MPSCExams.com
One Place for All Exams Notes

राजर्षि शाहू महाराज

0 103

Get real time updates directly on you device, subscribe now.

·         जन्म – 16 जुलै 1874.

·         मृत्यू – 6 मे 1922.

·         एप्रिल 1919 भारतात बहुजन समाजाच्या उद्धराचे कार्य करणार्‍या कुर्मी क्षत्रिय महासभा या संस्थेच्या कानपूर येथे भरलेल्या 13 व्या अधिवेशनात महाराजांना ‘राजर्षी’ ही पदवी बहाल करण्यात आली.

·         महाराष्ट्रात त्यांच्या शेतकर्‍यांचा खरा राजा म्हणून गौरव केला गेला.

·         भारतातील वसतिगृहांचे आद्य जनक म्हणून त्यांचा गौरव केला जातो.

·         संस्थात्मक योगदान :

·         ग्रामीण भागातून शहरी भागात शिकण्यास येणार्‍या विविध जातीधर्माच्या गरीब व होतकरू विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जातीची वस्तीगृहे स्थापन केली.

·         1901 – मराठा विद्यार्थ्यांसाठी व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंगची स्थापना (कोल्हापूर).

·         नाशिक येथे उदोजी विद्यार्थी वस्तीगृह उभारले.

·         1902 – राज्यातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी प्रशासकीय सेवेमध्ये 5% राखीव जागा.

·         15 नोव्हेंबर 1906 – किंग एडवर्ड मोहमेडण एज्यु. सोसा. स्थापना.

·         1907 – मिस क्लार्क बोर्डिंग हाऊस ची स्थापना.

·         1911 – जाहीरनामा काढून 15% विद्यार्थ्यांना नादरी देण्याची घोषणा.

·         1911 – शिक्षक प्रशिक्षण व शिक्षकांसाठी मेरीट प्रमोशन योजना.

·         1917 – माध्यमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले.

·         14 फेब्रुवारी 1919 – पाटील शाळा व त्याला जोडून तलाठी वर्ग सुरू केले.

·         लष्करी शिक्षणासाठी इन्फंन्ट्री स्कूल.

·         पुणे येथे श्री शिवाजी प्रिपरेटरी मिलिटरी स्कूल.

·         जयसिंगराव घाटके टेक्निकल इन्स्टिट्यूड स्थापना.

·         1894 – बहुजन समाजातून तलाठयांच्या नेमणुका.

·         1917 – विधवा विवाहाचा कायदा.

·         1918 – आंतरजातीय विवाहास मान्यता देणारा कायदा.

·         1918 – महार वतने रद्द करून जमिनी रयतवारी पद्धतीने दिल्या.

·         वेठबिगारी प्रथा कायद्याने बंद केली.

·         1920 – माणगाव अस्पृश्यता निवारण परिषदेचे आयोजन.

·         1895 – गुळाच्या व्यापारासाठी शाहूपुरी.

·         1899 – वेदोक्त प्रकरण – सत्यशोधक चळवळीचे ब्राह्यणोत्तर चळवळीत रूपांतर होण्यास करणीभूत.

·         यामुळे पुरोहितगिरी व ब्राम्हंणाच्या मक्तेदारीस शह.

·         1906 – शाहू स्पिनिंग अँड विव्हिंग मिलची स्थापना.

·         1907 – सरकारी तत्वावर कापड गिरणी मल्लविधेस प्रोत्साहन देण्यासाठी खासबाग कुत्स्यांचे मैदान.

·         1911 – सत्यशोधक समाजाची शाखा कोल्हापूर येथे स्थापन झाली.

·         1911 – भोगवती नदीवर राधानगरी धरण बांधले.

·         1912 – कोल्हापुरात सरकारी कायदा करून सरकारी चळवळीस प्रोत्साहन.

·         1916 – निपाणी येथे डेक्कन रयत संस्थेची स्थापना.

·         1918 – कुलकर्णी वेतणे रद्द. तलाठी नेमले.

·         1918 – आर्य समाजाची शाखा स्थापन करून आर्य समाजाकडे राजाराम कॉलेज चालविण्यास दिले.

·         1919 – स्त्रियांना क्रूरपणे वागविन्यास प्रतिबंध करणारा कायदा.

·         1920 – घटस्फोटाचा कायदा. देवदासी प्रथा कायद्याने बंद.

·         1920 – हुबळी येथील ब्राह्येनेत्तर सामाजिक परिषदेचे आणि भावनगर येथील आर्य समाज परिषदेचे अध्यक्षपद भूषविले.

·         कोल्हापूर शहरास ‘वस्तीगृहांची जननी‘ म्हटले जाते.

·         ब्राम्ह्येणत्तर चळवळीचे नेतृत्व.

·         वैशिष्टे :

·         महात्मा फुले व सत्यशोधक समाजाचा प्रारंभ.

·         सामाजिक चळवळीच्या क्षेत्रातील म. फुले यांचे खरेखरे वारसदार.

·         जाती भेदास तीव्र विरोध, लोककल्याणकारी राज्य.

·         पददलित व मागास वर्गीयांची उन्नती हेच जीवन कार्य.

·         उदार विचार प्रणालीचा राजा.

·         राज्य सोडावे लागले तर बेहत्तर, पण मागासलेल्या प्रजेच्या सेवेचे व्रत सोडणार नाही.

·         कामगारांनो संघटित व्हा व आपले हक्क प्राप्त करून घ्या, हा संदेश.

 

           उल्लेख.:-

·          He Was a King But a Democratic King – भाई माधवराव बागल.

·         शाहू राजा नुसता मराठा नव्हता, तो नव्या युगातला सर्वांगपूर्ण राष्ट्रपुरुष तो महाराष्ट्राच्या विकासाचा स्वाभाविक तरंग होता. – वि. रा. शिंदे.

·         टीकाकारांकडून ‘शुद्रांचा राजा‘ असा उल्लेख.

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

आपली प्रतिक्रिया नोंदवा

Open chat
Join WhatsApp Group

हा मेसेज बंद करण्याकरिता वरील चित्रावर क्लिक करा

%d bloggers like this: