, मलेरिया आणि कुष्ठरोगावरील औषधे (डॅप्सोन), फ्युरोसेमाइड सारखी जीवनरक्षक औषधे (हृदय, यकृत किंवा मूत्रपिंडाच्या आजारामध्ये वापरली जाणारी), ‘क’ जीवनसत्त्व, काही प्रतिजैविके आणि अँटी-अलर्जी औषधे यासारख्या औषधांच्या किंमतींमध्ये वाढ होणार आहे.

 # Current Affairs


 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Join Us on Telegram

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

Table of Contents

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम