चालू घडामोडी सराव पेपर -28 मे 2020
येणाऱ्या स्पर्धा परीक्षांना अनुसरून खास आपल्या सरावा साठी MPSCExams.com टेस्ट सिरीस सुरु करत आहे. यासाठी आपण सर्व पेपर्स सोडवून येत्या भरतीच्या ऑनलाईन परीक्षेची तयारी करू शकता पूर्ण मोफत. तसेच आम्ही या सदरात नविन पेपर सरावासाठी नेहमी उपलब्ध करून देऊ. तेव्हा रोज भेट देत रहा MPSCExams.com ला… मिंत्रानो सर्व पेपर्स आपण मोफत ऑनलाईन सोडवू शकता, तसेच या साठी कुठलेही रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही.. धन्यवाद!!!
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: चालू घडामोडी सराव पेपर -28 मे 2020
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
चालू घडामोडी सराव पेपर -28 मे 2020
Quiz-summary
0 of 10 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
3) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
4) तुमचा ईमेल आयडी टाका
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 10 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Current Affaiers 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- Answered
- Review
-
Question 1 of 10
1. Question
1 pointsकोणत्या देशाने मे 2020 महिन्यात हवेतच विमानाला नष्ट करू शकणाऱ्या लेझर शस्त्राची चाचणी घेतली?
Correct
Incorrect
अमेरिकन नौदलाने 22 मे 2020 रोजी प्रशांत महासागरामध्ये हवेतच विमानाला नष्ट करू शकणाऱ्या ‘सॉलिड-स्टेट लेझर’ शस्त्राची चाचणी घेतली. टेक्नॉलॉजी मॅच्युरेशन लेझर वेपन सिस्टम डेमॉन्स्ट्रेटर (LWSD) असे या शस्त्राचे नाव अहे.
-
Question 2 of 10
2. Question
1 pointsकोणत्या भारतीय अधिकाऱ्याला यूनायटेड नेशन्स मिलिटरी जेंडर अॅडव्होकेट ऑफ द इयर हा सन्मान जाहीर झाला?
Correct
Incorrect
दक्षिण सुदान देशात कार्यरत राहिलेल्या मेजर सुमन गवनी या भारतीय महिला शांतीदूत सैनिकाची 2019 सालासाठी यूनायटेड नेशन्स मिलिटरी जेंडर अॅडव्होकेट ऑफ द इयर पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. त्या हा पुरस्कार मिळविणाऱ्या प्रथम भारतीय ठरल्या.
-
Question 3 of 10
3. Question
1 pointsचंबा बोगदा कोणत्या प्रकल्पांतर्गत तयार केला गेला आहे?
Correct
Incorrect
दिनांक 26 मे 2020 रोजी व्हिडिओ कॉन्फरन्स मोडच्या माध्यमातून केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री आणि MSME मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते चारधाम प्रकल्पाच्या अंतर्गत चंबा बोगद्याचे उदघाटन करण्यात आले. सीमा रस्ते संघटनेनी (BRO) ऋषिकेश-धारासू रस्ते महामार्गावरील (NH-94 ) व्यस्त चंबा शहराच्या खाली 440 मीटर लांबीचा बोगदा खणून हा महत्त्वपूर्ण टप्पा पार केला. उत्तराखंडमधील या ऋषिकेश-धारसू-गंगोत्री रस्त्याची सामाजिक-आर्थिक आणि धार्मिक दृष्टीकोनातून महत्त्वपूर्ण भूमिका आहे.
-
Question 4 of 10
4. Question
1 pointsकोणत्या कंपनीने आरोग्य कर्मचार्यांना पौष्टिक भोजन पुरवण्यासाठी REC लिमिटेड या कंपनीसोबत भागीदारी केली?
Correct
Incorrect
केंद्र सरकारच्या ऊर्जा मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असलेला आणि ऊर्जा क्षेत्राला मोठ्या प्रमाणावर वित्तपुरवठा करणारा सार्वजनिक उपक्रम म्हणजे ग्रामीण विद्युतीकरण महामंडळ (REC) यांच्यावतीने सरकारी रुग्णालयातले आरोग्य कर्मचारी, वैद्यकीय कर्मचारी यांना मोठ्या प्रमाणावर भोजन उपलब्ध करून देण्यात येत आहे. REC प्रतिष्ठानच्यावतीने सामाजिक दायित्व अंतर्गत ताजसॅटस या हवाई प्रवास क्षेत्रातल्या अन्नपुरवठा कंपनी सोबत एक सामंजस्य करार करण्यात आला आहे. या उपक्रमाच्या अंतर्गत नवी दिल्लीत 18,000 खाद्यान्न पाकिटांचे वितरण करण्यात येणार आहे.
-
Question 5 of 10
5. Question
1 pointsभारतीय तंटा निराकरण केंद्राचे (IDRC) मुख्य कार्यालय कुठे आहे?
Correct
Incorrect
न्यायमूर्ती ए. के. सिक्री यांच्या हस्ते नवी दिल्लीत भारतीय तंटा निराकरण केंद्राचे (Indian Dispute Resolution Centre -IDRC) उद्घाटन करण्यात आले. हे केंद्र कागदविरहित प्रक्रिया चालविण्यास वातावरण प्रदान करते. हे केंद्र अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्जित आहेत.
-
Question 6 of 10
6. Question
1 pointsजागतिक थायरॉईड दिवस कधी पाळला जातो?
Correct
Incorrect
दरवर्षी 25 मे या दिवशी जागतिक थायरॉईड दिवसपाळला जातो. थायरॉईड ही एक कंठग्रंथी आहे आणि थायरॉईड हार्मोन तयार करते जे शरीराच्या विविध चयापचय प्रक्रियांसाठी आवश्यक असते. यांच्यासंबंधित मुद्द्यांविषयी आणि आजारांबद्दल जनजागृती वाढविण्यासाठी हा दिवस पाळला जातो.
-
Question 7 of 10
7. Question
1 pointsकोणत्या व्यक्तीला न्यूयॉर्क इंटेलेक्चुवल प्रॉपर्टी लॉ असोसिएशन या संस्थेच्या वतीने इंव्हेंटर ऑफ द इयर हा सन्मान जाहीर केला गेला?
Correct
Incorrect
राजीव जोशी (भारतीय-अमेरिकावासी) हे न्यूयॉर्क इंटेलेक्चुवल प्रॉपर्टी लॉ असोसिएशन या संस्थेचा प्रतिष्ठित इंव्हेंटर ऑफ द इयर या पुरस्काराचे विजेता ठरले. हा पुरस्कारतींना त्यांच्या इलेक्ट्रॉनिक उद्योग क्षेत्रात केलेल्या कामगिरीबद्दल आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षमता सुधारण्यासाठी दिलेल्या योगदानाबद्दल दिला गेला. राजीव जोशी न्यूयॉर्कमधील IBM थॉमसन वॉटसन रिसर्च सेंटर येथे काम करतात आणि त्याच्यानावे 250 हून अधिक पेटंट आहेत.
-
Question 8 of 10
8. Question
1 pointsकोणत्या राज्याने श्रम सिद्धी योजना राज्यात लागू केली?
Correct
Incorrect
मध्यप्रदेश सरकारने 22 मे 2020 रोजी श्रम सिद्धी योजना राज्यात लागू केली. या योजनेंतर्गत ग्रामीण भागातल्या सर्व व्यक्तींना सरकार काम देणार आहे. या योजनेंतर्गत प्रत्येकाला घरोघरी जाऊन जॉब कार्ड उपलब्ध करुन दिले जाणार तसेच कुशल-अकुशल कामगारांना मनरेगा अंतर्गत रोजगार उपलब्ध करून देण्यात येणार.
-
Question 9 of 10
9. Question
1 pointsकोणत्या देशाला जिंजा जिल्ह्यात एक मिलिटरी वॉर गेम सेंटर उभे करण्यासाठी भारताकडून मदत केली जात आहे?
Correct
Incorrect
युगांडा देशाला जिंजा जिल्ह्यात एक मिलिटरी वॉर गेम सेंटर उभे करण्यासाठी भारताकडून मदत केली जात आहे. या केंद्राचे नाव इंडिया असे ठेवले जाणार आहे. हे केंद्र 1 अब्ज युगांडा शिलिंग किंवा 2,65,000 डॉलर एवढे खर्चून उभे केले जाणार आहे.
-
Question 10 of 10
10. Question
1 pointsकोणत्या देशाने कोविड-19 रोगावर जलद तपासणी साधन विकसित करण्यासाठी भारताशी भागीदारी केली?
Correct
Incorrect
इस्त्रायल देशाने कोविड-19 रोगावर जलद तपासणी साधन विकसित करण्यासाठी भारताशी भागीदारी केली आहे. इस्रायलच्या संरक्षण मंत्रालयातले संशोधन व विकास संचालनालय भारतातल्या वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन परिषद (CSIR) आणि संरक्षण संशोधन व विकास संस्था (DRDO) यांच्या सहकार्याने यासाठी कार्य करणार आहे.
Table of Contents