Current Affairs : 17 April 2020 | चालू घडामोडी : १७एप्रिल २०२०

137

Current Affairs

चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाईट ला रोज भेट द्या.

Visit Regularly our site to check Current Affairs

Current Affairs : 17 April 2020 | चालू घडामोडी : १७ एप्रिल २०२०

चालू घडामोडी – 

‘अमेरिकेपेक्षा आपण श्रेष्ठ आहोत हे दाखवण्यासाठी चीनने पसरवला करोना’; अमेरिकन सुत्रांचा दावा :
  • संसर्गजन्य आजारांना कारणीभूत असणाऱ्या विषांणूंवर अमेरिकेपेक्षा चीन जास्त सक्षम आणि प्रभावीपणे काम करु शकतो हे सिद्ध करण्यासाठी चीनने वुहान येथील प्रयोगशाळेमधून करोना विषाणू पसरवल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या शक्यतेवर विश्वास बसण्यासारखी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे, असं अमेरिकन प्रशासनातील काही अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
  • यासंदर्भातील वृत्त ‘फॉक्स न्यूज’ने दिलं आहे. हा दावा खरा आहे हे सिद्ध करण्यासाठी अमेरिकेमध्ये चीनने करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजनांचा संदर्भ दिला जात आहे. अमेरिकेपेक्षा आपण अधिक श्रेष्ठ आहोत हे दाखवण्यासाठी चीनने कोरनाचा फैलाव केल्याचा दावा अमेरिकेमधील प्रशासनाशी संबंधित काही सुत्रांनी केल्याचे ‘फॉक्स न्यूज’ने म्हटले आहे.
  • वटवाघुळाच्या माध्यमातून करोनाचा संसर्ग मानवाला होऊ शकतो का यासंदर्भातील संशोधन वुहानमधील प्रयोगशाळेमध्ये सुरु होते. त्याचवेळी ‘पेशंट झिरो’ म्हणझेच ज्याला पहिल्यांदा करोना विषाणूचा संसर्ग झाला अशी व्यक्ती वुहानमधील स्थानिकांच्या गर्दीमध्ये फिरत राहिल्याने संसर्ग वाढत गेल्याचा दावा प्रशासनामधील सुत्रांनी केला आहे.
  • चीन सरकारने करोना संसर्ग आणि त्याबद्दलची माहिती लपवून ठेवल्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. चीनमधील करोना संसर्गाबद्दल उपलब्ध असणाऱ्या पब्लिक डॉक्युमेंट म्हणजेच सार्वजनिक प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असणाऱ्या कागदपत्रांच्या आधारे हा दावा केला जात आहे. करोना म्हणजे चीन सरकारने आतापर्यंत केलेला सर्वात महागडी लपवाछपवी असल्याचेही सुत्रांचे म्हणणे आहे.
धक्कादायक, चीनमध्ये करोनाची लक्षणे नसलेल्यांकडून ४४ टक्के नागरिकांना Covid-19 ची लागण :
  • करोनाची कुठलीही लक्षणे आढळून न आलेल्या व्यक्तींकडून चीनमध्ये ४४ टक्के नागरिकांना करोना व्हायरसची लागण झाली. चीनमध्ये एका अभ्यासातून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे.
  • करोनाची लागण झाल्यानंतर ती लक्षणे दिसून येण्याच्या दोन ते तीन दिवस आधी एका व्यक्तीमधून दुसऱ्या व्यक्तीमध्ये करोना व्हायरसचे संक्रमण होते असा चिनी अभ्यासकांचा अंदाज आहे. १५ एप्रिलला नेचर मेडिसीनमध्ये हा स्टडी रिपोर्ट प्रकाशित करण्यात आला आहे.
  • चिनी अभ्याकांचा हा निष्कर्ष निश्चित विचार करायला भाग पाडणार आहे. कारण करोना व्हायरसची लक्षणे आढळून आली तरच चाचणी करण्याची भारताची सध्याची रणनिती आहे. ज्यांनी परदेश प्रवास केला आहे तसेच करोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांची करोना चाचणी केली जात आहे.
भारतात २४ नमुन्यांमागे एक रिपोर्ट करोना पॉझिटिव्ह :
  • भारतात २४ नमुन्यांची Covid-19 ची चाचणी केल्यानंतर एकाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह येत आहे. सरकार आणि इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने ही माहिती दिली. जपान, इटली, अमेरिका आणि यूके या देशांशी तुलना केल्यास त्यांनी एक करोना पॉझिटिव्ह रुग्ण शोधून काढण्यासाठी भारतापेक्षाही कमी चाचण्या केल्या आहेत.
  • “जपानमध्ये ११.७ चाचण्यांमागे एकाचा करोना टेस्टचा रिपोर्ट पॉझिटिव्ह येत आहे. इटलीत ६.७ नमुन्यांमागे एक पॉझिटिव्ह रुग्ण सापडत आहे. अमेरिकेत ५.३ तर यूकेमध्ये ३.४ चाचण्या करण्यात आल्या” आयसीएमआरचे आर.आर.गंगाखेडकर यांनी ही माहिती दिली. अन्य देशांच्या तुलनेत भारतात चाचण्यांचे प्रमाण कमी नाहीय. २४ पैकी २३ जणांच्या नमुन्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह येत आहेत असे त्यांनी सांगितले.
  • काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी काल पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी भारतात करोना चाचणीचे प्रमाण खूप कमी असल्याचे सांगितले. चाचणी हाच करोनावर नियंत्रण मिळवण्याचा एका मार्ग आहे असे राहुल गांधी म्हणाले. सध्या ज्यांच्यामध्ये करोनाची लक्षणे दिसतायत तसेच श्वसनासंबंधीचे त्रास दिसून येत आहेत, त्यांच्या चाचण्या करण्यात येत आहेत. हॉटस्पॉट असलेल्या भागांमध्ये विशेष लक्ष ठेवण्यासाठी रॅपिड अँटीबॉडी टेस्टही सुरु आहेत. करोनाचा एकही पॉझिटिव्ह रुग्ण सुटू नये, यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहेत असे आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी सांगितले.
देशभरातल्या ३२५ जिल्ह्यांमध्ये करोनाचा शिरकाव नाही, आरोग्य मंत्रालयाची माहिती :
  • देशभरातल्या ३२५ जिल्ह्यांमध्ये करोनाचा शिरकाव झालेला नाही अशी माहिती केंद्राच्या आरोग्य विभागाने दिली आहे. देशाच्या दृष्टीने ही महत्त्वाची बाब आहे.
  • केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ही माहिती दिली आहे. काही वेळापूर्वी पार पडलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली आहे. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ३ मेपर्यंत लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. WHO अर्थात जागतिक आरोग्य संघटनेशी आमची चर्चा झाली असंही आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केलं.
  • देशात १७० जिल्हे हॉटस्पॉट आहेत. तिथे करोनाचा प्रादु्र्भाव रोखण्यासाठी जे जे आवश्यक प्रयत्न आहेत ते करण्यात येत आहेत. लॉकडाउनचा वाढलेल्या वेळ हा आम्हाला उपाय योजना करण्यासाठी महत्त्वाचा ठरतो आहे असंही अग्रवाल यांनी म्हटलं आहे.आत्तापर्यंत देशभरात २ लाख ९० हजार ४०१ लोकांच्या चाचण्या घेण्यात आल्या आहेत. अशीही माहितीही आरोग्य मंत्रालयाने दिली.

     

     

    # Current Affairs


    ✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

    ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Join Us on Telegram

    ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

    अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

    आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

     

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम