दिनविशेष : ८ जुलै
८ जुलै : जन्म
१७८९: मराठ्यांचा इतिहास लिहिणारा ब्रिटिश अधिकारी ग्रँट डफ यांचा जन्म. (मृत्यू: २३ सप्टेंबर १८५८)
१८३१: कोकाकोला चे निर्माते जॉन पंबरटन यांचा जन्म. (मृत्यू: १६ ऑगस्ट १८८८)
१८३९: रॉकफेलर घराण्यातील पहिला उद्योगपती, स्टँडर्ड ऑईल उद्योगसमूह व अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांतील पहिल्या तेल उद्योगाचा संस्थापक जॉन डेव्हिसन रॉकफेलर यांचा जन्म. (मृत्यू: २३ मे १९३७)
१८८५: ह्यूगो बॉस चे स्थापक ह्यूगो बॉस यांचा जन्म. (मृत्यू: ९ ऑगस्ट १९४८)
१९१४: पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री ज्योती बसू यांचा जन्म. (मृत्यू: १७ जानेवारी २०१०)
१९१६: साहित्य अकादमी पुरस्कार विजेते मराठी लेखक, इतिहासकार गो. नी. दांडेकर यांचा जन्म. (मृत्यू: १ जून १९९८)
१९२२: मार्क्सवादी कम्युनिस्ट नेत्या अहिल्या रांगणेकर यांचा जन्म. (मृत्यू: १९ एप्रिल २००९)
१९४९: आंध्र प्रदेशचे १४ वे मुख्यमंत्री वाय. एस. राजशेखर रेड्डी यांचा जन्म.
१९७२: भारताचे क्रिकेट कर्णधार सौरव गांगुली यांचा जन्म.
८ जुलै : मृत्यू
१६९५: डच गणितज्ञ, खगोलविद आणि पदार्थवैज्ञानिक क्रिस्टियन हायगेन्स यांचे निधन. (जन्म: १४ एप्रिल १६२९)
१८३७: इंग्लंडचा राजा विल्यम (चौथा) यांचे निधन. (जन्म: २१ ऑगस्ट १७६५)
१९६७: ब्रिटिश अभिनेत्री विवियन ली यांचे निधन. (जन्म: ५ नोव्हेंबर १९१३)
१९८४: पद्मश्री विजेते गोमंतकीय कवी ‘बाकीबाब’ उर्फ बाळकृष्ण भगवंत बोरकर यांचे निधन. (जन्म: ३० नोव्हेंबर १९१० )
१९९४: उत्तर कोरियाचे राष्ट्राध्यक्ष किमसुंग २रे यांचे निधन. (जन्म: १५ एप्रिल १९१२)
१९९४: मराठ्यांच्या इतिहासाचे गाढे अभ्यासक गोवा पुराभिलेखचे संचालक डॉ. विठ्ठल त्र्यंबक गुणे यांचे निधन.
२००१: प्रसिद्ध तबला वादक उस्ताद बाबासाहेब मिरजकर याचे निधन.
२००३: संत साहित्याचे अभ्यासक ह. श्री. शेणोलीकर यांचे निधन.
२००६: तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक लेखक प्रा. राजा राव यांचे निधन. (जन्म: ५ नोव्हेंबर १९०८)
२००७: भारताचे ८वे पंतप्रधान चंद्रा शेखर यांचे निधन. (जन्म: १ जुलै १९२७)
२००८: महाराष्ट्र भूषण पुरस्कार लाभणारे आधुनिक महामानव डॉ. नारायण विष्णू तथा नानासाहेब धर्माधिकारी यांचे निधन.
२०१३: भारतीय लेखक सुन्द्री उत्तमचंदानी यांचे निधन. (जन्म: २८ सप्टेंबर १९२४)
८ जुलै : महत्वाच्या घटना
१४९७: वास्को द गामा युरोपातून भारताच्या पहिल्या सफरीवर निघाला.
१८५६: चार्ल्स बर्न यांना मशीनगन चे अमेरिकेतील पेटंट मिळाले.
१८८९: द वॉल स्ट्रीट जर्नलचा पहिला अंक प्रकाशित झाला.
१९१०: स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी ’मोरिया’ या जहाजातुन फ्रान्समधील मार्सेल्सच्या समुद्रात उडी घेतली.
१९३०: किंग जॉर्ज-५वे यांच्या हस्ते लंडनमध्ये इंडिया हाऊसचे उद्घाटन झाले.
१९५८: बर्लिन येथील जागतिक चित्रपट महोत्सवात दो आँखे बारह हाथ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा सन्मान मिळाला.
१९९७: बीजिंग येथील आशियाई महिला वेटलिफ्टिंग स्पर्धेत ४६ किलो गटात भारताच्या एन. कुंजुरानी देवीने रौप्यपदक पटकावले.
२००६: मुख्यनिवडणूक आयुक्त टी. एन. शेषन यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर.
२०११: रुपयाचे नवीन चिन्ह (Rs.) असलेली नाणी चलनात आली.
निमित्त हार्दिक शुभेच्छा !!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे टेलीग्राम चॅनल जॉईन करा Join Us on Telegram
ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे WhatsApp चॅनल जॉईन करा. Join Us on WhatsApp
अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज Join Us on Facebook
आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.
Table of Contents