चालू घडामोडी : 14 फेब्रुवारी 2020

चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाईट ला रोज भेट द्या.

Visit Regularly our site to check Current Affairs

Current Affairs :14 FEBRUARI 2020 | चालू घडामोडी : 14 फेब्रुवारी 2020

चालू घडामोडी –  खादी व ग्रामोद्योग आयोगाचे ‘फिरते मधमाशा पालनगृह’

 •  13 फेब्रुवारी 2020 रोजी केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री नितीन गडकरी ह्यांच्या हस्ते नवी दिल्लीत ‘फिरते मधमाशा पालनगृह’ (Apiary on Wheels) या पुढाकाराला हिरवा झेंडा दाखविण्यात आला.
 • कीटक जातीतल्या मधमाशा पालनात अनेक आव्हाने असतात. या उपक्रमांमुळे मधमाशा पालन सुलभ होण्यास मदत होणार. मधमाशा पालन करणाऱ्यांना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठीचा समग्र दृष्टीकोन फिरत्या मधमाशा पालनगृहाच्या माध्यमातून ठेवण्यात आला आहे.
 • ▪️उपक्रमाविषयी
 •  मधमाश्यांच्या सुलभ स्थलांतरासाठी बनविलेली ही एक अनोखी कल्पना आहे. हा खादी व ग्रामोद्योग आयोगाचा (KVIC) उपक्रम आहे.
  प्रायोगिक तत्वावर फिरते मधमाशा पालनगृह दिल्लीच्या सीमेवर मोहरीच्या शेतांजवळ तैनात करण्यात येणार आहे. यशस्वी अंमलबजावणीनंतर देशभरात ही संकल्पना राबवली जाणार आहे.
 •  एक वाहन 20 पालनगृहांना कोणत्याही अडचणीशिवाय एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी नेऊ शकते. अश्या वहनामुळे अत्याधिक गरमीतही मधमाशा स्थलांतरित होऊ शकतात. वाहनात त्यानं थंडावा मिळावा यासाठी सोयी-सुविधा देण्यात आलेल्या आहेत.
 • ▪️ खादी व ग्रामोद्योग आयोग (KVIC)
 • खादी व ग्रामोद्योग आयोग एप्रिल 1957 मध्ये स्थापन करण्यात आले. ही भारत सरकारने तयार केलेली एक वैधानिक संस्था आहे. हे सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत खादी व ग्रामीण उद्योगांच्या संदर्भातली ही एक शीर्ष संस्था आहे. त्याचे मुख्यालय मुंबईत आहे.
 • खादी व ग्रामोद्योग आयोगाने (KVIC) 2017 साली “मध मोहीम (Honey Mission)” राबविण्यास सुरूवात केली. या उपक्रमाच्या अंतर्गत मधुमक्षिका पालकांना प्रशिक्षण दिले गेले, मधमाशी पालनगृहांचे वाटप करण्यात आले आणि ग्रामीण, सुशिक्षित परंतु बेरोजगार तरुणांना उत्पन्नाचे साधन मिळवून देण्यात मदत केली गेली.

# Current Affairs


चालू घडामोडी –  एक भारत श्रेष्ठ भारत’ साजरा करण्यासाठी आज आयआयटी मुंबईचा वार्षिक सांस्कृतिक कार्यक्रम

 •  ‘एक भारत श्रेष्ठ भारत’मधून प्रेरणा घेत आयआयटी मुंबईचा द ड्रामाटिक क्लब या सांस्कृतिक विभागाने ‘ॲन प्रॉड’ या वार्षिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. पवई येथील आयआयटी संकुलातील पी. सी. सक्सेना सभागृहात आज संध्याकाळी 7.00 वाजता हा कार्यक्रम होणार आहे.
 •  नाटकाच्या विविध प्रकारांच्या माध्यमातून ‘ॲन प्रॉड’ हा महाराष्ट्र आणि गोवा या राज्यांवर केंद्रीत असणार आहे. महाराष्ट्र हे देशातील तिसरे सर्वात मोठे राज्य असून येथे बहुविध संस्कृती नांदताना दिसत असून मराठी संतांचा मोठा इतिहास लाभला आहे.
 • महाराष्ट्राच्या प्रत्येक भागाला स्वत:ची सांस्कृतिक ओळख असून मराठी भाषा, लोकगीतं, खाद्य पदार्थ याचे विविध प्रकार येथे पाहायला मिळतात. याउलट गोवा हे लोकप्रिय पर्यटन स्थळ असून ते देखील तिथल्या सांस्कृतिक वैभवासाठी ओळखले जाते.
 •  फूटबॉल आणि संगीत हे गोव्याच्या संस्कृतीत खोलवर रुजलेले आहे. गोवा हे नववर्ष साजरे करण्यासाठी देखील ओळखले जाते. इथला गोवन कार्निव्हल मोठ्या प्रमाणावर पर्यटकांना आकर्षित करतो. या दोन्ही राज्यांमधील सध्याच्या सांस्कृतिक परिदृशाच्या जोडीने या कार्यक्रमात नाटकं सादर केली जाणार आहेत.
 • अशा प्रकारे आयआयटी मुंबईचा वार्षिक कार्यक्रमात भारताच्या सांस्कृतिक विविधता साजरी केली जाणार आहे. आणि ही ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ची भावना आहे. या नाटक प्रयोगांमधून विविधतेतून एकतेचे दर्शन तसेच विविध राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधील जनतेमधील परस्पर संवाद अधोरेखित केला जाणार आहे.
 • याच संकल्पनेवर आधारित आज सादर होणाऱ्या नाटकांमध्ये अलाझिया, सांप, डेथ नोट, द फायनल ड्राफ्ट, चिट्ठी आणि मोनो ॲक्‍ट यांचा समावेश आहे.
 • देशातील सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांदरम्यान दृढ आणि रचनात्मक संबंधांच्या माध्यमातून राष्ट्रीय एकतेच्या भावनेने प्रोत्साहन देणारा एक भारत श्रेष्ठ भारत हा सरकारचा उपक्रम आहे

# Current Affairs


चालू घडामोडी –  छोट्या आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांची उत्पादकता वाढवण्यावर अधिक भर देण्याचे उपराष्ट्रपतींचे वैज्ञानिकांना आवाहन

 • देशातल्या छोट्या आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांची उत्पादकता वाढवण्यावर अधिक भर देण्याचे आवाहन उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी आज वैज्ञानिक समुदायाला केले. छोटे आणि अल्पभूधारक शेतकरी हे सर्वात असुरक्षित असून त्यांच्या कल्याणाला सर्वोच्च प्राधान्य दिले जावे असे ते म्हणाले.
 •  नवी दिल्लीत भारतीय कृषी संशोधन संस्थेच्या 58 व्या दिक्षांत समारंभात ते संबोधित करत होते. देशातल्या अन्नधान्याच्या उत्पादनात गेल्या 68 वर्षात अंदाजे सहा पटीने झालेली वाढ लक्षात घेता त्यांनी हरित क्रांतीनंतरच्या टप्प्यात कृषी संशोधन संस्थेने केलेली कामगिरी उल्लेखनीय असल्याचे सांगितले.
 • शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी तसेच संस्थेचे संशोधन शेतापर्यंत पोहोचण्यासाठी भारतीय कृषी संशोधन संस्थांनी प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करावा, असे उपराष्ट्रपती म्हणाले. शेतीमधील वैज्ञानिक प्रगती आणि संशोधनाच्या माध्यमातून देशाची सेवा केली जावी, अशी सूचना त्यांनी केली.
 •  देशात कुपोषण आणि उपासमारीच्या वाढत्या प्रमाणाबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली. देशातले 80 टक्क्यांहून अधिक किशोरवयीन मुलांची उपासमार होत आहे. देशातील युवक हे देशाचा कणा आहेत त्यामुळे या समस्येवर युद्धपातळीवर तोडगा काढण्यात यावा, असे उपराष्ट्रपती म्हणाले.
 •  नायडू यांनी कृषी संशोधन संस्थांना रोग प्रतिबंधक आणि पोषक मूल्य असलेली पिकं विकसित करण्याचे आवाहन केले. किटकनाशकांच्या अतिवापराच्या धोक्याबाबत लोकांना जागृत करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. शेतीला शाश्वत आणि फायदेशीर बनवण्यासाठी योग्य धोरणं, तंत्रज्ञान आणि संस्थात्मक व्यवस्था यांची जोड असणे महत्वपूर्ण असल्याचे ते म्हणाले.
 •  केंद्र सरकारने गेल्यावर्षी 12 शेतकऱ्यांना पद्मश्री पुरस्कार देऊन गौरवले. यातून त्यांचे मनोधैर्य वाढवायला मदत होईल, असे नायडू म्हणाले.
 • यावेळी उपराष्ट्रपतींनी एमएससी आणि पीएचडी शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना पदवी आणि पदकं प्रदान केली.

# Current Affairs


चालू घडामोडी – तीन भारतीय कलाविष्कारांचा गिनीज विश्वविक्रम

 •  चॅरिटेबल ट्रस्टचा एक भाग असलेल्या त्यागया टीव्ही वाहिनीच्या पुढाकारामुळे गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये प्रवेश करण्यात तीन भारतीय कलाविष्कारांना यश आले आहे.
 •  कर्नाटीक संगीत, भरतनाट्यम आणि कुचीपुडी या कलाविष्कारांचा एकजुटीचा अनोखा कार्यक्रम सादर करण्यात आला. या तीनही श्रेणींमध्ये एकाच मंचावर सर्वाधिक कलाकारांनी कलेचे सादरीकरण करून हा विक्रम नोंदवला.
 • 1 फेब्रुवारी 2020 रोजी चेन्नईच्या रामचंद्र कन्व्हेन्शन सेंटर येथे एका स्पर्धेदरम्यान ही ऐतिहासिक घटना घडली.
 •  त्यागराज पंचरत्नम संगीतावरचे नृत्यदिग्दर्शन पार्वती, कुचीपुडी तज्ञ एम.व्ही.एन. मूर्ती आणि कृष्णकुमार ह्यांनी केले होते. त्यांनी 1200 लोकांच्या बँडला प्रशिक्षण दिले.

 भारतीय नृत्यशैली

 भारतात दोनशेहून अधिक लोकनृत्ये प्रचलित आहेत. दहा शास्त्रीय नृत्यशैली भारतात रुजलेल्या आहेत. यातल्या कथक, मणिपुरी, भरतनाट्यम् आणि कथकली या प्रमुख शास्त्रीय नृत्य पद्धती आहेत. तर कुचिपुडी, ओडिसी, मोहिनीअट्टम या भगिनी शैली आहेत.

 राज्यात रुजलेले नृत्यप्रकार

 • अरुणाचल प्रदेश – बार्दो छम
 • आंध्र प्रदेश – कुचीपुडी, कोल्लतम
 • आसाम – बिहू, जुमर नाच
 • उत्तर प्रदेश – कथक, चरकुला
 • उत्तराखंड – गढवाली
 • उत्तरांचल – पांडव नृत्य
 • ओरिसा – ओडिसी, छाऊ
 • कर्नाटक – यक्षगान, हत्तारी
 • केरळ – कथकली
 • गुजरात – गरबा, रास
 • गोवा – मंडो
 • छत्तीसगढ – पंथी
 • जम्मू व काश्मीर – रौफ
 • झारखंड – कर्मा, छाऊ
 • मणिपूर – मणिपुरी
 • मध्यप्रदेश – कर्मा, चरकुला
 • महाराष्ट्र – लावणी
 • मिझोरम – खान्तुम
 • मेघालय – लाहो
 • तामिळनाडू – भरतनाट्यम
 • पंजाब – भांगडा, गिद्धा (गिद्दा)
 • पश्चिम बंगाल – गंभीरा, छाऊ
 • बिहार – छाऊ
 • राजस्थान – घूमर

 # Current Affairs


 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Join Us on Telegram

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

Be the first to comment

आपली प्रतिक्रिया नोंदवा