नील / निळी अर्थव्यवस्था आणि अर्थसंकल्प 2020

339

नील / निळी अर्थव्यवस्था (Blue economy) आणि अर्थसंकल्प २०२०

  • जागतिक बँकेच्या व्याख्येनुसार नील अर्थव्यवस्था म्हणजे समुद्री संसाधनांचा शाश्वत पद्धतीने तसेच समुद्राच्या पर्यावरणातील आरोग्यास जपत केलेला आर्थिक विकास होय.
  • याअंतर्गत सागरी संसाधनांचा शाश्वत विकास, पर्यटन यांवर महत्त्वपूर्ण भर देण्यात येतो.
  • The Blue Economy: 10 Years, 100 Innovations, 100 Million Jobs या गुंटर पाउली लिखित पुस्तकात या संकल्पनेचा प्रथम उल्लेख करण्यात आला.
  • हरित अर्थव्यवस्थे(Green economy)च्या (1.0) दुसऱ्या हरित अर्थव्यवस्था (2.0)” टप्प्याला नील अर्थव्यवस्था म्हणून ओळखले जाते.
  • अर्थसंकल्पीय भाषणात शेतकऱ्यांचे उत्पन्न, बागायती क्षेत्र, अन्नधान्य साठा, पशुसंवर्धन आणि नील अर्थव्यवस्था दुप्पट करण्यावर लक्ष केंद्रित करून 16 कलमी कृती आराखड्याची घोषणा करण्यात आली.
  • सीतारामन यांनी सागरी मत्स्यपालन संसाधनांचा विकास, व्यवस्थापन आणि संवर्धन आणि समुद्री तण आणि केज कल्चरच्या संवर्धनासाठी एक आराखडा निर्माण करण्याचा प्रस्ताव दिला, जो 2022-23 पर्यंत मासळीचे उत्पादन 200 लाख टन करण्यात सहाय्यभूत ठरणार.
  • याकरिता ग्रामीण भागातील तरुणांना मत्स्यव्यवसाय क्षेत्रात सामील करण्यासाठी सागर मित्र आणि मत्स्य उत्पादक संस्था यांच्यामार्फत 3477 तरुणांना मत्स्य व्यवसायात सामील करून घेण्यात येणार 2024-25 पर्यंत मत्स्यव्यवसाय निर्यात 1 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढवण्याचे उद्दिष्ट्य.
  • सहकारी संघराज्याच्या पद्धतीचे अनुसरण करत मॉडेल अ‍ॅग्रीकल्चरल लँड लीजिंग कायदा -2016, मॉडेल कृषी उत्पन्न आणि पशुधन विपणन ( प्रोत्साहन आणि सुलभता) कायदा- 2017 आणि मॉडेल कृषी उत्पन्न आणि पशुधन करार शेती आणि सेवा (प्रोत्साहन आणि सुविधा) कायदा, 2018 ची अंमलबजावणी करणाऱ्या राज्य सरकारांना प्रोत्साहित करण्याचा प्रस्तावही सीतारामन यांनी मांडला.

नील अर्थव्यवस्था आणि हिंदी महासागर

  • आशियामधील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थांना सर्व प्रकारचा पुरवठा करणारे महत्त्वाचे समुद्री जलमार्ग हिंदी महासागरातून जातात. यामुळे हिंदी महासागराचे महत्त्व अधिक शीतयुद्धानंतर झालेल्या संघर्षांपैकी बहुतेक संघर्ष हिंदी महासागराच्या परिसरात झालेले आहेत यामुळेच जगातील प्रमुख सत्तांनी आपली लष्करी उपस्थिती हिंदी महासागराच्या परिसरात ठेवली आहे.
  • भारत तेल, इंधनआयातीवर इतर देशांवर अवलंबून आहे. यातील ७० टक्क्यांपेक्षा जास्त तेल अरब देशांतून आयात होते
    ‘जर्नल ऑफ द इंडियन ओशन’च्या संदर्भानुसार ८० टक्क्यांपेक्षा जास्त तेल वाहतूक ही हिंदी महासागराच्या अत्यंत अरुंद, चिंचोळ्या मार्गातून होते .
  • हिंदी महासागर भागातील आर्थिक वृद्धी आणि संतुलित विकासासाठी १९९७ मध्ये The Indian Ocean Rim Association (IORA) या संस्थेची स्थापना या संस्थेची २० राष्ट्रे सभासद असून ६ राष्ट्रांना निरीक्षक राष्ट्रांचा दर्जा भारताकडून किनारपट्टीवरील व समुद्रातील साधनसंपत्तीचा उपयोग करून ‘निळी’ अर्थव्यवस्था विकसित करण्यावर भरसेशल्स बेटे, भारत आणि नील अर्थव्यवस्था
    सेशल्स बेटे ‘ब्लू इकॉनॉमी’बाबत अग्रेसर आहेत.
  • भारताने सेशल्स बेटांसोबत संयुक्त कृतिगट (जॉइंट वर्किंग ग्रूप) स्थापन केला आहे. पतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाकडून भारत आणि सेशेल्स दरम्यान नील अर्थव्यवस्था अर्थात सागरी अर्थव्यवस्थेसंबंधीच्या क्षेत्रातील सहकार्यासंबंधी कराराच्या आराखड्याच्या प्रोटोकॉलला कार्योत्तर मंजूरी देण्यात आलेली आहे.
  • हा प्रोटोकॉल दोन देशांमध्ये शाश्वत विकास आणि आर्थिक उद्दिष्टांसाठी सागरी अभ्यास तसेच वैज्ञानिक संशोधन आणि समुद्रावर आधारित साधनांचे शोषण यासंदर्भातील नियमावली आणि सहकार्याचे तंत्र याबाबत आहे.
  • या सहकार्यामुळे नील अर्थव्यवस्थेच्या क्षेत्रात भारताचे धोरणात्मक सहकार्य, कौशल्य, तंत्रज्ञान व मानवी संसाधने यांच्या निर्यातीपासून व्यावसायिक लाभ मिळण्यास मदत होणार आहे.
  • याशिवाय, महासागरांमधील स्रोतांपर्यंत पोहचण्यास सेशल्सचे सहकार्य मिळणार असून सेशेल्ससोबत नील अर्थव्यवस्थेच्या क्षेत्रातील सहकार्याने महासागर आधारित स्रोतांच्या नव्या माहितीचे संकलन करता येणार मालदीव,भारत आणि नील अर्थव्यवस्था
    भारतात निर्मिती केलेली जलद इंटरसेप्टर नौका (गस्ती नौका) अधिकृतपणे मालदीव तटरक्षक दलाकडे सुपूर्द करण्यात आलेल्या आहेत .
  • यामुळे मालदीवच्या सागरी सुरक्षेत वाढ होईल तसेच भारत आणि मालदीवमधील नील अर्थव्यवस्था आणि पर्यटनाला प्रोत्साहन मिळेल.
    या गस्ती नौकेला ‘कामयाब’ हे नाव देण्यात आले आहे

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Join Us on Telegram

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम