मुंबई पोलीस शिपाई चालक भरती पात्रता यादी प्रकाशित! | Mumbai Police Bharti Result 2022

Mumbai Police Bharti Result 2022

2,629

Mumbai Police Bharti Result 2022

Mumbai Police Bharti Result 2022 : मुंबई पोलीस कॉन्स्टेबल आणि पोलीस कॉन्स्टेबल (ड्रायव्हर) भरती 2022 @mumbaipolice.gov.in नवीन अपडेट बाहेर आले आहे. कृपया खाली दिलेले तपशील तपासा. तांत्रिक अडचणींमुळे मुंबई पोलीस भारतीच्या वेळेत सुधारणा करण्यात आली आहे. पूर्वी मुंबई पोलिसांची शारीरिक परीक्षा 1 मार्च 2023 रोजी नियोजित होती, आता ती 13 मार्च 2023 अशी सुधारित केली आहे. उमेदवार मुंबई पोलिस भरती शुद्धीपत्र खाली पाहू शकतात:

मुंबई पोलीस शिपाई चालक भरती पात्रता यादी प्रकाशित! | Mumbai Police Bharti Result 2022

वाहन कौशल्य चाचणीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी पोलीस शिपाई चालक पदासाठी १,१७,८४३ उमेदवारांनी अर्ज सादर केले होते. त्यांची मैदानी चाचणी दि. ३१/०१/२०२३ ते दि. १३/०३/२०२३ या कालावधीमध्ये घेण्यात आली आहे, पोलीस शिपाई चालक पदासाठी १,१७,८४३ पुरुष/महिला उमेदवारांची मैदानी चाचणी नायगांव पोलीस मुख्यालय, मरोळ पोलीस मुख्यालय, मुंबई आणि मुंबई विद्यापीठ कलिना मैदान येथे दिनांक १३/०३/२०२३ रोजी पूर्ण झाली आहे.

मैदानी चाचणीमध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांची महाराष्ट्र सहाय्यक पोलीस उप निरीक्षक चालक, पोलीस हवालदार चालक, पोलीस नाईक चालक, पोलीस शिपाई चालक (सेवाप्रवेश) नियम २०२२ (सुधारीत), दि. २७/०६/२०२२ मधील ८ अ नुसार शारिरीक चाचणीमध्ये किमान ५० टक्के गुण प्राप्त करणारे उमेदवार संबधित प्रवर्गामधील जाहिरातीत नमूद केलेल्या रिक्त जागांच्या १:१५ या प्रमाणात वाहन चालविणे कौशल्य चाचणी व १०० गुणांच्या लेखी परिक्षासाठी बोलावण्यास पात्र ठरतील असे नमूद केले आहे. तथापी दिनांक २३/०९/२०२२ च्या अधिसुचनेनुसार १:१० प्रमाण नमूद करण्यात आले आहे.

शासनाने दिनांक २३/०९/२०२२ रोजी प्रसिध्द केलेल्या अधिसुचनेनुसार मैदानी चाचणीमध्ये किमान ५० टक्के गुण मिळालेल्या पात्र उमेदवारांमधून १:१० प्रमाणात उमेदवार हे जाहीरातीमध्ये नमूद केलेल्या प्रवर्गनिहाय रिक्त पदांनुसार लेखी परिक्षेस बोलावण्यास पात्र ठरणार आहेत, सदरची यादी तयार करुन प्रसिध्द करण्यापूर्वी मुंबई पोलीस शिपाई / पोलीस शिपाई चालक भरती-२०२१ निवड समिती (खातेबाह्य सदस्यांसह) बैठक दिनांक ०२/०३/२०२३ तसेच दिनांक २३/०३/२०२३ रोजी मा. पोलीस सह आयुक्त (प्रशासन), तथा अध्यक्ष, मुंबई पोलीस शिपाई भरती-२०२१ यांचे स्वीय दालनात आयोजीत करण्यात आली होती.

वाहन कौशल्य चाचणीस पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी सोबत जोडून प्रसिध्द करण्यात येत आहे. सदर उमेदवारांना वाहन कौशल्य चाचणीसाठी हजर राहण्याबाबतचा दिनांक आणि वेळेबाबत महा-आय टी कडून ओळखपत्रे देण्यात येतील. करिता उमेदवारांनी मुंबई पोलीस आयुक्तालय आणि पोलीस महासंचालक, म. रा. मुंबई या कार्यालयाचे संकेतस्थळावरुन वेळोवेळी वाहन कौशल्य चाचणीच्या वेळापत्रकाबाबत माहीती घ्यावी.

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 

यादी पहा 

offer

App Download Link : Download App


आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

 
 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

मुंबई पोलीस शिपाई चालक भरती,

मुंबई पोलीस,

Mumbai Police Bharti Result 2022

 

Table of Contents

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम