दिनविशेष :६ ऑक्टोबर

६ ऑक्टोबर : जन्म

१७७९: स्कॉटिश मुत्सद्दी, हिन्दुस्थानातील मुंबई प्रांताचे गवर्नर माऊंट स्ट्युअर्ट एल्फिस्टन यांचा जन्म.

१८६६: रेडिओटेलेफोनी चे संस्थोधक रेगिनाल्ड फेसेनडेन यांचा जन्म.

१८९३: खगोल भौतिकशास्त्रज्ञ व संसद सदस्य मेघनाद साहा यांचा जन्म.

१९१२: अणूरसायन शास्त्रज्ञ, प्राध्यापक डॉ. हरी जीवन तथा एच. जे. अर्णीकर यांचा जन्म.

१९१३: कवी केशवसुत पारितोषिक विजेते कवी वामन रामराव तथा वा. रा. कांत यांचा जन्म.

१९१४: नॉर्वेजियन दर्यावर्दी व संशोधक थोर हेअरडल यांचा जन्म.

१९३०: ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू व समालोचक रिची बेनो यांचा जन्म.

१९४३: संत साहित्याचे गाढे अभ्यासक, साक्षेपी समीक्षक व संशोधक डॉ. रत्‍नाकर मंचरकर यांचा जन्म.

१९४६: अभिनेते, चित्रपट निर्माते व खासदार विनोद खन्ना यांचा जन्म.

१९४६: इंग्लिश क्रिकेटपटू व समालोचक टोनी ग्रेग यांचा जन्म.

१९७२: संगीतकार सलील कुलकर्णी यांचा जन्म.

६ ऑक्टोबर: मृत्यू

१६६१: शिखांचे ७ वे गुरू गुरू हर राय यांचे निधन.

१८९२: इंग्लिश कवी लॉर्ड टेनिसन यांचे निधन.

१९५१: केलॉग्ज चे मालक विल केलॉग यांचे निधन.

१९७४: भारताचे संरक्षणमंत्री व्ही. के. कृष्ण मेनन यांचे निधन.

१९७९: इतिहासकार, लेखक, वक्ते आणि पुणे विद्यापीठाचे कुलगुरू, टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू, पद्मविभूषण महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार यांचे निधन.

१९८१: इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष व नोबेल पारितोषिक विजेते अन्वर सादात यांचे निधन.

२००७: महाराष्ट्राचे ९ वे मुख्यमंत्री बाबासाहेब भोसले यांचे निधन.

२००७: लोकसभा सदस्य, कायदेपंडित, विद्वान, मुत्सद्दी व भारताचे इंग्लंडमधील राजदूत एल. एम. सिंघवी यांचे निधन.

२०१५: हंगेरी देशाचे पहिले अध्यक्ष अरपॅड गॉन्कझ यांचे निधन.

६ ऑक्टोबर: महत्वाच्या घटना

१९०८: ऑस्ट्रियाने बोस्‍निया व हेर्झेगोविना हे प्रांत बळकावले.

१९२७: वॉर्नर ब्रदर्स चा जॅझ सिंगर हा जगातील पहिला बोलपट अमेरिकेत प्रदर्शित झाला.

१९४९: पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते खडकवासला येथे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या (NDA) इमारतीची कोनशिला बसवण्यात आली.

१९६३: पुणे आकाशवाणी केंद्राचे सांगली हे उपकेंद्र सुरू झाले.

१९७३: इजिप्त व सीरीयाने मिळुन इस्त्राएलवर हल्‍ला केला.

१९८१: इजिप्तचे अध्यक्ष अन्वर सादत यांची हत्या.

१९८७: फिजी प्रजासताक बनले.

२००७: जेसन लुइस याने वल्ह्याच्या होडीतुन पृथ्वीप्रदक्षिणा पूर्ण केली.

 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज- MPSCExam’s

अपडेट राहण्यासाठी आम्हाला इंस्टाग्राम  वर फॉलो करा : @mpscexam07

आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा :

 

Be the first to comment

आपली प्रतिक्रिया नोंदवा