Current Affairs : 23 December 2020 | चालू घडामोडी : २३ डिसेंबर २०२०

185

Current Affairs

चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाईट ला रोज भेट द्या.

Visit Regularly our site to check Current Affairs

Current Affairs : 23 December 2020 | चालू घडामोडी : २३ डिसेंबर २०२०

चालू घडामोडी – 

“E5 सिरिज शिंकान्सेन” ही जपानी हाय-स्पीड ट्रेन आहे, जी पूर्व जपान रेल्वे कंपनी संचालित करते. जपानी हाय-स्पीड ट्रेन तंत्रज्ञानाचा वापर करून मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प राबविला जाणार आहे. 

# Current Affairs


चालू घडामोडी – 

चीनच्या गुईझो प्रांतातल्या पिंगटांग या गावी पाचशे मिटर व्यासाचे अपर्चर असलेली गोलाकार रेडियो दुर्बिण उभारण्यात आली आहे, जी जगातली सर्वात मोठी रेडियो दुर्बिण आहे. 

# Current Affairs


चालू घडामोडी – 

आफ्रिकेमध्ये ‘कौसकौस’ नामक एक बर्बर व्यंजन तयार केले जाते. कौसकौस, झांबियाचे बाउदिमा नृत्य, सिंगापूरची हॉकर संस्कृती आणि स्पेनचा वाईन घोडा यांना ‘UNESCO अमूर्त सांस्कृतिक वारसा’ यादीमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. 

# Current Affairs


चालू घडामोडी – 

1921 साली गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी स्थापना केलेले ‘विश्वभारती’ हे देशातले सर्वात जुने केंद्रीय विद्यापीठ आहे. मे 1995 मध्ये संसदेच्या कायद्यानुसार विश्वभारती हे केंद्रीय विद्यापीठ “राष्ट्रीय महत्वाची संस्था” म्हणून घोषित करण्यात आले. विद्यापीठाने गुरुदेव टागोरांनी आखलेल्या अध्यापनशास्त्राचे अनुसरण केले, हळूहळू यात इतर विद्यापीठांनुसार बदल होत गेला. पंतप्रधान हे विद्यापीठाचे कुलपती आहेत. 

# Current Affairs


चालू घडामोडी – 

नुकत्याच पार पडलेल्या चंद्रयान मोहिमेच्या काळात चीनने चांग’ए-5 यानाच्या माध्यमातून चंद्राच्या पृष्ठभूमीवर आपला राष्ट्रीय झेंडा फडकवला आहे. यापूर्वी अमेरिकेनेही 1969 साली अपोलो मोहिमेत आपला झेंडा चंद्रावर फडकवला होता. चीनने 23 नोव्हेंबर रोजी हे यान चंद्रावर पाठविले होते. दोन दिवसांच्या वास्तव्यानंतर या यानाने काही नमुने गोळा करून, पृथ्वीच्या दिशेने रवाना झाले. 

# Current Affairs


चालू घडामोडी – 

तेलंगणाच्या निर्मल जिल्ह्यात माकडांसाठी दक्षिण भारतातले पहिले बचाव व पुनर्वसन केंद्र उभारले जात आहे. असेच एक केंद्र हिमाचल प्रदेशामध्ये देखील आहे. 

# Current Affairs


चालू घडामोडी – 

“ढोक्रा” हा एक अलोह धातू प्रकार आहे, जो 4000 वर्षांपासून भारतात वापरला जात आहे आणि अद्यापही वापरला जातो. ते लॉस्ट-वॅक्स कास्टिंग तंत्रामध्ये वापरले जाते.
ट्राईब इंडिया याच्या “आमच्या घरापासून ते तुमच्या घरापर्यंत” या मोहिमेच्या 7व्या आवृत्तीच्या कार्यक्रमात ढोक्रापासून तयार केलेल्या उत्पादनांचा समावेश करण्यात आला आहे. 

# Current Affairs


चालू घडामोडी – 

21 डिसेंबर 2020 रोजी नौदलाचे वाइस अॅडमिरल संदीप नैथानी यांनी ‘नियंत्रक (युद्धनौका उत्पादन व संपादन)’ याचा पदभार स्वीकारला. 

# Current Affairs


चालू घडामोडी – 

क्रिडा मंत्रालयाने हरयाणामध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या ‘खेलो इंडिया यूथ गेम्स-2021’ या स्पर्धांमध्ये देशी खेळांचा समावेश करण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. त्यानुसार, गटका, कलारीपयट्टू, थांग-ता आणि मल्लखांब या खेळांची निवड करण्यात आली आहे. 

# Current Affairs


चालू घडामोडी – 

अशोकनगर (उत्तर 24-परगणा, पश्चिम बंगाल) येथील देशातल्या आठव्या तेल व वायू उत्पादन प्रकल्पाचे (किंवा ऊर्जा निर्मिती खोऱ्याचे) राष्ट्रार्पण करण्यात आले आहे. अशोकनगर-1 येथील विहीर तेलनिर्मितीची पहिली विहीर म्हणून भारत सरकारच्या जलद उत्पन्न योजनेच्या अंतर्गत पूर्ण झाली. बंगाल खोरे सुमारे 1.22 लक्ष चौरस किलोमीटरच्या क्षेत्रात पसरलेले आहे, ज्याचा दोन तृतीयांश भाग बंगालच्या उपसागराच्या पाण्याखाली येतो. 

# Current Affairs


 

 

 

 

मोफत टेस्ट सोडविण्यासाठी आमचे  मोबाईल अँप लगेच डाउनलोड करा 

डाउनलोड लिंक : Download Mobile App


आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

 
 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Click Here : MPSC मराठी व्याकरण

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

Table of Contents

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम