व्यक्तीविशेष : अल्बर्ट आईनस्टाईन

204

 अल्बर्ट आईनस्टाईन एक महान वैज्ञानिक

जगात सर्वात बुद्धिमान म्हणून प्रसिद्धी मिळविणारे अल्बर्ट आईनस्टाईन हे सर्व जगतालाच चांगल्या प्रकारे परिचित आहेत. जगात काहीच लोक असे असतील की जे यांना ओळखत नसतील.त्यांनी केवळ विज्ञान क्षेत्रातच आपलं योगदान दिल नाही तर, आपल्या शोध कार्यातून अनेक कठीण गोष्टी सोप्या करून, आपल्या संशोधनातून विज्ञानाला एक नविन दिशा देण्याचे महत्वपूर्ण काम केलं.अल्बर्ट आईनस्टाईन महत्त्वपूर्ण योगदानासाठी त्यांना सर्वोच्च सम्मान नोबल पुरस्काराने सम्मानित करण्यात आलं. याच बरोबर अल्बर्ट आईनस्टाईन यांनी त्यांच्या जीवनात केलेल्या संघर्षाबद्दल जाणून घेऊयात…

 जन्म  शिक्षण

अल्बर्ट आईनस्टाईन यांचा जन्म जर्मनीतील उल्मा शहरात एका यहुदी परिवारात 14 मार्च 1879 साली झाला.आईनस्टाईन यांनी वयाच्या 12 वर्षीच भूमितीचा शोध लावला होता. अल्बर्ट आईनस्टाईन यांनी वयाच्या 16 वर्षी आपले 12 वी चे शिक्षण पूर्ण केल.यानंतर त्यांनी आपल्या शिक्षकाच्या सल्ल्यानुसार स्वित्झर्लंडच्या आरौ शहरातील “कैनटोनल शाळेत” डिप्लोमा केला. 1905 साली त्यांनी पी.एच.डी.ची पदवी मिळवली.

 अल्बर्ट आईनस्टाईन यांचे शोध

प्रकाशाच्या पुंजाचा(क्वांटम) सिद्धांत :

प्रकाशाच्या पुंजाचा(क्वांटम) सिद्धांतात आईनस्टाईन यांनी उर्जेच्या छोट्या थैली ला फोटोन म्हटलं आणि त्याच्या तरंगाचे वैशिष्ट्य सांगितले.याचबरोबर त्यांनी काही धातूंचे इलेक्ट्रॉनिक उत्सर्जन आणि फोटो इलेक्ट्रिक च्या परिणामाची रचना समजावून सांगितली. याच संशोधनाच्या आधारावर दूरदर्शन चा शोध करण्यात आला होता.

E = Mc 2

1905 साली आईनस्टाईन यांनी वस्तुमान आणि ऊर्जा यांच्यात एक सूत्र बनवलं होत. जे पूर्ण जगात प्रसिद्ध झाल होत.

 रेफ्रिजरेटरचा शोध :

आईनस्टाईन यांनी शीतगृहाचा शोध खूप कमी वेळेत लावला होता. या प्रयोगात त्यांनी अमोनिया, ब्युटेन, पाणी आणि ऊर्जा यांचा जास्तीत जास्त वापर केला होता.

 सापेक्षतावादाचा विशिष्ट सिद्धांत :

आईनस्टाईन यांनी आपल्या या सिद्धांतात वेग आणि वेळ यांचा संबंध समजावून सागण्याचा प्रयत्न केला.

 आकाशाचा रंग निळा असतो :

जेव्हा प्रकाश एखाद्या माध्यमातून प्रवास करत असतो, त्या माध्यमात धुळीचे कण तसेच पदार्थांचे अत्यंत सूक्ष्म कण देखील असतात. यांच्यामुळे प्रकाश सर्व दिशेने प्रकाशित होत जातो. त्याला प्रकाशाचे प्रकीर्णन म्हणतात.जगात सर्वात बुद्धिमान असणाऱ्या अल्बर्ट आईनस्टाईन या व्यक्तिमत्वाने अमेरिकेच्या न्यूजर्सीत येथे “प्रिस्टन” महाविद्यालयात काम करीत असतांना 18 एप्रिल 1955 ला शेवटचा श्वास घेतला.


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Click Here : MPSC मराठी व्याकरण

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम