चालू घडामोडी सराव पेपर -29मे 2020
येणाऱ्या स्पर्धा परीक्षांना अनुसरून खास आपल्या सरावा साठी MPSCExams.com टेस्ट सिरीस सुरु करत आहे. यासाठी आपण सर्व पेपर्स सोडवून येत्या भरतीच्या ऑनलाईन परीक्षेची तयारी करू शकता पूर्ण मोफत. तसेच आम्ही या सदरात नविन पेपर सरावासाठी नेहमी उपलब्ध करून देऊ. तेव्हा रोज भेट देत रहा MPSCExams.com ला… मिंत्रानो सर्व पेपर्स आपण मोफत ऑनलाईन सोडवू शकता, तसेच या साठी कुठलेही रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही.. धन्यवाद!!!
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: चालू घडामोडी सराव पेपर -29मे 2020
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
चालू घडामोडी सराव पेपर -29मे 2020
Quiz-summary
0 of 10 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
3) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
4) तुमचा ईमेल आयडी टाका
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 10 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Current Affaiers 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- Answered
- Review
-
Question 1 of 10
1. Question
1 pointsकोणत्या व्यक्तीची न्यू डेव्हलपमेंट बँक या संस्थेच्या अध्यक्ष पदावर निवड झाली?
Correct
Incorrect
ब्राझीलचे मार्कोस प्राडो ट्रोयजो यांची न्यू डेव्हलपमेंट बँक या संस्थेच्या अध्यक्ष पदावर निवड झाली आहे. बँकेचे पहिले आणि विद्यमान अध्यक्ष के. व्ही. कामत यांच्या जागी ही निवड झाली आहे.BRICSच्या सदस्य देशांनी (ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण अफ्रीका) 2014 साली न्यू डेव्हलपमेंट बँक (NDB) स्थापन केली होती. 15 जुलै 2014 रोजी बँकेची स्थापना झाली. बँकेचे मुख्यालय शांघाय (चीन) येथे आहे. या बँकेचा उद्देश BRICS आणि अन्य उदयोन्मुख बाजार अर्थव्यवस्था आणि विकसनशील देशांमध्ये पायाभूत आणि शाश्वत विकास प्रकल्पांसाठी व्यापक संसाधने जमवणे हा आहे.
-
Question 2 of 10
2. Question
1 pointsकोणत्या संस्थेनी कोविड कथा या पुस्तकाची हिंदी आवृत्ती प्रसिद्ध केली?
Correct
Incorrect
डॉ. अनामिका रे मेमोरियल ट्रस्ट या संस्थेच्या सहकार्याने राष्ट्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान संप्रेषण परिषद (NCSTC) या संस्थेनी कोविड कथा या पुस्तकाची हिंदी आवृत्ती प्रसिद्ध केली. यात कोविड-19 महामारीविषयी आणि त्यासंबंधित सर्व बाबींची महत्वपूर्ण माहिती चित्रांच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आली आहे
-
Question 3 of 10
3. Question
1 pointsभारतीय हवाई दलाच्या कोणत्या स्क्वाड्रनमध्ये तेजस विमानांच्या तुकडीचा समावेश करण्यात आला आहे?
Correct
Incorrect
भारतीय हवाई दलाच्या (IAF) सुलूर हवाई तळावर तेजस एमके-1 या विमानांचा भारताच्या लढाऊ विमानांच्या ताफ्यामध्ये 27 मे 2020 रोजी समावेश करण्यात आला. अशा पद्धतीच्या लढाऊ विमानांचा समावेश ताफ्यामध्ये करणारे भारतीय हवाई दलाचे हे पहिले स्क्वाड्रन आहे. सुलूर हवाई तळामधल्या फ्लाईंग बुलेट या नावाने ओळखल्या जाणाऱ्या नंबर 18 स्क्वाड्रन चे पुनरुज्जीवन करण्यात आले आहे.तेजस एमके-1 FOC हे चौथ्या पिढीचे तेजस विमान आहे. यामध्ये एकच इंजिन आहे. तसेच ते वजनानी हलके, अतिशय चपळाईने कार्यरत राहू शकते. तसेच सर्वप्रकारच्या हवामान परिस्थितीत बहुविध भूमिका पार पाडणारे हे लढाऊ विमान आहे. तेजसमध्ये हवेतल्या हवेमध्येच इंधन भरण्याची सुविधा-क्षमता आहे.
-
Question 4 of 10
4. Question
1 pointsकोणत्या कंपनीने जगातले पहिले कॉन्टॅक्टलेस विझिटर मॅनेजमेंट सॉफ्टवेयर विकसित केले?
Correct
Incorrect
मुंबईच्या VAMS ग्लोबल या कंपनीने VAMS सेफगार्ड या नावाने स्वयंचलित मार्गाने शरीराचे तापमान आणि मास्क यांची तपासणी करणारे जगातले पहिले कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित कॉन्टॅक्टलेस विझिटर मॅनेजमेंट सॉफ्टवेयर विकसित केले.
-
Question 5 of 10
5. Question
1 pointsकोणत्या संस्थेनी सायबर सेफ्टी- ए हँडबुक फॉर स्टूडेंट्स ऑफ सेकंडरी अँड सीनियर सेकंडरी स्कूल्स हे शीर्षक असलेले पुस्तक प्रकाशित केले?
Correct
Incorrect
इयत्ता नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांमध्ये सायबर सुरक्षेबाबत जागृती निर्माण करण्याच्या हेतूने केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (CBSE) वतीने सायबर सेफ्टी- ए हँडबुक फॉर स्टूडेंट्स ऑफ सेकंडरी अँड सीनियर सेकंडरी स्कूल्स हे शीर्षक असलेले पुस्तक प्रकाशित करण्यात आले.
-
Question 6 of 10
6. Question
1 pointsकोणती व्यक्ती आर्मी कमांडर परिषदेचे अध्यक्ष आहे?
Correct
Incorrect
आर्मी कमांडर परिषद हा उच्च स्तरीय द्वैवार्षिक कार्यक्रम असून या परिषदेमध्ये महत्त्वाच्या धोरणात्मक निर्णयांना पोषक ठरणाऱ्या संकल्पनांवर चर्चा करण्यात येते. दोन टप्प्यांमध्ये या परिषदेचे आयोजन होणार असून 27 ते 29 मे 2020 या कालावधीत या परिषदेच्या पहिल्या टप्प्याचे आयोजन केले जात आहे. दुसऱ्या टप्प्यातली परिषद जून 2020 महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आयोजित करण्यात येणार आहे. भारतीय भुदलाचे प्रमुख जनरल एम.एम. नरावणे यांच्या अध्यक्षतेखाली ही परिषद आयोजित केली जात आहे.
-
Question 7 of 10
7. Question
1 pointsधक्के शोषक म्हणून काम करून एक्सॉन (मज्जापेशीपासून सुरू होणारा तंतू) यांचे नुकसान होण्यापासून संरक्षण करणाऱ्या रेणूचे नाव काय आहे?
Correct
Incorrect
डोक्याला झालेल्या दुखापतींचा अभ्यास अलीकडेच रमण रिसर्च इंस्टीट्यूट, IISER पुणे आणि पॅरिस डायडरोट विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी केला. त्यात असे आढळून आले आहे की, शारीरिक ताण निर्माण झाल्यास धक्के शोषक म्हणून काम करून एक्सॉन (मज्जापेशीपासून सुरू होणारा तंतू) यांचे नुकसान होण्यापासून संरक्षण करणाऱ्या रेणूचे नाव स्पेक्ट्रिनअसे आहे. हे एक्सॉनच्या आत असतात.
-
Question 8 of 10
8. Question
1 pointsकोणत्या कंपनीने RT-LAMP आधारित कोविड-19 निदानसूचक कीट विकसित करण्यासाठी जम्मूच्या CSIR-IIIM या संस्थेसोबत सामंजस्य करार केला?
Correct
Incorrect
कोविड-19 ची तीव्रता कमी करण्याच्या प्रक्रियेत तपासणी हा एक मुख्य घटक असल्याने, एक नवीन रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेस-लूप मेडिएटेड इस्थोर्मल एम्प्लीफिकेशन (RT-LAMP) आधारित कोविड-19 निदानसूचक कीट विकसित करून त्याला प्रोत्साहन देण्यासाठी CSIRची एक घटक प्रयोगशाळा असणाऱ्या इंडियन इंस्टिट्यूट ऑफ इंटिग्रेटिव्ह मेडिसिन (CSIR-IIIM, जम्मू) या संस्थेनी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीसोबत भागीदारी केली आहे.कोविड-19 RT-LAMP तपासणी ही एक न्यूक्लिक अॅसिड आधारित तपासणी आहे जी रुग्णाच्या नाक/घशाच्या स्वाब नमुन्यांमधून घेतली जाते. ही जलद (45-60 मिनिटांमध्ये निष्कर्ष), प्रभावी आणि अचूक तपासणी आहे. ही तपासणी सध्या कमी रुग्णांच्या नमुन्यांसह घेतली जात असून हे कीट मोठ्या संख्येने रुग्णांच्या नमुन्यांवर वैध ठरविण्याचे नियोजन केले जात असून ते रिलायन्स इंडस्ट्रीजच्या सहकार्याने पूर्ण केले जाणार आहे.
-
Question 9 of 10
9. Question
1 pointsकोणत्या कंपनीने नर्मदा बेसिन प्रोजेक्ट्स कंपनी लिमिटेड यांच्याबरोबर जलविद्युत प्रकल्पांच्या बांधकामाला लागणाऱ्या निधीसाठी सामंजस्य करार केला?
Correct
Incorrect
पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन (PFC) या सार्वजनिक कंपनीने नर्मदा बेसिन प्रोजेक्ट्स कंपनी लिमिटेड (NBPCL मध्यप्रदेश) यांच्याबरोबर मध्यप्रदेश राज्यात 225 मेगावॅट क्षमतेच्या 12 जलविद्युत प्रकल्पांच्या बांधकामासाठी लागणाऱ्या वित्तपुरवठ्यासाठी सामंजस्य करार केला.
-
Question 10 of 10
10. Question
1 pointsइकाबॉग हे शीर्षक असलेल्या कादंबरीचे लेखक कोण आहेत?
Correct
Incorrect
प्रसिद्ध ब्रिटिश लेखिका जे. के. रोलिंग या इकाबॉग हे शीर्षक असलेल्या कादंबरीच्या लेखिका आहेत.
Table of Contents