दिनविशेष : ४ फेब्रुवारी [जागतिक कर्करोग दिन]
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
४ फेब्रुवारी : जन्म
- १८९३: मराठी कोशकार आणि लेखक चिंतामण गणेश कर्वे यांचा जन्म. (मृत्यू: १६ डिसेंबर १९६०)
- १९०२: धाडसी अमेरिकन वैमानिक चार्ल्स ऑगस्टस लिंडबर्ग यांचा जन्म. (मृत्यू: २६ ऑगस्ट १९७४)
- १९१७: पाकिस्तानचे ३ रे राष्ट्राध्यक्ष जनरल ह्याह्याखान यांचा जन्म. (मृत्यू: १० ऑगस्ट १९८०)
- १९२२: शास्त्रीय गायक स्वरभास्कर पण्डित भीमसेन जोशी यांचा जन्म. (मृत्यू: २४ जानेवारी २०११)
- १९३८: लखनौ घराण्याचे कथ्थक नर्तक व गुरू पं. बिरजू महाराज यांचा जन्म.
- १९७४: चित्रपट अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांचा जन्म.
४ फेब्रुवारी : मृत्यू
- १६७०: नरवीर तानाजी मालुसरे यांचे निधन.
- १८९४: सॅक्सोफोन या वाद्याचे जनक अॅडोल्फ सॅक्स यांचे निधन. (जन्म: ६ नोव्हेंबर १८१४)
- १९७४: भारतीय भौतिकशास्त्रज्ञ सत्येंद्रनाथ बोस यांचे निधन. (जन्म: १ जानेवारी १८९४)
- २००१: क्रिकेटपटू, पद्मश्री पुरस्काराने सन्मानित पंकज रॉय यांचे निधन. (जन्म: ३१ मे १९२८)
- २००२: चित्रपट अभिनेते व दिग्दर्शक भगवान आबाजी पालव ऊर्फ मास्टर भगवान यांचे निधन. (जन्म: १ ऑगस्ट १९१३)
४ फेब्रुवारी : महत्वाच्या घटना
- १६७०: ज्याच्या मृत्युमुळे शिवाजी महाराजांनी गड आला पण सिंह गेला असे उदगार काढले, त्या तानाजी मालुसरे यांचा सिंहगडावर मृत्यू.
- १७८९: अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष म्हणून जॉर्ज वॉशिंग्टन यांची एकमताने नेमणूक करण्यात आली.
- १९२२: चौरी चौरा येथे झालेल्या हिंसक आंदोलनानंतर महात्मा गांधींनी ३ दिवस उपोषण करुन असहकार आंदोलन मागे घेतले.
- १९३६: कृत्रिमरित्या तयार करण्यात आलेले रेडिअम हे पहिले किरणोत्सारी मूलद्रव्य बनले.
- १९४४: चलो दिल्ली चा नारा देत आझाद हिन्द सेनेचे दिल्लीकडे कूच.
- १९४८: श्रीलंका देशाला स्वातंत्र्य मिळाले.
- १९६१: आंतरराष्ट्रीय कीर्तीचे निष्णात डॉक्टर आणि आधुनिक बंगालचे शिल्पकार डॉ. बिधनचंद्र रॉय यांना भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान.
- २००३: युगोस्लाव्हियाचे सर्बिया अँड मोंटेनिग्रो असे नामकरण करण्यात आले आणि नवी राज्यघटना अस्तित्त्वात आली.
- २००४: मार्क झुकरबर्गने फेसबुकची स्थापना केली.
जागतिक कर्करोग दिननिमित्त हार्दिक शुभेच्छा !!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे टेलीग्राम चॅनल जॉईन करा Join Us on Telegram
ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे WhatsApp चॅनल जॉईन करा. Join Us on WhatsApp
अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज Join Us on Facebook
आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.
Table of Contents