दिनविशेष :३ ऑक्टोबर

३ ऑक्टोबर : जन्म

१९०३: हैदराबाद संस्थानातील स्वातंत्र्य चळवळीचे नेते, समाजसुधारक आणि शिक्षण तज्ञ स्वामी रामानंद तीर्थ यांचा जन्म.

१९०७: निबंध, लघुकथा, कादंबरी, कविता आदी साहित्यप्रकार हाताळणारे लेखक नरहर शेषराव पोहनेरकर यांचा जन्म.

१९१४: टीकाकार म. वा. धोंड यांचा जन्म.

१९१९: नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन अर्थतज्ञ जेम्स बुकॅनन यांचा जन्म.

१९२१: ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू रे लिंडवॉल यांचा जन्म.

१९४७: सबवे रेस्टॉरंट चे सहसंस्थापक फ्रेड डेलुका यांचा जन्म.

१९४९: चित्रपट दिग्दर्शक जे. पी. दत्ता यांचा जन्म.

३ ऑक्टोबर : मृत्यू

१८६७: शिवणयंत्राचे संशोधक एलियास होवे यांचे निधन.

१८९१: फ्रेन्च गणिती एडवर्ड लूकास यांचे निधन.

१९५९: विनोदी लेखक, विडंबनकार व स्तंभलेखक दत्तात्रय तुकाराम तथा दत्तू बांदेकर ऊर्फ सख्याहरी यांचे निधन.

१९९५: भारतीय लेखक व राजकारणी मा. पो. सी. यांचे निधन.

१९९९: सोनी कार्पोरेशनचे संस्थापक अकिओ मोरिटा यांचे निधन.

२००७: सलमान खान आणि त्याचा बॉडीगार्ड यांच्या विरुद्ध एफआयआर नोंदविणारे रवींद्र पाटील यांचे टी. बी. रोगामुळे निधन.

२००७: भारतीय पत्रकार, लेखक, आणि शैक्षणिक एम. एन. विजयन यांचे निधन.

२०१२: सिक्कीमचे राज्यपाल, दिल्लीचे महापौर केदारनाथ सहानी यांचे निधन.

२०१२: भारतीय धर्मशास्त्रज्ञ आणि विद्वानअब्दुल हक अन्सारी यांचे निधन.

३ ऑक्टोबर : महत्वाच्या घटना

१६७०: शिवाजी महाराजांनी दुसर्‍यांदा सुरत लुटली.

१७७८: ब्रिटिश दर्यावर्दी कॅप्टन जेम्स कूक अलास्का येथे पोहोचले.

१९३२: इराकला युनायटेड किंग्डमपासुन स्वातंत्र्य मिळाले.

१९३५: जनरल डी. बोनोच्या नेतृत्त्वाखाली इटलीने इथिओपिया पादाक्रांत केले.

१९५२: युनायटेड किंग्डमने यशस्वीरित्या अण्वस्त्र शस्त्रांची चाचणी करून जगातील तिसरे परमाणु ऊर्जा सशस्त्र राष्ट्र बनले.

१९९०: पूर्व जर्मनी व पश्चिम जर्मनीचे एकत्रीकरण झाले.

१९९५: ओ.जे. सिम्पसनची आपल्या भूतपूर्व पत्‍नी निकोल सिम्पसन व तिचा मित्र रोनाल्ड गोल्डमनच्या खूनाच्या आरोपातून सुटका.

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज- MPSCExam’s

अपडेट राहण्यासाठी आम्हाला इंस्टाग्राम वर फॉलो करा : @mpscexam07

आमचे टेलीग्राम चॅनल जॉईन करा :

Be the first to comment

आपली प्रतिक्रिया नोंदवा