:- घोषणा :-
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत विभिन्न शासकोय पदांसाठी सुयोग्य उमेदवारांच्या शिफारशी संदर्भात राबविण्यात येणा-या निवडप्रक्रिंयामध्ये वेळोवेळी करावयाच्या विविध सुधारणात्मकउपाययोजनांपैकी एक म्हणजे स्पर्धा परीक्षांस बसणाऱ्या उमेदवारांचे प्रयत्न / संधीची संख्या मर्यादित करणे, याबाबत आयोगाने खालील प्रमाणे निर्णय घेतला आहे:-
(अ)आयोगामार्फत आयोजित होणाऱ्या विभिन्न स्पर्धा परीक्षांमध्ये भाग घेणाऱ्या उमेदवारांस
संधोची कमाल मर्यादा खालीलप्रमाणे निश्चित करण्यात आली आहे:-
(१) खुला (अराखोव) उमेदवारांस कमाल सहा संधी उपलब्ध राहतील.
(२) अनुसुचित जमाती व अनुसुचित जाती प्रवर्गातील उमेदवारांस कमाल संधीची मर्यादा लागू
राहणार नाही.
(३) उर्वरित मागास प्रवर्गातील उमेदवारांस कमाल नऊ संधी उपलब्ध राहतील.
(ब) उमेदवारांची संधीची संख्या खाली नमूद केल्यानुसार लागू राहतील:-
(१) उमेदवाराने पूर्व परीक्षेत भाग घेतल्यास, ही संबंधित स्पर्धा परीक्षेची संधी समजली जाईल.
(२) एखादा उमेदवार पूर्व परीक्षेच्या कोणत्याही एका पेपरसाठी उपस्थित राहिल्यास, त्याची ती
संधी समजली जाईल.
(३) उमेदवार कोणत्याही कारणास्तव परीक्षेच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरल्यास किंवा
त्याची उमेदवारी रद्द झाल्यास तरीही त्याची परीक्षेस उपस्थिती संधी गणली जाईल.
२. परीक्षेच्या कमाल संधीबाबतचा आयोगाचा प्रस्तुत निर्णय सन २०२१ मध्ये प्रसिध्द होणा-या
जाहिरातीस अनुसरुन आयोजित परीक्षांपासून लागू करण्यात येईल.
सचिव
ठिकाण : मुंबई महाराष्ट्र लोकसेवा आयोग
मोफत टेस्ट सोडविण्यासाठी आमचे मोबाईल अँप लगेच डाउनलोड करा
डाउनलोड लिंक : Download Mobile App
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
आमचे टेलीग्राम चॅनल जॉईन करा Click Here : MPSC मराठी व्याकरण
ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे WhatsApp चॅनल जॉईन करा. Join Us on WhatsApp
अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज Join Us on Facebook
आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.