महाराष्ट्राचा प्रादेशिक भूगोल

क्षेत्रफळ : 

 • क्षेत्रफळ ३,०७,७१३ चौ. कि. मी.
 •  क्षेत्रफळाबाबत देशात राजस्थान (३,४२,२३९ चौ. कि. मी.) व मध्य प्रदेश (३,०८,३१३ चौ. कि. मी.) यानंतर ३ रा क्रमांक लागतो.
 • भारताच्या एकूण क्षेत्रफळापैकी ९.३६%  क्षेत्रफळ महाराष्ट्राने व्यापले आहे.
 • अक्षवृत्तीय विस्तार- १५ अंश ४४ उत्तर ते २२ अंश- ०६ उत्तर अक्षांश
 • रेखावृत्तीय विस्तार- ७२ अंश ३६ पूर्व ते ८० अंश ५४ पूर्व रेखांश
 • समुद्रकिनारा 720 किमी. लांबीचा आहे.
 • लोकसंख्या- २०११ च्या जणगणना  ११,२३,७२,९७२,आहे.
 • राजधानी- मुंबई
 • उपराजधानी- नागपूर
 • सांस्कृतिक राजधानी – पुणे

 राजकीय सीमा :

 •  वायव्य – गुजरात,
 • उत्तर – मध्य प्रदेश
 • ईशान्येस व पूर्वे – छत्तीसगड
 • आग्नेय – तेलंगणा
 • दक्षिणे –कर्नाटक व  गोवा

महाराष्ट्राशेजारील राज्य व राज्यांना लागून असणारे जिल्हे व जिल्ह्यांना लागून असणारी राज्याची सीमा 

 • गुजरात – पालघर , नाशिक, धुळे, नंदुरबार
 • मध्य प्रदेश – नंदुरबार, धुळे, जळगाव, बुलढाणा, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया
 • छत्तीसगड – गोंदिया, गडचिरोली
 • तेलंगणा – गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, नांदेड
 • कर्नाटक – नांदेड, लातूर, उस्मानाबाद, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग
 • गोवा – सिंधुदुर्ग

कोणत्या जिल्ह्यातून कोणत्या ज़िल्हा कधी वेगळा झाला 

 • १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली .
 • त्यावेळी  महाराष्ट्रात जिल्ह्यांची एकूण संख्या २६ होती.
 • त्यानंतर महाराष्ट्रात नवीन १० जिल्ह्यांची निर्मिती करण्यात आली व आतापर्यंत महाराष्ट्रातील जिल्ह्यांची एकूण संख्या ३६ इतकी झाली आहे.
दिनांक पूर्वीचा ज़िल्हा नवीन जिल्हा 
०१ १ मे १९८१रत्नागिरी सिंधुदुर्ग 
०२ १ मे १९८१  औरंगाबादजालना 
०३१६ ऑगस्ट १९८२उस्मानाबादलातूर 
०४२६ ऑगस्ट १९८२चंद्रपूरगडचिरोली 
०५१ जुलै १९८८ धुळे नंदुरबार 
०६१ जुलै १९९८ अकोला वाशीम 
०७१ मे १९९९भंडारा गोंदिया 
०८१ मे १९९९परभणी हिंगोली 
०९४ ऑक्टोबर १९९०मुंबई शहर मुंबई उपनगर 
१०१ ऑगस्ट २०१४ठाणे पालघर 

महाराष्ट्राचे प्रशासकीय विभाग :

 • महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेवेळी ४ प्रशासकीय विभाग होते.
 • सध्यस्थितीत महाराष्ट्राचे ६ प्रशासकीय आहे .
 • सर्वात जास्त जिल्हे असणारा प्रशासकीय विभाग – औरंगाबाद 
 • सर्वाधिक लोकसंख्या असणारा प्रशासकीय विभाग – कोकण
 • सर्वात जास्त तालुके असणारा प्रशासकीय विभाग – औरंगाबाद
 • सर्वात कमी तालुके असणारा प्रशासकीय विभाग – कोकण

 प्रादेशिक विभाग : 

 • कोकण (मुंबई) ०७ जिल्हे ५० तालुके .
 • पश्चिम महाराष्ट्र (पुणे) ०७ जिल्हे ८७ तालुके .
 • खानदेश (जळगाव) ०३ जिल्हे २५ तालुके .
 • मराठवाडा (औरंगाबाद) ०८ जिल्हे ७६ तालुके .
 • विदर्भ (नागपूर) ११ जिल्हे १२० तालुके .

 

Be the first to comment

आपली प्रतिक्रिया नोंदवा