दिनविशेष :२ जुलै – जागतिक युएफओ (UFO) दिन

184

2 जुलै   : जन्म

१८६२: नोबेल पारितोषिक विजेते इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ विल्यम हेन्री ब्रॅग यांचा जन्म.

१८७७: नोबेल पारितोषिक विजेते जर्मन लेखक हेर्मान हेस यांचा जन्म.

१८८०: श्रेष्ठ गायक, नेट गणेश गोविंद बोडस उर्फ गणपतराव बोडस यांचा शेवगाव, अहमदनगर येथे जन्म. (मृत्यू: २३ डिसेंबर १९६५)

१९०४: फ्रेंच लॉन टेनिस खेळाडू आणि पोलो टी शर्टचे जनक रेने लॅकॉस्ता यांचा जन्म. (मृत्यू: १२ ऑक्टोबर १९९६)

१९०६: नोबल पुरस्कार विजेते अमेरिकन भौतिकीतज्ञ बेटे हान्स आल्ब्रेख्ट यांचा जन्म.

१९२२: फ्रेन्च फॅशन डिझायनर पिअर कार्डिन यांचा जन्म.

१९२३: लोकमत चे संस्थापक, संपादक, माजी मंत्री व स्वातंत्र्य सेनानी जवाहरलालजी दर्डा यांचा जन्म.

१९२५: काँगोचे पहिले पंतप्रधान पॅट्रिक लुमूंबा यांचा जन्म. (मृत्यू: १७ जानेवारी १९६१)

१९२६: विनोदी लेखक वि. आ. तथा विनायक आदिनाथ बुवा यांचा जन्म.

१९३०: अर्जेंटिनाचे ५० वे राष्ट्राध्यक्ष कार्लोस मेनेम यांचा जन्म.

 

 २ जुलै  : मृत्यू

१५६६: जगप्रसिद्ध फ्रेंच भविष्यवेत्ता नाॅस्टाॅडॅमस यांचे निधन. (जन्म: १४ डिसेंबर १५०३)

१७७८: फ्रेंच विचारवंत, लेखक आणि संगीतकार रुसो यांचे निधन. (जन्म: २८ जून १७१२)

१८४३: होमिओपाथी या वैद्यकीय उपचारपद्धतीचे जनक डॉ. सॅम्यूअल हानेमान याचं निधन. (जन्म: १० एप्रिल १७५५)

१९५०: समाजवादी नेते, स्वातंत्र्यसैनिक युसूफ मेहेर अली यांचे निधन. (जन्म: २३ सप्टेंबर १९०३)

१९६१: नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन लेखकअर्नेस्ट हेमिंग्वे यांचे निधन. (जन्म: २१ जुलै १८९९)

१९९९: अमेरिकन लेखक मारिओ पुझो यांचे निधन. (जन्म: १५ ऑक्टोबर १९२०)

२००७: क्रिकेटपटू दिलीप सरदेसाई यांचे निधन. (जन्म: ८ ऑगस्ट १९४०)

२०११: कम्युनिस्ट नेते चतुरनन मिश्रा यांचे निधन. (जन्म: ७ एप्रिल १९२५)

२०१३: कॉम्पुटर माउस चे शोधक डगलस एंगलबर्ट यांचे निधन. (जन्म: ३० जानेवारी १९२५)

 

२ जुलै   : महत्वाच्या घटना

१६९८: थॉमस सावेरी यांनी पहिले स्टीम इंजिन चे पेटंट मिळवले.

१८५०: बेंजामिन लेन या शास्त्रज्ञाला गॅस मास्कचे पेटंट मिळाले.

१८६५: साल्व्हेशन आर्मी या सेवाभावी संस्थेची स्थापना झाली.

१९४०: नेताजी सुभाषचंद्र बोस यांना कलकत्ता येथे स्थानबद्ध करण्यात आले.

१९६२: रॉजर्स, आरकॅन्सास येथे पहिले वॉल मार्ट स्टोअर उघडले.

१९७२: पंतप्रधान इंदिरा गांधी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान झुल्फिकार अली भुट्टो यांनी सिमला करारावर स्वाक्षऱ्या केल्या.

१९८३: कल्पक्कम,तामिळनाडू येथील अणुऊर्जा केंद्र सुरू झाले.

१९९४: चित्रकार जगदीश स्वामिनाथन यांची मध्य प्रदेश सरकारच्या कालिदास सन्मानासाठी निवड करण्यात आली.

२००१: बिहारमधील चंपारण्य जिल्ह्यातील केसरिया गाव येथे १०४ फूट उंचीचा जगातील मोठा बौध्द स्तूप सापडला.

२००२: स्टीव फॉसेट हा उष्ण हवेच्या फुग्याद्वारे पृथ्वी प्रदक्षिणा करणारा सर्वप्रथम व्यक्ती झाला.

निमित्त हार्दिक शुभेच्छा !!!

 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Join Us on Telegram

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

 

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम