प्रिय मित्रांनो नमस्कार,
MPSCExams.com या वेब पोर्टल वर आपले स्वागत आहे. आज महाराष्ट्रात सरकारी नोकरीचे आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी लाखो विद्यार्थी स्पर्धा परीक्षांची तयारी करत असून त्यांना अनेक प्रकारच्या अडचणी येत असतात.माहितीचा अभाव,सुविधांची कमतरता,महागडे क्लासेस,या सर्व गोष्टींमुळे अनेक विद्यार्थ्यांना येणाऱ्या संधीचा फायदा घेता येत नाही. म्हणून या हजारो विद्यार्थ्यांना काही मदत करण्याच्या हेतूने आम्ही हे वेब पोर्टल सुरु केले असून या पोर्टल वर MPSC तसेच इतरही स्पर्धा परीक्षाची संपूर्ण माहिती देण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे. इथे आपल्याला MPSC तसेच विविध परीक्षांची माहिती, सरकारी नोकऱ्यांच्या जाहिराती,त्यांचा अभ्यासक्रम, परीक्षांचे निकाल,नियमित महत्वाच्या चालू घडामोडी, नोकऱ्या संदर्भातील बातम्या, तसेच यशस्वी विद्यार्थ्यांचे अनुभव या सर्व गोष्टी विनामूल्य बघायला मिळतील.याचा प्रत्येक विद्यार्थ्याने अवश्य लाभ घ्यावा तसेच आपल्या मित्र-मैत्रिणींना सुद्धा सांगावे. स्पर्धेच्या युगात अपडेट राहण्यासाठी या वेब पोर्टलचा तुम्हाला नक्कीच लाभ होईल असा आम्हाला विश्वास आहे.आम्हाला आपले MPSC संदर्भातील प्रश्न COMMENT करून नक्की विचार आम्ही त्याचे उत्तर देण्याचा प्रयत्न करू.

धन्यवाद!!!

– टिम MPSCExams.com