चाफेकर बंधू यांच्या बद्दल संपूर्ण माहिती

वासुदेव चाफेकरांचा जन्म १८८० मध्ये कोकणात चित्पावन ब्राह्मण कुटुंबात झाला.

3,791

दामोदर, वासुदेव व बाळकृष्ण पंत हे तिघे चाफेकर बंधू होते. वासुदेव चाफेकर यांनी दामोदर चाफेकर आणि बाळकृष्ण चाफेकर या त्यांच्या बंधूंसह राजकारणात आणि क्रांतिकारी कारवायांमध्ये भाग घेतला. त्यांनी भारतीय तरुणांना शस्त्रांचे प्रशिक्षण दिले.

चाफेकर बंधू यांच्या बद्दल संपूर्ण माहिती

चाफेकर बंधू
चाफेकर बंधू
  • दामोदर, वासुदेव व बाळकृष्ण पंत हे तिघे चाफेकर बंधू होते.
  • वासुदेव चाफेकरांचा जन्म १८८० मध्ये कोकणात चित्पावन ब्राह्मण कुटुंबात झाला.
  • त्यांनी मराठी भाषेतून शिक्षण घेतले.
  • कालांतराने ते पुण्यातील चिंचवड येथे स्थायीक झाले.
  • वडील हरिपंत पुणे व मुंबईत हरिकथा सांगायचे त्यामुळे चाफेकर बंधूच्या शिक्षणात खंड पडला.
  • बालवयात तिघेही भाऊ हरी किर्तनात वडिलांना मदत करायचे, पुण्यातील राजकीय घडामोडींना प्रेरित होऊन चळवळीकडे वळले.
  • वासुदेव चाफेकर यांनी दामोदर चाफेकर आणि बाळकृष्ण चाफेकर या त्यांच्या बंधूंसह राजकारणात आणि क्रांतिकारी कारवायांमध्ये भाग घेतला.
  • त्यांनी भारतीय तरुणांना शस्त्रांचे प्रशिक्षण दिले.
चाफेकर बंधू
चाफेकर बंधू
  • पुण्यातील राजकीय घडामोडींनी प्रेरित होऊन हे भाऊ क्रांतिकारक चळवळीकडे वळले.
  • बिटीशांनी आणलेल्या संमती वयाच्या विधेयकास त्यांचा तीव्र विरोध होता.
  • भारतीय संस्कृतीत हस्तक्षेप करणाऱ्या ब्रिटिशानविरुद्ध टिळकांनी केसरी मधून घणाघाती प्रहार करण्यास सुरूवात केली होती. या अवाहनाने तिन्ही भाऊ प्रेरित झाले व त्यांनी लोकसंघटन केले.
  • या आवाहनाने तीनही भाऊ प्रेरित झाले.
  • त्यांनी लोकसंघटन केले.
  • याचवेळी पुण्यात प्लेगच्या साथीने अक्राळविक्राळ स्वरूप धारण केल्याने ब्रिटिशांनी वॉल्टर चार्ल्स रॅंडला भारतात पाचारण केले.
  • रॅंडने रोग निवारण करण्याच्या उपायांची सक्तीने अंमलबजावणी सुरू केली.
  • हे करताना त्याने सामाजिक पायदंड पायदळी तुडवून लोकांचा असंतोष ओढवून घेतला.
  • यामुळे चाफेकर बंधूच्या मनात ब्रिटिशाविरुद्ध तिरस्कार निर्माण झाला.
  • या सार्‍यांचा सूड घेण्याची योजना त्यांनी तयार केली.
चाफेकर बंधू
चाफेकर बंधू
  • इंग्लंडच्या राणीच्या राज्यरोहणाचा हिरक महोत्सव घोषित झालेला दिवस १७ फेब्रुवारी १८९७ हा होता.
  • या वेळेपर्यंत पुण्यात कमिशनर रँडने प्लेग या आजाराच्या निमीत्ताने प्रजेला मदत देण्याऐवजी अनेक प्रकारचे अत्याचार केले होते.
  • या निमित्ताने दहस्त वाढवण्याचा प्रयत्नही झाला होता.
  • २२ जून १८९७ रोजी दामोदर पंत चाफेकर बंधूनी मध्यरात्री नंतर गणेश खिंडीतील गव्हर्नर साहेबांकडे मेजवानी आटपून घोडागाडीतून शहरात परतनाऱ्या कॅ. रॅड व आयस्टर वर गोळ्या झाडल्या.
  • आयस्टर तर जागेवरच ठार झाला तर रॅड साहेब ३ जुलै १८९७ ला मृत्यू पावले.
  • चाफेकर बंधू निसटण्यात यशस्वी झाले नंतर तिघा भावांनाही पकडण्यात आले.
  • दामोदरला मुंबईत अटक झाली व १८ एप्रिल १८९८ रोजी त्यास फासावर चढवण्यात आले.
  • त्याच पाठोपाठ वासुदेवाला ८ मे १८९९ व बाळकृष्णाला १६ मे १८९९ रोजी फासावर चढवण्यात आले  व चाफेकर बंधु शहीद झाले.

स्मारक : 

  • पुण्यानजीक असलेल्या चिंचवड गावाजवळच्या चौकाला चाफेकर चौक म्हणतात.
  • या चौकात मध्यभागी एका टॉवरमध्ये दामोदर चापेकर यांचा १९७१मध्ये उभारलेला पुतळा होता.
  • मात्र तो पुतळा रस्ता रुंदीकरणाच्या व उड्डाणपुलाच्या कामाच्या कारणाने २०१० मध्ये हलविण्यात आला.
  • त्यानंतर चौकातच चापेकर बंधूंच्या समूह शिल्पाचे काम सुरू करण्यात आले होते.
  • मात्र हे काम या ना त्या कारणावरुन सतत रखडत होते.
  • क्रांतिकारकांचे पुतळे तीन ते साडेतीन फुटांचे आणि त्यांखाली एक छोटा चौथरा अशा पद्धतीने काम चालू होते.
  • परंतु क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीचे गिरीश प्रभुणे, बाळकृष्ण पुराणिक आदींनी या प्रकल्पातील त्रुटी निदर्शनास आणल्या.
  • त्यानंतर तत्कालीन महापालिका आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी चालू काम थांबवून नव्याने आराखडा करण्यास सांगितले.

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Table of Contents

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम