Arogya Vibhag Bharti 2022 | आरोग्य विभागात डॉक्टरांसह १७,०५१ पदे रिक्त!

Arogya Vibhag Bharti 2022

  • पदसंख्या: 10127
  • शेवटची तारीख:
14,234

Arogya Vibhag Bharti 2022

Arogya Vibhag Bharti 2022 : डॉक्टर, परिचारिका, तंत्रज्ञ, कक्षपरिचर यांसह आरोग्य विभागात हजारो पदे रिक्त असतानाही आरोग्य विभाग रुग्णसेवा कशी करतो हा प्रश्नच आहे. करोना, गोवरसारखे साथीचे आजार असो की केंद्र व राज्याचे आरोग्यविषयक विविध योजना राबविण्याचा मुद्दा, आरोग्य विभागाची गाडी डॉक्टर व परिचारिकांची हजारोंनी पदे रिक्त असतानाही सुरू आहे. आजघडीला राज्याच्या आरोग्य विभागात डॉक्टरांपासून विविध संवर्गाची एकूण १७ हजार ०५१ पदे रिक्त असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. यात डॉक्टरांची सुमारे एक हजार ५३४ पदे भरण्यात आलेली नसून, अशा प्रतिकूल परिस्थित काम करायचे कसे असा सवाल अस्वस्थ डॉक्टरांकडून करण्यात येत आहे.

राज्यातील सत्तेत कोणत्याही पक्षाचे सरकार असो आरोग्य विभागाच्या वाट्याला कायमच उपेक्षा आल्याचे आरोग्य विभागाच्या ज्येष्ठ डॉक्टरांचे म्हणणे आहे. एकीकडे आरोग्य विभागातील डॉक्टरांसह अत्यावश्यक असलेली हजारो पदे भरायची नाहीत तर दुसरीकडे आरोग्य विभागाला पुरेसा निधी द्यायचा नाही, हेच प्रत्येक सरकारचे धोरण राहीले आहे. आरोग्य विभागात आवश्यकता नसताना सनदी अधिकाऱ्यांची खोगीरभरती केली जाते, मात्र डॉक्टरांच्या नियमित पदोन्नतीच्या प्रश्नासह पुरेसा निधी उपलब्ध करून देणे आणि रिक्त पदे भरण्याबाबत या सनदी बाबू लोकांनी कधीही ठोस पुढाकार घेतलेला नाही. यामुळेच आज आरोग्य विभागाची पुरती वाताहात झाल्याचे आरोग्य विभागाच्या डॉक्टरांचे म्हणणे आहे.

 

डॉक्टरांपासून लिपीकांपर्यंतची पदे भरण्याची नितांत गरज –

राज्यात आरोग्य विभागाची एकूण ५२७ रुग्णालये असून जवळपास ४६ हजारांहून अधिक खाटा या रुग्णालयांमध्ये उपलब्ध आहेत. आरोग्य विभागाच्या माध्यमातून वर्षाकाठी बाह्यरुग्ण विभागात जवळपास साडेतीन कोटी रुग्णांवर उपचार केले जातात, तर सुमारे ९० हजार छोट्या-माठ्या शस्त्रक्रिया केल्या जातात. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान, पंतप्रधान मोतीबिंदू मुक्त भारत, राष्ट्रीय कुष्ठरोग निर्लून, राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलनासह विविध राष्ट्रीय कार्यक्रम, तसेच आरोग्यविषयक राज्य उपक्रम, हिवताव, हत्तीरोग, डेंगी, चिकनगुन्यासह विविध साथरोग, तसेच मधुमेह व रक्तदाबासह असर्गजन्य आजारांपासून कर्करोगापर्यंत अनेक आजारांवर आरोग्य विभाग सतत्याने काम करीत आहे. माता व बाल आरोग्य, आदिवासी भागातील आरोग्य सेवा तसेच मानसिक आजाराचा प्रश्न दिवसेंदिवस वाढत असून आरोग्य विभागाच्या कमाची वाढती व्याप्ती लक्षात घेता युद्धपातळीवर डॉक्टरांपासून लिपीकांपर्यंतची पदे भरण्याची नितांत गरज असल्याचे आरोग्य विभागातील डॉक्टरांचे म्हणणे आहे. पुरेसे डॉक्टर व परिचारिकांअभावी आरोग्य विभागाने सक्षमपणे उपचार करायचे कसे असा सवाल डॉक्टरांकडून उपस्थित करण्यात येत आहे.

 

विधिमंडळाच्या प्रत्येक अधिवेशनात डॉक्टर उपलब्ध नाहीत अशी ओरड आमादारांकडून करण्यात येते. मात्र पदे भरण्यास कोणीही तयार नाही. आरोग्य विभागासाठी स्वतंत्र हेल्थ केडरचा प्रस्ताव तयार असताना आज अनेक वर्षे त्याचीही अंमलबजावणी केली जात नाही.

Health Department Recruitment 2022

आरोग्य अधिकाऱ्यांच्या (Health Department Recruitment) या पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहे. केंद्र शासनाने डिसेंबर 2022 पर्यंत 10,356 आरोग्य केंद्र कार्यान्वित करण्याचे लक्ष राज्याला दिले होते. राज्याने आतापर्यंत 8,330 उपकेंद्र, 1,862 प्राथमिक आरोग्य केंद्र आणि 582 नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र असे 10,774 आरोग्य केंद्र हे आरोग्यवर्धिनी केंद्रात कार्यान्वित केले आहेत. राज्यातील उपकेंद्राद्वारे 5,000 लोकसंख्येला आरोग्यवर्धिनी केंद्र निर्माण करण्यात आले आहेत या केंद्रामध्ये तेरा प्रकारच्या सेवा रुग्णांना दिल्या जात आहेत.

आरोग्यवर्धिनी केंद्राच्या अंतर्गत प्रामुख्याने प्रसुती पूर्व, प्रसूती सेवा नवजात बालकांना सेवा, बाल आणि किशोरवयीन आजार व लसीकरण, कुटुंब नियोजन गर्भनिरोधक आवश्यक सेवा, सामान्य रोगाची बाह्य रुग्ण सेवा, संसर्गजन्य रोग नियोजन, असंसर्गजन्य रोग व तपासणी ,मानसिक आरोग्य नियोजन ,कान, नाक, घसा डोळे व सामान्य आजार संबंधीच्या सेवा, दंत मुखरोग आरोग्य, वाढत्या वयातील आजार व परिहारक उपचार, प्राथमिक उपचार व आपत्कालीन सेवा, आयुष व योग अशा सेवांचा यात समावेश आहे.

आरोग्य विभागात साडेचार हजार भरती जाहीर

  • राज्य सरकारकडून अमृत महोत्सवी वर्षा निमित्ताने 75 हजार नोकर भरती करण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे.
  • त्यामध्ये आरोग्य विभागात साडेचार हजार जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.
  • पोलिस विभागात 18 हजार जागांसाठी भरती जाहीर झाली आहे.
  • सध्या त्या संबंधित अर्ज भरती प्रक्रिया सुरू आहे.
  • ग्रामविकास विभागांतर्गत जिल्हा परिषदेमध्ये जवळपास दहा हजार जागांची भरती जाहीर करण्यात आली आहे.
  • लवकरच राज्यात शिक्षक भरती करण्याचा निर्णय राज्याचे मंत्री दीपक केसरकर यांनी घेतला आहे. तसेच कौशल्य विकास विभागामार्फत खाजगी कंपन्यांमध्ये एक लाख तरुणांना रोजगार देण्यासाठी करार करण्यात आला आहे.
  • येणाऱ्या काळात रोजगार मेळावे घेऊन हा रोजगार देण्याचा प्रयत्न राज्य सरकारचा असणार आहे.

आरोग्य विभाग पदभरती परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर!! Arogya Vibhag Bharti 2022

Arogya Vibhag Recruitment 2023 Timetable

Arogya Vibhag Bharti 2022

—————————————————————

Previous Update –

Arogya Vibhag Bharti 2022

Arogya Vibhag Bharti 2022 :  सरकारी नोकरीची प्रतीक्षा करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी महाराष्ट्र राज्य सरकारकडून एक मोठी खुशखबर आली आहे. राज्य सरकार लवकरच येत्या काही महिन्यांमध्ये सार्वजनिक आरोग्य विभागात तब्बल 10,127 जागांसाठी मेगाभरती होणार आहे अशी माहिती मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे. त्यामुले सरकारी नोकरीची प्रतीक्षा करत असलेल्या उमेदवारांसाठी हे दिवाळीचं मोठं गिफ्ट असणार आहे.

एकूण जागा : 10,127 

ऑफिशिअल नोटिफिकेशन जारी होण्याचा कालावधी :  01 जानेवारी 2023 – 07 जानेवारी 2023

परीक्षांची तारीख : 25 मार्च 2023 आणि 26 मार्च 2023

निकाल जाहीर होण्याचा कालावधी: 27 मार्च ते 27 एप्रिल 2023

 

जिल्हा परिषदांतील आरोग्य विभागाशी संबधीत आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषध निर्माता, आरोग्य पर्यवेक्षक या ५ संवर्गातील पदभरतीचा सुधारित कालबद्ध कार्यक्रम (परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक)

Arogya Bibhag Bharti 2023 Exam Timetable

 

अधिकृत वेबसाईट

 

offer

App Download Link : Download App


आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

 
 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

Arogya Vibhag Bharti 2022,

आरोग्य विभाग,

आरोग्य विभाग भरती,

आरोग्य विभागपरीक्षेचे संभाव्य वेळापत्रक