मुदतवाढ – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची रिक्त जागांकरिता अग्निशमन दलाची संपूर्ण जाहिरात उपलब्ध
PCMC Fire Recruitment 2024
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
PCMC Fire Recruitment 2024
पिंपरी चिंचवड महापालिका आस्थापनेवरील अग्निशमन विभागातील अग्निशमन विमोचक, फायरमन रेस्क्युअर या गट ‘ड’ संवर्गातील महिलांसाठी राखीव रिक्त पदांसाठी उंची व वजनाच्या पात्रतेमध्ये बदल करण्यात आला आहे. राज्य सरकारच्या अग्निशमन सेवा संचालनालयाची सुधारित अर्हता या पदांकरिता लागू करण्यात आली आहे. महापालिकेच्यावतीने अग्निशमन विभागातील अग्निशमन विमोचक, फायरमन रेस्क्युअर या गट ‘ड’ संवर्गातीलएकून ४३ रिक्त पदांसाठी सरळसेवा भरतीनुसार उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.
त्यापैकी ३३ टक्के महिला आरक्षणाच्या तेरा जागा महिला प्रवर्गाकरिता राखीव ठेवण्यात आल्या आहेत. त्याकरिता १६ मार्च २०२३ मध्ये वर्तमानपत्रांमध्ये जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. २६ मार्चपासून ऑनलाइन पद्धतीने या पदांकरिता अर्ज मागविले होते. या जाहिरातीनुसार महिला प्रवर्गातून या पदाकरिता अर्ज करणाऱ्या उमेदवाराची किमान उंची १६२ सेंटीमीटर आणि वजन किमान पन्नास किलो असणे आवश्यक आहे, असे नमूद केले होते. राज्य सरकारच्या मुंबई येथील अग्निशमन सेवा संचालनालयाच्यावतीने महापालिका प्रशासनाला या पदभरतीबाबत ३० एप्रिल २०२४ मध्ये लेखी पत्र प्राप्त झाले आहे. त्यामध्ये या पदभरतीचा उल्लेख करून अग्निशमन विभागात अग्निशमन विमोचक या पदाकरिता महिला उमेदवारांची किमान उंची १६२ सेंटीमीटर ऐवजी १५७ सेंटीमीटर आणि किमान वजन ४६ किलोग्रॅम असावे, असा उल्लेख करीत या पदभरतीला हे सुधारित बदल लागू करण्याचे निर्देश दिले आहेत. दरम्यान, या अग्निशमन सेवा संचालनालयाच्या पत्राची दखल घेत महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी या पदभरतीबाबत आठ मे २०२४ परिपत्रक काढून नवे बदल लागू केले आहेत. १७ मे पर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
—————————————————————————————————————————————————————————————
PCMC Fire Recruitment 2024
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमार्फत प्रसिध्द केलेल्या जाहिरात क्रमांक ६७०/२०२४ मधील अग्निशमन विमोचक/फायरमन रेस्क्यूअर या पदाकरिता ऑनलाईन अर्ज करणेकामी महिला उमेदवारांकरीता किमान उंची १५७ सेंटीमीटर आणि किमान वजन ४६ किलोग्रॅम याप्रमाणे बदल करून वरील शासन पत्रांन्वये ऑनलाईन अर्ज सादर करण्याकरिता परवानगी देण्यात येत आहे, त्याप्रमाणे उमेदवारांनी नोंद घेऊन विहित मुदतीत अर्ज सादर करावेत. पूर्ण माहित खालील परिपत्रकात पहावी.
अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 मे 2024 आहे.
PCMC Fire Recruitment 2024
पिंपरी चिंचवड महानगरपालिका अग्निशमन अंतर्गत “अग्निशमन विमोचक/फायरमन रेस्क्यूर” पदाची 150 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज 26 एप्रिल 2024 पासून सुरु होतील. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 मे 2024 आहे.
एकूण जागा : 150
पदाचे नाव & तपशील: अग्निशमन विमोचक/फायरमन रेस्क्यूर
शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
वयाची अट: 33 वर्षे
App Download Link : Download App
नोकरी ठिकाण: पिंपरी चिंचवड
अर्ज पद्धती: ऑनलाईन
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 27 मे 2024
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
जाहिरात पहा
ऑनलाईन अर्ज करा
अधिकृत वेबसाईट
🔥 मोफत सराव पेपर्स 🔥
👉🏻 वन विभाग भरती सराव प्रश्नसंच
👉🏻 मराठी व्याकरण सराव प्रश्नसंच
👉🏻 चालू घडामोडी सराव प्रश्नसंच
👉🏻 Indian आर्मी भरती सराव प्रश्नसंच
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !!!
Table of Contents