One Liners : एका ओळीत सारांश, 20 एप्रिल 2020

93

एका ओळीत सारांश, 20 एप्रिल 2020

Admin

दिनविशेष

  • संयुक्त राष्ट्रसंघ चीनी भाषा दिन – 20 एप्रिल.

पर्यावरण

  • ट्रायमेरेसुरुस सालाझर ही सापाची एक नवीन प्रजाती आहे आणि ती या राज्यात शोधली जाणारी पाचवी सरपटणारे प्राणीप्रजाती आहे – अरुणाचल प्रदेश.

आंतरराष्ट्रीय

  • 27 मे 2020 रोजी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाकडे अंतराळवीरांना पाठविण्यासाठी प्रक्षेपित केली जाणारी ‘डेमो-2’ मोहीम NASA आणि या कंपनीची एक संयुक्त मोहीम आहे – स्पेसएक्स.

राष्ट्रीय

  • गृह मंत्रालयाच्या मते, या कायद्यान्वये थुंकणे हा दंडनीय गुन्हा ठरला आहे – आपत्ती व्यवस्थापन कायदा-2005.
  • वर्क फ्रॉम होमसाठी वापरली जाणारी व्हिडीओ कॉन्फरन्सिंग सेवा जिला भारत सरकारद्वारे वापरण्यासाठी सुरक्षित नसल्याचे घोषित केले गेले आहे – झूम.

व्यक्ती विशेष

  • कोलकाताचे क्रिडा पत्रकारीतेमधले ज्येष्ठ पत्रकार, ज्यांचे 19 एप्रिल 2020 रोजी निधन झाले – समीर गोस्वामी.

राज्य विशेष

  • कोविड-19 प्रकरणांच्या जलद तपासणीसाठी केरळचा तो जिल्हा ज्याने ‘तिरंगा’ (टोटल इंडिया रिमोट अ‍ॅनालिसिस निरोग्य अभियान) नावाचे वाहन सादर केले – पठणमथिट्टा जिल्हा.

ज्ञान-विज्ञान

  • या कंपनीने दृष्टिबाधित लोकांसाठी “टॉकबॅक” नावाचा ब्रेल कीबोर्ड तयार केला – गुगल.
  • या संस्थेच्या संशोधकांनी ‘बग स्निफर’ विकसित केला आहे, जो केवळ 30 मिनिटांत जिवाणूचा शोध घेण्यासाठीचा जैव-संवेदक आहे – आगरकर रिसर्च इन्स्टिट्यूट, पुणे.
  • या CSIR संस्थेने कोविड-19 रुग्णांसाठी उच्च-प्रथिने असलेली बिस्किटे (14 टक्के प्रथिने) उपलब्ध करुन दिले आहेत – केंद्रीय अन्न तंत्रज्ञान संशोधन संस्था (CRTRI), म्हैसुरु.
  • या संस्थेचे संशोधक मॅग्नेटिक रँडम अॅक्सेस मेमरी (RAM) विकसित करीत आहे जी वेगवान, अधिक ऊर्जा-कार्यक्षम आणि विद्यमान डेटा स्टोरेज तंत्रज्ञानापेक्षा कमी क्षमतेमध्ये अधिक माहिती संग्रहित करण्यास सक्षम आहे – IIT मंडी.

सामान्य ज्ञान

  • वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन परिषद (CSIR) – स्थापना: 26 सप्टेंबर 1942; संस्थापक: आर्कोट रामास्वामी मुदलियार आणि शांती स्वरूप भटनागर.
  • जागतिक आरोग्य संघटना (WHO) – स्थापना: 07 एप्रिल 1948; मुख्यालय: जिनिव्हा, स्वित्झर्लंड.
  • भारतीय सर्वोच्च न्यायालय अस्तित्वात आला तो दिवस – 26 जानेवारी 1950.
  • भारतीय सर्वोच्च न्यायालयात असलेल्या न्यायाधीशांची संख्या – एक सरन्यायाधीश आणि इतर 30 न्यायाधीश.

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Join Us on Telegram

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम