दिनविशेष :२१ ऑक्टोबर (भारतीय पोलीस स्मृती दिन)

२१ ऑक्टोबर  : जन्म

१८३३: स्वीडीश संशोधक आणि नोबेल पुरस्कारांचे प्रणेते अल्फ्रेड नोबेल यांचा जन्म.

१८८७: भारतीय वकील आणि राजकारणी कृष्णा सिंह यांचा जन्म.

१९१७: गायक व संगीतकार राम फाटक यांचा जन्म.

१९२०: धर्मभास्कर गं. ना. कोपरकर यांचा जन्म.

१९३१: हिन्दी चित्रपट अभिनेते व निर्माते शम्मी कपूर यांचा जन्म.

१९४९: इस्त्रायलचे ९ वे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांचा जन्म.

२१ ऑक्टोबर : मृत्यू

१४२२: फ्रान्सचा राजा चार्ल्स (सहावा) यांचे निधन.

१८३५: तामिळ कवी व संगीतकार मुथुस्वामी दीक्षीतार यांचे निधन.

१९८१: ज्ञानपीठ पारितोषिक विजेते कन्नड कवी दत्तात्रय रामचंद्र बेन्द्रे यांचे निधन.

१९९०: भारतीय तत्त्ववेत्ता आणि लेखक प्रभात रंजन सरकार यांचे निधन.

१९९५: अमेरिकन ज्योतिषी व लेखिका लिंडा गुडमन यांचे निधन.

२०१०: भारतीय कवी आणि अनुवादक अ. अय्यप्पन यांचे निधन.

२०१२: चित्रपट दिग्दर्शक, पटकथालेखक आणि निर्माते यश चोप्रा यांचे निधन.

२१ ऑक्टोबर  : महत्वाच्या घटना

१८५४: फ्लोरेन्स नायटिंगेल आणि इतर ३८ नर्सेसना क्रिमीयन युद्धात वैद्यकीय सेवेसाठी पाठवण्यात आले.

१८७९: थॉमस एडीस यांनी दिव्यांच्या प्रकाशाच्या डिझाइनसाठी पेटंट दाखल केले.

१८८८: स्वीस सोशल डेमोक्रेटिक पार्टी सुरु झाली.

१९३४: जयप्रकाश नारायण यांनी काँग्रेस सोशालिस्ट पार्टी ची स्थापना केली.

१९४३: सिंगापूर येथे आझाद हिन्द सेनेची स्थापना.

१९४३: सुभाष चंद्र बोस यांनी स्वतंत्र भारत सरकारची औपचारिक घोषणा केली.

१९४५: फ्रान्समधे स्त्रियांना मतदानाचा अधिकार मिळाला.

१९५१: डॉ. शामाप्रसाद मुकर्जी यांनी दिल्ली येथे भारतीय जनसंघ या पक्षाची स्थापना केली.

१९८३: प्रकाशाने निर्वातात १/२९९७९२४५८ सेकंदात कापलेले अंतर अशी १ मीटरची व्याख्या ठरवली गेली.

१९८७: भारतीय शांतिसेनेने (IPKF) जाफनातील एका रुग्णालयावर केलेल्या हल्ल्यात ७० तामिळ ठार झाले.

१९८९: जनरल अरुणकुमार वैद्य यांचे मारेकरी सुखदेवसिंग आणि हरविंदरसिंग यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली.

१९९२: अकराव्या ताश्कंद आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात अभिनेत्री अपर्णा सेन यांना महापृथ्वी या बंगाली चित्रपटातील भूमिकेबद्दल सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला.

१९९९: चित्रपट निर्माते बी. आर. चोप्रा यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर.

२००२: मुंबई पोलिसांनी सलमान खान विरुद्ध वांद्रे दंडाधिकारी कोर्टात आरोपपत्र दाखल केले.

 

 

 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज- MPSCExam’s

अपडेट राहण्यासाठी आम्हाला इंस्टाग्राम  वर फॉलो करा : @mpscexam07

आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा :

 

Be the first to comment

आपली प्रतिक्रिया नोंदवा