व्यक्तीविशेष : रँग्लर परांजपे ऊर्फ रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे

रँग्लर परांजपे ऊर्फ रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे यांच्या जयंती निमित्त त्यांच्या जीवनावर प्रकाश टाकणारा हा लेख !

 

रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे ऊर्फ रँग्लर परांजपे

               रघुनाथ परांजप्यांचा जन्म फेब्रुवारी १६, इ.स. १८७६ रोजी महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील मुर्डी या गावी झाला. ते पुरुषोत्तम आणि गोपिका याचे पुत्र होय. ते गोपाळ कृष्ण गोखले यांचे शिष्य होते. इ.स. १८९४ साली पुणे येथील फर्ग्युसन महाविद्यालयातून परांजपे यांनी बी.एससी. पदवी प्राप्त केली. तत्कालीन हिंदुस्थान सरकारची शिष्यवृत्ती घेऊन परांजपे इंग्लंडच्या केंब्रिज विद्यापीठ क्षेत्रातील सेंट जॉन्स महाविद्यालयात दाखल झाले. तेथे त्यांनी गणित विषयातील सगळ्यात कठीण ‘ट्रायपॉस’ परीक्षा दिली आणि ते त्या परीक्षेत प्रथम आले. यात प्रथम क्रमांक पटकावणाऱ्याला सीनियर रँग्लर असे म्हणतात.

              इ.स. १९०२ ते इ.स. १९२७ या काळात रँग्लर परांजपे पुणे येथील फर्ग्युसन महाविद्यालयाचे प्राचार्य होते. तसेच ते मुंबई विद्यापीठाचे सदस्य, पुणे नगर प्रशासनाचे सदस्यही होते. इ.स. १९२१ साली तत्कालीन मुंबई सरकारने रँग्लर परांजपे यांची दिवाण म्हणून नियुक्ती केली. पुढे सरकारने त्यांना शिक्षण आणि आरोग्य खात्याचे मंत्री केले. इ.स. १९२७ साली लंडनच्या इंडिया हाऊसचे कामकाज रँग्लर परांजपे यांच्याकडे सोपविण्यात आले. लखनौ विद्यापीठाचे कुलगुरू पद रँग्लर परांजपे यांनी ६ वर्षे भूषविले. त्यानंतर ऑस्ट्रेलियातल्या भारतीय वकिलातीत उच्चायुक्त म्हणून इ.स. १९४४ साली त्यांची नियुक्ती करण्यात आली. इ.स. १९५६ साली रँग्लर परांजपे पुणे विद्यापीठाचे कुलगुरू होते.

 रँग्लर परांजपे अंधश्रद्धेचे विरोधक म्हणून ओळखले जातात. देवावर त्यांची श्रद्धा नव्हती, ते स्वतःला नास्तिक म्हणवून घेत.

            इ.स. १९६५ साली एटीफोर नॉट आऊट नावाचे त्यांचे आत्मचरित्र प्रसिद्ध झाले. वयाच्या ९१ व्या वर्षी मे ६, इ.स. १९६६ रोजी वृद्धापकाळाने रँग्लर परांजपे यांचे पुण्यात निधन झाले.

गणितातील प्रगल्भ बुद्धिमत्तेचा आदर्श म्हणून रँग्लर परांजपे यांचे तैलचित्र, फर्ग्युसन कॉलेजच्या गणित विभागात अजूनही ठेवलेले आढळते.


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

READ  व्यक्तीविशेष : प्रा. अर्जुन देव

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Join Us on Telegram

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

Be the first to comment

आपली प्रतिक्रिया नोंदवा