दिनविशेष : १० एप्रिल

102

१० एप्रिल  : जन्म

१७५५: होमिओपॅथीचे जनक डॉ. सॅम्युअल हानेमान यांचा जन्म. (मृत्यू: २ जुलै १८४३)
१८४३: विविध ज्ञानविस्तार मासिकाचे संपादक रामचंद्र गुंजीकर यांचा जन्म. (मृत्यू: १८ जून १९०१)
१८४७: हंगेरियन-अमेरिकन राजकीय नेते आणि पुलित्झर पुरस्कारांचे प्रवर्तक जोसेफ पुलित्झर यांचा जन्म. (मृत्यू: २९ ऑक्टोबर १९११)
१८८०: वृत्तपत्रकार तसेच उत्तरप्रदेशचे शिक्षणमंत्री सर सी. वाय. चिंतामणी यांचा जन्म. (मृत्यू: १ जुलै १९४१)
१८९४: बिर्ला उद्योगसमूहाचे संस्थापक घनश्यामदास बिर्ला यांचा जन्म. (मृत्यू: ११ जून १९८३)
१८९७: भारतीय लेखापाल आणि राजकारणी प्रफुल्लचंद्र सेन यांचा जन्म. (मृत्यू: २५ सप्टेंबर १९९०)
१९०१: अर्थशास्त्रज्ञ, भारतीय अर्थशास्त्राचे प्रणेते, सहकारी चळवळीचे खंदे समर्थक, पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. धनंजय रामचंद्र तथा द. रा. गाडगीळ यांचा जन्म. (मृत्यू: ३ मे १९७१)
१९०७: नाटककार, चित्रपट दिग्दर्शक आणि पत्रकार मो. ग. रांगणेकर यांचा जन्म. (मृत्यू: १ फेब्रुवारी १९९५)
१९१७: भारतीय राजकारणी जगजितसिंह लयलपुरी यांचा जन्म. (मृत्यू: २७ मे २०१३)
१९२७: भारतीय खगोलशास्त्रज्ञ मनाली कल्लट तथा एम. के. वैणू बाप्पा यांचा जन्म. (मृत्यू: १० ऑगस्ट १९८२)
१९३१: शास्त्रीय गायिका किशोरी आमोणकर यांचा जन्म.
१९५२: भारतीय राजकारणी नारायण राणे यांचा जन्म.
१९७२: स्काईप चे सहसंस्थापक प्रेसिंड कासासुलु यांचा जन्म.
१९७५: भारतीय नर्तक आणि कोरिओग्राफर टेरेंस लुईस यांचा जन्म.

१० एप्रिल : मृत्यू

१३१७: संत गोरा कुंभार समाधिस्थ झाले.
१६७८: रामदास स्वामींची लाडकी कन्या वेणाबाई यांचे निधन.
१८१३: इटालियन गणितज्ञ जोसेफ लाग्रांगे यांचे निधन. (जन्म: २५ जानेवारी १७३६)
१९३१: लेबनॉनमध्ये जन्मलेले अमेरिकन कवी आणि लेखक खलील जिब्रान यांचे निधन. (जन्म: ६ जानेवारी १८८३)
१९३७: ज्ञानकोशकार डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर यांचे निधन. (जन्म: २ फेब्रुवारी १८८४ – रायपूर, मध्य प्रदेश)
१९४९: पुरावनस्पती शास्त्रज्ञ राष्ट्रीय विज्ञान अकादमीचे (National Academy of Sciences) अध्यक्ष बिरबल सहानी यांचे निधन. (जन्म: १४ नोव्हेंबर १८९१ – सहारणपूर, उत्तर प्रदेश)
१९६५: स्वतंत्र भारताचे पहिले कृषिमंत्री डॉ. पंजाबराव देशमुख यांचे निधन. (जन्म: २७ डिसेंबर १८९८)
१९९५: भारताचे ४थे पंतप्रधान मोरारजी देसाई यांचे निधन. (जन्म: २९ फेब्रुवारी १८९६)
२०००: संस्कृत पंडित डॉ. श्रीधर भास्कर तथा दादासाहेब वर्णेकर यांचे निधन. (जन्म: ३१ जुलै १९१८)

१० एप्रिल  : महत्वाच्या घटना

१९१२: इंग्लंडमधील साऊथॅम्प्टन बंदरातून टायटॅनिक जहाजाने पहिल्या आणि शेवटच्या प्रवासाला सुरवात केली.
१९५५: योहान साल्क यांनी सर्वप्रथम पोलिओ लसीची यशस्वी चाचणी केली.
१९७०: पॉल मेकार्टनीने व्यक्तिगत आणि व्यावसायिक कारणास्तव द बीटल्स सोडण्याचे जाहीर केले.


 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Join Us on Telegram

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

 

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम