चालू घडामोडी : २१ एप्रिल २०२१

100

Current Affairs

चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाईट ला रोज भेट द्या.

Visit Regularly our site to check Current Affairs

Current Affairs : 21 April 2021 | चालू घडामोडी : २१ एप्रिल २०२१

चालू घडामोडी – 

1] “आदित्य–एल1” याच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या:*
1. ही भारताची दुसरी सूर्य-मोहीम आहे.
2. अंतराळ संशोधन सल्लागार समितीने जानेवारी 2008 मध्ये या मोहिमेची कल्पना मांडली होती.
दिलेल्यापैकी कोणते विधान अचूक आहे?

1) फक्त 1
2) फक्त 2
3) A आणि B
4) यापैकी नाही

उत्तर :- केवळ विधान 2 अचूक आहे; त्यामुळे पर्याय (B) उत्तर आहे.
भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) “आदित्य–एल1” (Aditya-L1) या नावाने प्रथम सूर्य मोहीम अंतराळात प्रक्षेपित करणार आहे. मोहिमेला L1 (लॅगरेंज बिंदू-1) याच्या आस-पास कोरोना (सुर्याचे प्रभामंडळ) कक्षेत पाठवले जाणार आहे, जे की पृथ्‍वीपासून 1.5 दशलक्ष किलोमीटर दूर आहे. कोरोना क्षेत्रात जे सूर्याच्या पृष्ठभागापासून अगदी जवळचे क्षेत्र असते. या मोहिमेचे संचालन नैनीताल येथील आर्यभट्ट रिसर्च इंस्टीट्यूट फॉर ऑब्झर्वेशनल सायन्सेस (ARIES) ही केंद्र करणार आहे. 

# Current Affairs


चालू घडामोडी – 

2] कोणत्या राज्यात इटली देशाच्या मदतीने प्रथमच मेगा फूड पार्क प्रकल्प उभारण्यात आला?

1) गुजरात
2) कर्नाटक
3) पंजाब
4) राजस्थान

उत्तर :- गुजरात राज्यात इटली देशाच्या मदतीने प्रथमच एक मेगा फूड पार्क प्रकल्प उभारण्यात आला. हा प्रकल्प गुजरातमधील फणीधर मेगा फूड पार्क येथे आहे. 

# Current Affairs


चालू घडामोडी – 

3] कोणत्या मंत्रालयाने “स्टार्टअप इंडिया बीज निधी योजना (SISFS)” याचा प्रारंभ केला?

1) कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय
2) वाणिज्य व उद्योग मंत्रालय
3) कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालय
4) कंपनी कार्य मंत्रालय

उत्तर :- दिनांक 19 एप्रिल 2021 रोजी केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी “स्टार्टअप इंडिया बीज निधी योजना (SISFS)” याचा प्रारंभ केला. संकल्पना, प्रोटोटाईप विकास, उत्पादन चाचण्या, बाजारपेठ प्रवेश आणि व्यापारीकरण यासाठी स्टार्टअप कंपन्यांना वित्तीय सहाय्य पुरवण्याचा या निधीचा उद्देश आहे. पात्र स्टार्टअप कंपन्यांना बीज भांडवलासाठी 945 कोटी रुपयांचा भांडवली निधी येत्या चार वर्षात विभागला जाईल. 

# Current Affairs


चालू घडामोडी – 

4] कोणत्या दिवशी ‘आंतरराष्ट्रीय स्मारके व स्थळे दिन’ साजरा करतात?

1) 19 एप्रिल
2) 17 एप्रिल
3) 20 एप्रिल
4) 18 एप्रिल

उत्तर :- संयुक्त राष्ट्रसंघ शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटना (UNESCO) याच्या नेतृत्वात 18 एप्रिल 2021 रोजी ‘आंतरराष्ट्रीय स्मारके व स्थळे दिन’ किंवा ‘जागतिक वारसा दिन’ साजरा करण्यात आला. यावर्षी “कॉम्प्लेक्स पास्ट्स: डायव्हर्स फ्युचर्स” या संकल्पनेखाली हा दिवस साजरा करण्यात आला आहे.
या दिवशी आपला सांस्कृतिक वारसा जतन करण्याच्या हेतूने आणि या क्षेत्रातील सर्व संबंधित संस्थांच्या प्रयत्नांविषयी जागृती निर्माण केली जाते. 

# Current Affairs


चालू घडामोडी – 

5] कोणत्या देशाने 2050 सालापर्यंत हरितगृह वायूंचे उत्सर्जन 2015 सालाच्या तुलनेत 80 टक्क्यांनी कमी करण्याविषयीची राष्ट्रीय योजना जाहीर केली?

1) इस्त्रायल
2) भारत
3) पाकिस्तान
4) चीन

उत्तर :- इस्रायल देशाने 2050 सालापर्यंत हरितगृह वायूंचे उत्सर्जन 2015 सालाच्या तुलनेत 80 टक्क्यांनी कमी करण्याविषयीची राष्ट्रीय योजना जाहीर केली आहे. 

# Current Affairs


चालू घडामोडी – 

6] कोणती व्यक्ती नागालँड सरकारच्या देशी रहिवाशांच्या संदर्भातल्या संयुक्त सल्लागार समितीचे अध्यक्ष असणार?

1) अरुणा सुंदरराजन
2) स्मिता सभरवाल
3) अभिजित सिन्हा
4) आर्मस्ट्रांग पाम

उत्तर :- नागालँड सरकारने देशी रहिवाशांच्या संदर्भात एक संयुक्त सल्लागार समिती नेमली आहे आणि त्याचे नेतृत्व अभिजित सिन्हा यांच्याकडे सोपवले आहे. समिती नागालँडच्या देशी रहिवाशांची नोंदणी यादी तयार करणार आहे. 

# Current Affairs


चालू घडामोडी – 

7] कोणत्या राज्यात डिस्क-फूटेड वटवाघूळ नामक भारताचा बांबूमध्ये राहणाऱ्या वटवाघूळाची नोंद झाली?

1) हिमाचल प्रदेश
2) काश्मिर
3) केरळ
4) मेघालय

उत्तर :- मेघालय राज्यात नोंगखिलेम अभयारण्याजवळ डिस्क-फूटेड वटवाघूळ (युडीस्कोपस डेंटिक्युलस), जो भारताचा बांबूमध्ये राहणारा वटवाघूळ आहे, याची नोंद झाली. 

# Current Affairs


चालू घडामोडी – 

8] किती देशांना काळ्या समुद्राची सीमा लाभलेली आहे?

1) 8
2) 6
3) 7
4) 5

उत्तर :- काळा समुद्र हा आशिया आणि युरोप या खंडांदरम्यान येणारा अटलांटिक महासागराचा एक भाग आहे. बल्गेरिया, रशिया, टर्की, जॉर्जिया, रोमानिया आणि युक्रेन हे देश काळ्या समुद्राच्या सीमेवर आहेत. 

# Current Affairs


चालू घडामोडी – 

9] ‘ग्रास (occultation)’ या संज्ञेचा अर्थ काय होतो?

1) जेव्हा एखादा खगोल दुसर्‍या एखाद्या खगोलाद्वारे लपविला जातो
2) हवेच्या हालचालीचा अभ्यास
3) लहरीच्या दिशेतील बदल
4) पूर्ण परिक्रमांची संख्या

उत्तर :- ‘ग्रास (occultation)’ ही एक खगोलशास्त्रातील एक घटना आहे, ज्याचा अर्थ ‘जेव्हा एखादा खगोल दुसर्‍या एखाद्या खगोलाद्वारे लपविला जातो’ असा होतो. 

# Current Affairs


चालू घडामोडी – 

10] ‘रेवाकोनोडोन इंडिकस’ हा एक _____ आहे.

1) सरड्यासारखा लहान सरपटणारा प्राणी
2) सापासारखा लहान सरपटणारा प्राणी
3) उंदीरासारखा लहान प्राणी
4) मांजरीसारखा लहान प्राणी

उत्तर :- मध्यप्रदेशच्या शहडोल जिल्ह्यातील तिहकी खेड्यात ‘रेवाकोनोडोन इंडिकस’ नामक उंदीरासारख्या लहान प्राण्याचे जीवाश्म आढळून आले आहे, जे जवळजवळ 220 दशलक्ष वर्षांपूर्वी अस्तित्वात होते. 

# Current Affairs


 

 

 

मोफत टेस्ट सोडविण्यासाठी आमचे  मोबाईल अँप लगेच डाउनलोड करा 

डाउनलोड लिंक : Download Mobile App


आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

 
 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Click Here : MPSC मराठी व्याकरण

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

Table of Contents

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम