आता RBI ने बदलले ATM कार्डद्वारे पैसे काढण्याचे नियम

आता RBI ने बदलले ATM कार्डद्वारे पैसे काढण्याचे नियम- पहा सविस्तर

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ने एटीम कार्ड अर्थात डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्डबाबत नवीन नियम जाहीर केले आहे.

हा नवीन नियम 16 मार्च, 2020 पासून नवीन कार्डवर लागू होणार आहे.

RBI चे नवीन नियम हे प्रिपेड गिफ्ट कार्डवर लागू होणार नाही.

 पहा RBI चे हे कसे आहेत

RBI ने बँकांना म्हटलंय की, डेबिट आणि क्रेडिट कार्ड देत असताना ग्राहकांना स्थानिक ट्रांझेक्शन करण्याची परवानगी द्यावी.

याचा अर्थ स्पष्ट आहे की, गरज नसेल तर एटीएम मशीनमधून काढू न देणे आणि

पीओएस ट्रमिनलवर खरेदी करत असताना आंतरराष्ट्रीय व्यवहाराला परवानगी देऊ नये.

आंतरराष्ट्रीय व्यवहार, ऑनलाइन खरेदीसाठी ग्राहकांना वेगळ्या सेवेसाठी नोंदणी करावी लागणार आहे.

तुमच्याकडे असलेल्या कार्डवर तुम्हाला देशांतर्गत व्यवहार आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यवहार करण्याची सुविधा

घ्यायची की नाही हे तुम्हाला ठरवावे लागणार आहे.

आठवड्याभरात कधीही तुम्ही व्यवहाराची मर्यादा ठरवू शकता आणि यात बदलही करू शकता. म्हणजे,

एटीएम कार्डला मोबाइल अॅप, इंटरनेट बँकिंग, एटीएम मशीनवर जाऊन आईवीआरद्वारे कधीही पैसे काढण्याची मर्यादा ठरवू शकता.

READ  गोरगरीबांसाठी १ लाख ७० हजार कोटींचे पॅकेज, निर्मला सीतारामन यांची घोषणा

Be the first to comment

आपली प्रतिक्रिया नोंदवा