चालू घडामोडी : 23 जानेवारी 2020

चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाईट ला रोज भेट द्या.

Visit Regularly our site to check Current Affairs

Current Affairs : 23 January 2020 | चालू घडामोडी : 23 जानेवारी 2020

चालू घडामोडी – “व्योममित्र”: भारताचा ‘अर्धयंत्रमानव’ गगनयानातला सहभागी

 •  ‘मानवी अंतराळ मोहीम आणि शोध’ या विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषदेदरम्यान ‘व्योममित्र’ या नावाने भारतात तयार करण्यात आलेल्या स्त्री अर्धयंत्रमानवाचे अनावरण करण्यात आले.
 • भारताच्या अंतराळवीरांना अंतराळात पाठवण्यापूर्वी ‘व्योममित्र’ या अर्धयंत्रमानवास (half-humanoid) गगनयानाच्या पहिल्या निर्मनुष्य मोहिमेतून अंतराळात पाठवले जाणार आहे.
 • कृत्रिम बुद्धिमत्तेवर (AI) चालणारा व्योममित्र अंतराळात मानवी शरीराच्या हालचालींचा अभ्यास करणार असून त्यासंबंधीचा तपशील पाठविणार आहे. व्योममित्र एक अत्यंत विशेष रोबो असून तो बोलू शकतो तसेच व्यक्तींची ओळख पटवू शकतो.

 गगनयान मोहीम

 • गगनयान मोहीम ही भारताची पहिली मानवी अंतराळ मोहीम आहे. गगनयान मोहीम तीन टप्प्यांची आहे.
  भारताच्या पहिल्या मानवी अंतराळ मोहिमेची पूर्वतयारी म्हणून डिसेंबर 2020 या महिन्यात पहिली निर्मनुष्य अंतराळ मोहीम हाती घेतली जात असून तशीच दुसरी मोहीम जून 2021 या महिन्यात होणार आहे. त्यानंतर 2021 साली भारताचे अंतराळवीर ‘गगनयान’ मोहिमेतून अंतराळात पाठवले जाणार आहेत.
 • मानवी अंतराळ मोहिमेसाठी ISROने 10 टनांचे वजन वाहून नेऊ शकेल असा प्रक्षेपक तयार केला आहे.
  भारताच्या अंतराळवीरांना अंतराळात पाठवण्यापूर्वी ‘व्योममित्र’ (व्योम म्हणजे अंतराळ) नावाने भारतात तयार करण्यात आलेल्या स्त्री अर्धयंत्रमानवास (half-humanoid) गगनयानाच्या पहिल्या निर्मनुष्य मोहिमेत अंतराळात पाठवले जाणार आहे. या अंतराळ मोहिमेत मी विविध घटकांचे निरीक्षण करून व्योममित्र इतरांना सतर्क करणार आहे. जीवनपूरक कृतींचे परीक्षण यात केले जाणार आहे. माणसाने अंतराळात करण्याच्या कृतींची नक्कल हा यंत्रमानव करू शकतो.

# Current Affairs


चालू घडामोडी – कलक्कडू-मुंडनथुरै व्याघ्र अभयारण्यात वन्यप्राण्यांची वार्षिक गणना होत आहे

 •  तामिळनाडू राज्यात असलेल्या ‘कलक्कडू-मुंडनथुरै व्याघ्र अभयारण्य’ येथे वन्यप्राण्यांची वार्षिक गणना केली जात आहे. 22 जानेवारी ते 27 जानेवारी या कालावधीत ही गणना केली जात आहे.
 •  वन्यप्राण्यांची गणना हे देशातल्या मौल्यवान चल संपत्तीचे संरक्षण करण्यासाठीच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण साधन आहे.
 • वन्यजीवन संख्या यांची स्थिती’ यासंदर्भातल्या केंद्रीय वन व पर्यावरण मंत्रालयाच्या वार्षिक अहवालात या सर्वेक्षणाच्या निष्कर्षांचा समावेश केला जाणार आहे.

ठळक बाबी

 •  अभयारण्याच्या संपूर्ण 60 हजार हेक्टर क्षेत्रफळामध्ये हे सर्वेक्षण करण्यात येणार असून हे काम दोन टप्प्यात होणार आहे.
 •  सर्वेक्षणाच्या पहिल्या टप्प्यात वाघ, लांडगा इत्यादी मांसाहारी प्राणी तर द्वितीय टप्प्यात हत्ती, हरिण इत्यादी शाकाहारी प्राण्यांची गणना करण्यात येणार.
 •  या कार्यक्रमात वन अधिकारी, वन्यपशू तज्ज्ञ आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या सहभागाने तीनशेहून अधिक कर्मचारी सहभागी आहेत.
 • वन पर्यावरणाची स्थिती आणि त्यामुळे वन्य प्राण्यांच्या वास्तव्यावर होणार्‍या परिणामांचीही या पाहणीत नोंद घेतली जाणार आहे. सर्वेक्षण करताना मानव-प्राणी संघर्षाची शक्यता देखील ओळखली जाणार आणि अश्या घटना टाळण्यासाठी आवश्यक ती पावले सुचविली जाणार आहे.

# Current Affairs


चालू घडामोडी – आध्रप्रदेश राज्याच्या तीन राजधानी असणार

 •  आंध्रप्रदेश राज्याचे मुख्यमंत्री वाय. एस. जगनमोहन रेड्डी यांनी तयार केलेल्या तीन राजधानींच्या विधेयकाला 20 जानेवारी 2020 रोजी विधानसभेच्या विशेष अधिवेशनात मंजूरी देण्यात आली.
 •  नव्या विधेयकानुसार, आंध्रप्रदेशची प्रशासकीय राजधानी विशाखापट्टणम, न्यायालयीन राजधानी कर्नूल, तर विधिमंडळ राजधानी अमरावती असणार आहे.
 • अमरावती या शहरात विधीमंडळाचे कामकाज ठेवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
 • तीन शहरांना राजधानीचा दर्जा देण्याचा देशातला हा पहिलाच प्रयोग असण्याची शक्‍यता आहे.
 •  राज्यातल्या प्रशासनाचे विकेंद्रीकरण आणि सर्वकष विकास विधेयक विधानसभेत सादर करण्यात आले. चर्चेअंती आवाजी मतदानाने ते विधेयक मंजूर करण्यात आले.

# Current Affairs


चालू घडामोडी – प्रत्यक्ष कर संकलनात 5.2 टक्के घट

 •  15 जानेवारी 2020 या तारखेपर्यंत झालेले प्रत्यक्ष कर संकलन 7.3 लक्ष कोटी रुपये होते, जे की गेल्या वर्षाच्या तुलनेत 5.2 टक्क्यांनी कमी आहे.

ठळक बाबी

 • याच कालावधीत वैयक्तिक आयकर संकलनात 6.5 टक्क्यांनी वाढ झाली आहे, जे की अर्थसंकल्पात 23.3 टक्के एवढे अंदाजित केले गेले होते.
 •  कॉर्पोरेट कर दर नियमित कंपन्यांकरिता पूर्वीच्या 30 टक्क्यांवरून 22 टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आला आहे, तर नवीन उद्योगांसाठी हा दर 25 टक्क्यांवरून 15 टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आला आहे.
 • भारतीय अर्थव्यवस्थेचा वृद्धीदर 5 टक्के एवढा अपेक्षित असल्याने, मंदावणार्‍या अर्थव्यवस्थेचा परिणाम देखील संकलणावर होणार आहे.

 # Current Affairs


 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Join Us on Telegram

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

Be the first to comment

आपली प्रतिक्रिया नोंदवा