Arogya Vibhag Bharti 2021 : सरकारकडून लवकरच ८००० पदांची मेगा भरती होणार..

Arogya Vibhag Bharti 2021

350

Arogya Vibhag Bharti 2021- आरोग्य पदभरती आता परीक्षेद्वारेच; हजारो विद्यार्थ्यांना दिलासा 

Arogya Vibhag Recruitment 2021 : (१ जानेवारी २०२१ अपडेट)

नववर्षानिमित्त राज्य सरकारनं भरतीबाबत गुड न्यूज दिली आहे. नवीन वर्षात आरोग्य आणि ग्रामविकास विभागात 8 हजार विविध पदांसाठी मेगा भरती घेण्यात येणार आहे. दरम्यान आरोग्य विभागातील पदभरतीसाठीची प्रक्रिया जानेवारी अखेरपर्यत पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

आरोग्य विभागातील रिक्त पदभरतीसंदर्भात आरोग्यमंत्री राजेश टोपे राज्यातील विभागीय आयुक्तांसह आरोग्य अधिकाऱ्यांसह बैठक घेतली. पुढील दोन महिन्यात ही भरती प्रक्रीया सुरू करण्याच्या सूचना यावेळी आरोग्यमंत्र्यांनी दिल्या आहे. आरोग्य आणि ग्रामविकास विभागातील आरोग्य सेवेशी निगडीत पदं भरली जाणार आहेत. राज्य शासनानं भरतीला मान्यता दिली आहे.

आरोग्य विभागातील रिक्त पदांच्या भरतीला चालना मिळण्यासाठी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेतली. पुढील काही महिन्यात साधारण आठ हजार पेक्षा जास्त नोकर भरती आरोग्य आणि ग्रामविकास विभागात केली जाणार आहे. कोविड संकटामुळे आरोग्य क्षेत्रात आवश्यक भरती केली जाणार आहे. पुढील दोन महिन्यात नोकरभरती प्रक्रिया सुरू केली जाणार असल्याचंही  राजेश टोपेंनी सांगितलं. यावेळी आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास, आयुक्त डॉ. रामस्वामी, संचालक , उपसंचालक आदी उपस्थित होते

राजेशे टोपेंनी राज्यातील कोविड परिस्थितीसंदर्भात चर्चा केल्यानंतर संबंधितांना महत्त्वाच्या सूचनाही केल्या आहेत. यावेळी सर्व आरोग्य उपसंचालक, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी यांची स्वतंत्र बैठक घेऊन राज्यातील आरोग्य यंत्रणेच्या माध्यमातून नागरिकांना दर्जेदार सेवा देण्याचे आवाहन केले. आरोग्य यंत्रणेचे संनियंत्रण महत्वाचे असून महत्वाच्या राष्ट्रीय आरोग्य योजनांची प्रभावी अंमलबजावणी करा. सार्वजनिक आरोग्य सेवेकडे बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन बदलण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना यावेळी त्यांनी केल्या

राज्य सरकारने आरोग्य विभागातील १७ हजार पदांसाठी भरती प्रक्रिया गुणवत्तेनुसार (दहावी, बारावी, पदवीच्या गुणांवर); तसेच मुलाखतीद्वारे राबविल्यास राज्यात स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या असंख्य उमेदवारांना संधीच मिळणार नसल्याचे समोर आले होते. दहावीच्या ‘बेस्ट ऑफ फाइव्ह’ निकालामुळे आणि बारावीच्या वाढलेल्या गुणांमुळे अनेक स्पर्धा परीक्षांचे विद्यार्थी मागे पडणार आहेत. त्यामुळे या भरतीला स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांकडून तीव्र विरोध झाला होता. ही भरती परीक्षा घेऊनच पार पडली पाहिजे, या पदांसाठी विद्यार्थी तीन ते पाच वर्षांपासून तयारी करीत आहे, भरती प्रक्रियेत दहावी आणि बारावीच्या गुणांचा विचार केल्यास खूप कमी विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे. मात्र, ही भरती परीक्षा घेऊनच पार पडली पाहिजे, अशी भूमिका विद्यार्थ्यांनी मांडली. त्यानंतर ‘महाराष्ट्र टाइम्स’ने संपूर्ण प्रकाराबाबत वृत्त प्रकाशित करून पाठपुरावा केला.

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे पुणे शहराध्यक्ष कल्पेश यादव यांनी टोपे यांच्याशी संपर्क साधून विद्यार्थ्यांच्या भावना पोहोचवल्या. त्यासोबतच निवेदनाद्वारे पाठपुरावा केला. अखेर विधिमंडळ अधिवेशनात टोपे यांनी या भरतीबाबत सभागृहाला माहिती दिली. ‘करोनामुळे लॉकडाउनची परिस्थिती असल्याने पदभरती मेरिटनुसार घेण्याचा विचार होता. मात्र, आता राज्यात सर्व क्षेत्र खुले होत असल्याने, एकूण पदभरतीच्या पन्नास टक्के जागा एका महिन्याच्या आत परीक्षा घेऊन भरणार आहे. रोस्टर तयार करण्यासाठी आठ ते पंधरा दिवसांचा कालावधी जाईल. त्यानंतर पदभरती प्रक्रियेला त्वरित सुरुवात होईल,’ अशी माहिती टोपे यांनी दिली.

 

 


आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

 
 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Click Here : MPSC मराठी व्याकरण

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

Table of Contents

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम