17,471 पोलीस शिपाई पदांच्या भरतीचा निर्णय, लवकरच प्रक्रिया
Maharashtra Police Recruitment 2024
Maharashtra Police Recruitment 2024
17,471 पोलीस पदांची परीक्षा सीबीटी पध्दतीने होणार परीक्षा ऑनलाइन पध्दतीने घेतली जाईल. ती संगणक आधारित किंव्हा ओमआर आधारित घेण्याची मुभा संबंधित घटक कार्यालयास देण्यात आली आहे. त्यात पोलिस अधिक्षक, पोलिस आयुक्त, समादेशक इतर समक्ष प्रधिकारी ही प्रक्रिया राबवतील.
राज्याच्या वित्त विभागाकडून तब्बल १७, ४७१ पोलिसांची भरती प्रक्रियेला हिरवा कंदील दिल्याने मेगा भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. या संदर्भातील शासन आदेश गृह विभागाने बुधवारी जारी केला. नवरात्रोत्सव, रमजान, दिवाळी अशा सणासुदीच्या काळात मुबई पोलिसांच्या मदतीसाठी कंत्राटी पोलिसांची नियुक्ती करण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. मुंबईत ३ हजार कंत्राटी पोलिसांची भरती केली जाणार होती. राज्य सुरक्षा महामंडळाच्या जवानांमधून कंत्राटी भरती करण्याचा गृहखात्याचा विचार होता. परंतु आता प्रकाशित नवीन अपडेट नुसार गृहखात्याने पोलीस भरतीला मान्यता दिली आहे.
पोलिसांसारखे या जवानांना प्रशिक्षण देऊन कंत्राटी पद्धतीने ११ महिन्यांसाठी भरती केली जाणार होती. या कंत्राटी पोलिसांच्या तीन महिन्यांच्या पगारासाठी ३० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. मुंबई पोलिसांकडे मनुष्यबळाची टंचाई असल्याने नवीन भरती होईपर्यंत गृह खात्याने हा निर्णय घेतल्याचे सरकारने स्पष्ट केले होते. विरोधकांनी यावरून सरकारवर जोरदार टीका करत कंत्राटी ऐवजी पोलीस भरती करण्याची मागणी केली होती. त्यानंतर राज्य सरकार हा निर्णय मागे घेत, नव्याने पोलीस भरती करण्याचा निर्णय घेतला, वित्त विभागाकडून १०० टक्के पोलीस भरतीला मंजुरी दिली. त्यामुळे तब्बल १७,४७१ पोलिसांच्या भरतीचा मार्ग मोकळा आला आहे. पोलीस शिपाई बॅण्डस्मैन पोलीस शिपाई चालक सशस्त्र
पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी मोठी गूड न्यूज आहे. राज्यात आता 100 टक्के पोलिस भरती होणार आहे. 100 टक्के पोलीस भरती करण्यास वित्त विभागाने मंजूरी दिली आहे. यामुळे पोलिस भरतीचा माग्र मोकळा झाला आहे. राज्यात तब्बल 17471 पोलिसांची भरती होणार आहे. राज्य सरकारच्या इतर विभागांना फक्त 50 टक्के पदांची भरती करता येते. पण पोलीस खात्यात 100 टक्के पदभरतीला मान्यता देण्यात आली आहे. पोलीस शिपाई, बँण्डस्मँन, पोलीस शिपाई चालक, सशस्त्र पोलीस शिपाई आणि कारागृह शिपाई अशी एकूण 17471 पदांची भरती केली जाणार आहे.
App Download Link : Download App
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
🔥 मोफत सराव पेपर्स 🔥
👉🏻 वन विभाग भरती सराव प्रश्नसंच
👉🏻 मराठी व्याकरण सराव प्रश्नसंच
👉🏻 चालू घडामोडी सराव प्रश्नसंच
👉🏻 Indian आर्मी भरती सराव प्रश्नसंच
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !!!
Table of Contents