Browsing Category
मराठी व्याकरण नोट्स
मराठीतील सर्व म्हणी
मराठीतील सर्व म्हणी
अर्थ
1
अगं अगं म्हशी मला कोठे नेशी
स्वत:ची चूक मान्य करण्याऐवजी त्यासाठी इतरांवर दोष ठेवणे.
2
आपला हात जगन्नाथ
आपली प्रगती आपल्या कर्तृत्वावर अवलंबून असते.…
काळ व त्याचे प्रकार
वाक्यात दिलेल्या क्रियापदावरून जसा क्रियेचा बोध होतो, तसेच ती क्रिया कोणत्या वेळी घडत आहे याचाही बोध होतो त्याला ‘काळ’ असे म्हणतात.काळाचे प्रमुख 3 प्रकार पडतात.
वर्तमान काळ
भूतकाळ
भविष्यकाळ
1)…
समूहदर्शक शब्द
समूह
शब्द
आंब्याच्या झाडाची
आमराई
उतारुंची
झुंबड
उपकरणांचा
संच
उंटांचा, लमानांचा
तांडा
केसांचा
पुंजका, झुबका
करवंदाची
जाळी
केळ्यांचा…
विभक्ती व त्याचे प्रकार
नामे व सर्वनामे यांचा वाक्यातील क्रियापदाशी किंवा इतर शब्दांशी येणारे संबंध ज्या विकारांनी दाखविले जातात त्या विकारांना ‘विभक्ती’ असे म्हणतात.
वाक्य पृथक्करण व त्याचे प्रकार
पृथक म्हणजे वेगळे किंवा सुटे करणे असा होतो आणि वाक्यपृथक्करण म्हणजे वाक्यातील भाग वेगळा करून दाखविणे.
वाक्य व वाक्याचे प्रकार
प्रत्येक वाक्य शब्दाचे बनलेले असते. वाक्य म्हणजे अर्थपूर्ण शब्दाचा समूह होय. वाक्यात केवळ शब्दाची रचना करून चालत नाहीत तर, ती अर्थपूर्ण शब्दाची रचना असावयास पाहिजे तेव्हाच ते वाक्य होऊ शकते.
विरामचिन्हे व त्याचे प्रकार
आपण संभाषण करतांना/बोलतांना थांबतो म्हणजेच विराम घेतो आणि तो चिन्हांनी दर्शविला जातो त्या चिन्हांना विरामचिन्हे असे म्हणतात.
उभयान्वयी अव्यय व त्याचे प्रकार
दोन किंवा अधिक शब्द, अथवा दोन किंवा अधिक वाक्ये जोडणार्या अविकारी शब्दाला अभयान्वयी अव्यये असे म्हणतात
प्रयोग व त्याचे प्रकार
वाक्यातील कर्ता, कर्म, व क्रियापद यांच्या परस्पर संबंधाला प्रयोग असे म्हणतात.
मराठीत प्रयोगाचे तीन प्रकार पडतात.
कर्तरी प्रयोग
कर्मणी प्रयोग
भावे प्रयोग
1. कर्तरी प्रयोग (Active Voice) :
जेव्हा क्रियापदाचे रूप हे…
केवल प्रयोगी अव्यय व त्याचे प्रकार
केवल प्रयोगी अव्यय
आपल्या मनातील दु:ख, आश्चर्य इत्यादी भावना व्यक्त करणार्या शब्दांना केवलप्रयोगी अव्यय किंवा उद्गारवाची शब्द असे म्हणतात.
हर्षदर्शक : अहाहा, वाहवा, वा, अहा, वा-वा, ओ-हो
उदा. अहाहा! किती सुंदर दृश्य आहे.…
शब्दयोगी अव्यय व त्याचे प्रकार
शब्दयोगी अव्यय :
वाक्यामधील जे शब्द स्वतंत्र न येता नामासोबत जोडून येतात आणि या दोन्ही शब्दामिळून तयार होणारा संयुक्त शब्द त्याच वाक्यामधील इतर शब्दांशी असलेला संबंध दर्शवितो. या जोडून येणार्या शब्दांना शब्दयोगी अव्यये असे…
क्रियापद व त्याचे प्रकार
वाक्यामधील क्रिया दर्शविणार्या ज्या विकारी शब्दामुळे वाक्यातील क्रिया दर्शविली जाते व त्या वाक्याचा अर्थ पूर्ण होतो. वाक्यातील अशा क्रियावाचक शब्दाला क्रियापद असे म्हणतात.
उदा.
गाय दूध देते.
आम्ही परमेश्र्वराची…
क्रियाविशेषण अव्यय व त्याचे प्रकार
क्रियापदाची विशेष माहिती सांगून क्रियापदाची व्याप्ती मर्यादित करणार्या शब्दाला क्रियाविशेषण असे म्हणतात. ज्याप्रमाणे विशेषण हे नामाबद्दलची विशेष माहिती देते, त्याचप्रमाणे क्रियाविशेषण हे क्रियापदाबद्दल विशेष…
सर्वनाम व त्याचे प्रकार
सर्वनाम :
वाक्यातील नामाचा वारंवार होणारा उच्चार टाळावा म्हणून नामाच्या ऐवजी येणार्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात.
सर्वनामाचे मुख्य प्रकार सहा आहेत.
पुरुषवाचक सर्वनाम
दर्शक सर्वनाम
संबंधी…
नाम व नामाचे प्रकार
प्रत्यक्षात असणार्या किंवा कल्पनेने जाणवलेल्या वस्तूंना किंवा त्यांच्या गुणधर्मांना दिलेल्या नावाला ‘नाम’ असे म्हणतात.
शब्दांच्या शक्ती व त्याचे प्रकार (अभिधा/लक्षणा/व्यंजना)
प्रत्येक शब्दामध्ये अपला अर्थ प्रकट करण्याची अंगभूत शक्ती असते त्यांना शब्दांच्या शक्ती असे म्हणतात.
संधी व त्याचे प्रकार
जोडाक्षरे:
ज्या अक्षरात दोन किंवा अधिक व्यंजने प्रथम एकत्र येवून शेवटी त्यात एक स्वर मिसळतो यास ‘जोडाक्षर’ म्हणतात.
उदा.
विद्यालय
: धा : द + य + आ
पश्चिम : श्चि : श + च + इ…
मराठी वर्णमाला व वर्णाचे प्रकार
तोंडावाटे निघणार्या मूलध्वनीला वर्ण असे म्हणतात. बोलतांना आपले मूलध्वनी हवेत विरू नयेत म्हणून आपण लिहून ठेवतो. ज्या सांकेतिक खुणांनी आपण मूलध्वनी लिहून ठेवतो त्या संकेतिक खुणेला ध्वनीचिन्हे किंवा अक्षर असे म्हणतात.
मराठी पारिभाषिक शब्द
पारिभाषिक शब्द
विशिष्ट ज्ञान शाखेच्या संदर्भात खास अर्थाने वापरलेल्या शब्दास ‘पारिभाषिक शब्द’ असे म्हणतात.