दिनविशेष : ४ जुलै

130

 ४ जुलै   : जन्म

१७९०: भारताचे सर्वेक्षण करणारे कर्नल सर जॉर्ज एव्हरेस्ट यांचा जन्म. (मृत्यू: १ डिसेंबर १८६६)

१८०७: इटालियन सेनापती व राजकीय नेता जुसेप्पे गॅरीबाल्डी यांचा जन्म. (मृत्यू: २ जून १८८२)

१८७२: अमेरिकेचे ३०वे राष्ट्राध्यक्ष काल्व्हिन कुलिज यांचा जन्म. (मृत्यू: ५ जानेवारी १९३३)

१८८२: एकेडेमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सचे स्थापक लुईस बी. मेयर यांचा जन्म. (मृत्यू: २९ ऑक्टोबर १९५७)

१८९८: भारताचे दुसरे पंतप्रधान गुलझारीलाल नंदा यांचा जन्म. (मृत्यू: १५ जानेवारी १९९८)

१८९७: भारतीय कार्यकर्ते अलारी सीताराम राजू यांचा जन्म. (मृत्यू: ७ मे १९२४)

१९१२: जयपूर-अत्रौली घराण्याचे गायक पं. निवृत्तीबुवा सरनाईक यांचा जन्म. (मृत्यू: १६ फेब्रुवारी १९९४)

१९१४: जनकवी भावगीत लेखक पी. सावळाराम यांचा जन्म. (मृत्यू: २१ डिसेंबर १९९७)

१९२६: विनोदी साहित्यिक विनायक आदिनाथ तथा वि. आ. बुवा यांचा जन्म. (मृत्यू: १७ एप्रिल २०११)

१९७६: जपानी मोटरसायकल रेसर दाइजिरो कातो यांचा जन्म. (मृत्यू: २० एप्रिल २००३)

१९८३: भारतीय-इंग्लिश पत्रकार अमोल राजन यांचा जन्म.

 

४ जुलै   : मृत्यू

१७२९: मराठा आरमारप्रमुख (सेना सरखेल) कान्होजी आंग्रे यांचे निधन.

१८२६: अमेरिकेचे दुसरे राष्ट्राध्यक्ष जॉन अ‍ॅडॅम्स यांचे निधन. (जन्म: ३० ऑक्टोबर १७३५)

१८३१: अमेरिकेचे पाचवे राष्ट्राध्यक्ष जेम्स मोन्रो यांचे निधन. (जन्म: २८ एप्रिल १७५८)

१९०२: भारतीय तत्त्वज्ञानाचा जगभर प्रसार करणारे रामकृष्ण परमहंस यांचे शिष्य स्वामी विवेकानंद यांचे निधन. (जन्म: १२ जानेवारी १८६३)

१९३४: नोबेल पारितोषिक विजेत्या पोलिश-फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञ मेरी क्युरी यांचे निधन. (जन्म: ७ ऑक्टोबर १८६७)

१९६३: भारतीय तिरंग्याचे रचनाकार पिंगाली वेंकय्या यांचे निधन. (जन्म: २ ऑगस्ट १८७६)

१९८०: रसाळ लेखन करणारे कादंबरीकार रघुनाथ वामन दिघे यांचे निधन. (जन्म: २४ एप्रिल १८९६)

१९८२: भक्तिप्रधान, पौराणिक चित्रपटांचे गीतकार भरत व्यास यांचे निधन.

१९९९: विनोदसम्राट, कलागौरव पुरस्कार, चित्रभूषण पुरस्कार व बालगंधर्व पुरस्काराने सन्मानित वसंत शिंदे यांचे निधन. (जन्म: १४ मे १९०९)

 

४ जुलै   : महत्वाच्या घटना

१०५४: वृषभ राशीत क्रॅब नेब्यूला दिसत असल्याचे चिनी लोकांना समजले. नंतर जॉन बेव्हिसने इ. स. १७३१ मधे त्याचे निरीक्षण केल्याची नोंद आहे.

१७७६: अमेरिकेने स्वत:ला इंग्लंडपासून स्वतंत्र्य घोषित केले.

१८२६: अमेरिकेच्या स्वातंत्र्य दिनाच्या सुवर्णमहोत्सवाच्या दिवशी अमेरिकेचे तिसरे राष्ट्राध्यक्ष थॉमस जेफरसन आणि दुसरे राष्ट्राध्यक्ष जॉन अ‍ॅडॅम्स यांचे निधन झाले.

१८८६: फ्रांसने अमेरिकेला स्टॅच्यू ऑफ लिबर्टी हे भेट दिले.

१९०३: मोटर रेस स्पर्धे मध्ये भाग घेणारी डॉरोथी लेव्हिट ही पहिली इंग्लिश महिला ठरली.

१९११: स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या एकांतवासास प्रारंभ झाला.

१९३६: अमरज्योती हा प्रभातचा चित्रपट मुंबईत प्रदर्शित झाला.

१९४६: फिलिपाइन्सला अमेरिकेपासून स्वातंत्र्य मिळाले.

१९४७: भारत पाकिस्तान असे दोन स्वतंत्र देश निर्माण करावेत असा ठराव ब्रिटनच्या संसदेत मांडण्यात आला.

१९९५: टाटा मूलभूत संशोधन संस्थेच्या (TIFR) जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोपचे (GMRT) संचालक डॉ. गोविंद स्वरूप यांना एम. पी. बिर्ला पुरस्कार प्रदान केला.

१९९७: नासाचे पाथफाइंडर हे मानवविरहित यान मंगळावर उतरले.

१९९९: लष्कराच्या १८व्या बटालियनने कारगिलमधील द्रासमधील टायगर हिल्स हा महत्त्वाचा टापू घुसखोरांच्या ताब्यातून मुक्त केला.

 

निमित्त हार्दिक शुभेच्छा !!!

 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Join Us on Telegram

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

 

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम