चालू घडामोडी : 17 जानेवारी 2020

चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाईट ला रोज भेट द्या.

Visit Regularly our site to check Current Affairs

Current Affairs :  17 January 2020 | चालू घडामोडी : 08 नोव्हेंबर 2019

चालू घडामोडी – ब्राझील अंटार्क्टिकामध्ये नवीन संशोधन केंद्र उघडणार

 •  ब्राझीलने घोषणा केली आहे की अंटार्क्टिकामध्ये ते नवीन संशोधन केंद्र उघडणार आहेत. 8 वर्षांपूर्वी ब्राझीलचे तेथले कमांडंट फेराझ अंटार्क्टिक स्टेशन नावाचे वैज्ञानिक संशोधन तळ नष्ट झाले होते; तिथेच नवे केंद्र उभारले जाणार आहे.
 • ब्राझीलच्या सरकारने कमांडंट फेराझ अंटार्क्टिक स्टेशनाच्या स्थानकाच्या पुनर्बांधणीसाठी अंदाजे 100 दशलक्ष डॉलर एवढा वित्तपुरवठा केला जाणार आहे.
 •  कमांडंट फेराझ अंटार्क्टिक स्टेशन हे दक्षिण शेटलँड द्वीपसमूहातल्या सर्वात मोठ्या किंग जॉर्ज बेटावर होते. टे 48,500 चौ. फूट एवढ्या क्षेत्रात पसरलेले होते.
 •  CEIEC ही चीनी सरकारी कंपनी हे नवीन केंद्र बांधणार आहे. नवीन केंद्रामध्ये 17 प्रयोगशाळा आणि 64 लोकांसाठी निवासस्थान असतील.

# Current Affairs


चालू घडामोडी – भारत सरकारचे ‘दुर्मिळ आजार विषयक राष्ट्रीय धोरण’

 •  भारत सरकारने ‘दुर्मिळ आजार विषयक राष्ट्रीय धोरण’ तयार करीत आहे.
 • 13 जानेवारीला त्याचा मसुदा जाहीर करण्यात आला, ज्यानुसार आयुषमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या अंतर्गत पात्र असलेल्या रुग्णांना काही विशिष्ट दुर्मिळ आजारांसाठी एकदाच होणार्‍या उपचाराच्या खर्चाच्या 15 लक्ष रुपयांपर्यंतचे अनुदान दिले जाणार.
 •  खर्चाचा हा निधी आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय राष्ट्रीय आरोग्य निधी या छत्र योजनेच्या अंतर्गत प्रदान करणार.
 •  या धोरणाच्या अंतर्गत 40 टक्के लोकसंख्येला लाभ देणारी आयुषमान भारत ही योजना देखील येणार आहे.
 •  धोरणात समाविष्ट असलेल्या दुर्मिळ आजारांमध्ये हेमोफिलिया, थॅलेसीमिया, बालकांमधील प्रायमरी इम्युनोडिफिशियन्सी, सिकल सेल, एनेमिया, गौचर रोग, हीरशस्प्रंज रोग, हेमॅन्गिओमास आणि पोम्पे रोग यासारखे लाइसोसोमल स्टोरेज आजार आहेत.

# Current Affairs


चालू घडामोडी – नवी दिल्लीत ‘इंडियन हेरिटेज इन डिजिटल स्पेस’ प्रदर्शन

 •  15 डिसेंबर 2020 रोजी केंद्रीय सांस्कृतिक व पर्यटन राज्यमंत्री प्रल्हाद सिंग पटेल यांच्या हस्ते नवी दिल्लीत ‘इंडियन हेरिटेज इन डिजिटल स्पेस’ या नावाने महिनाभर चालणार्‍या एका विशेष प्रदर्शनीचे उद्घाटन करण्यात आले. तसेच तिथे दोन दिवस चालणारा ‘आंतरराष्ट्रीय वारसा’ विषयक परिसंवाद देखील आयोजित करण्यात आला आहे.
 • हा कार्यक्रम भारतीय तंत्रज्ञान संस्था (IIT) दिल्ली यांच्या सहकार्याने विज्ञान व तंत्रज्ञान विभागाने आयोजित केला आहे.

प्रदर्शनाची वैशिष्ट्ये

 •  प्रदर्शनात अभ्यागतांना सामाजिक व सांस्कृतिक जीवनाची पुनर्रचना आणि हंपीची परंपरा, अनेक महत्वाच्या वास्तूंचे वास्तुशास्त्र आणि संकल्पनिय पुनर्रचना आणि बर्‍याच भित्तीचित्रांचे विलोपन अनुभवता येणार आहे.
 • या ठिकाणी वारसाच्या डिजिटल स्वरूपासोबतच वास्तविकतेवर आधारित वारसांच्या भौतिक प्रतिकृती प्रदर्शनास मांडलेल्या आहेत.
 •  3-डी लेझर स्कॅन डेटा, AR, होलोग्राफिक प्रोजेक्शन आणि 3-डी फॅब्रिकेशन्स अश्या तंत्रज्ञानाचा वापर करून डिजिटल संरचना तयार करणे आणि भारतीय वारसाचे गौरव दर्शविणारे संवादात्मक आणि विस्तृत अनुभव प्रदान करणे हे या प्रकल्पांचे उद्दीष्ट आहे.
 •  तिथे हंपी आणि वाराणसीचे काशीविश्वनाथ मंदिर, ताजमहाल, कोणार्कचे सूर्य मंदिर, हंपीचे रामचंद्र मंदिर, आणि पाटणचे राणी की वाव या आश्चर्यजनक वास्तूंची प्रतिकृती ठेवण्यात आली आहे.

# Current Affairs


चालू घडामोडी – WHOची जागतिक आरोग्यसंबंधी आव्हानांची यादी जाहीर

 •  जागतिक आरोग्य संघटना (WHO) यांच्याकडून येणार्‍या दशकात जग ज्या आव्हानांना तोंड देणार आहे, अश्या तातडीच्या 13 आरोग्यासंबंधी आव्हानांची एक यादी जाहीर करण्यात आली आहे.
 • या अहवालात हवामानातले बदल आणि आरोग्य सेवांमधली असमानता अश्या अनेक विषयांवर प्रकाश टाकण्यात आला आहे.
 •  या यादीमध्ये समाविष्ट करण्यात आलेली आव्हाने पुढीलप्रमाणे आहेत –
 • हवामानविषयक संकट
 • संघर्ष आणि संकटात सापडलेल्या प्रदेशांमध्ये आरोग्य सेवा पुरविणे
 • आरोग्य सेवांमधली असमानता
 •  उपचारांची उपलब्धता
 • संसर्गजन्य रोग प्रतिबंधक
 •  साथीच्या रोगांसाठी तयारी
 •  असुरक्षित उत्पादने
 •  आरोग्य कर्मचार्‍यांमधली अल्प गुंतवणूक
 •  पौगंडावस्थेमधली सुरक्षा
 •  आरोग्य सेवा कर्मचार्‍यांचा नागरिकांमधला विश्वास वाढविणे
 •  तांत्रिक प्रगतीचे भांडवलीकरण
 •  प्रतिजैविकांना आणि इतर औषधांना होणार्‍या प्रतिरोधाचा धोका
 • आरोग्य सेवेमधली स्वच्छता
 •  या अहवालानुसार, हवामानातल्या बदलांमुळे सुमारे 7 दशलक्ष लोक नकारात्मकदृष्ट्या प्रभावित झाले आहेत. तसेच इतर धोक्‍यांमध्ये इन्फ्लूएंझा आजाराचा उद्रेक आणि HIV, मलेरिया आणि क्षयरोग सारख्या संक्रामक रोगांचा प्रसार हे समाविष्ट आहेत.
 • तसेच घात, हृदयविकाराचा झटका, श्वसनाचे रोग आणि फुफ्फुसाचा कर्करोग या आजारांमुळे जागतिक मृत्युंपैकी एका चतुर्थांशपेक्षा जास्त मृत्यू होतात. वायू प्रदूषणाची पातळी वाढल्यामुळे या रोगांची शक्यता वाढते.

WHO बद्दल

 •  जागतिक आरोग्य संघटना (WHO) ही आंतरराष्ट्रीय सार्वजनिक आरोग्य संबंधित संयुक्त राष्ट्रसंघाची एक विशेष संघटना आहे. दिनांक 7 एप्रिल 1948 रोजी स्थापन करण्यात आलेल्या WHOचे जिनेव्हा (स्वित्झर्लंड) येथे मुख्यालय आहे.
 •  हा संयुक्त राष्ट्रसंघ विकास गटाचा एक सदस्य आहे. ही आरोग्य संघटना पूर्वी ‘एजन्सी ऑफ द लीग ऑफ नेशन्स’ म्हणून ओळखली जात होती.
   # Current Affairs

 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Join Us on Telegram

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

Be the first to comment

आपली प्रतिक्रिया नोंदवा