दिनविशेष : १२ जानेवारी (जागतिक युवा दिन)

1,696

१२ जानेवारी  : जन्म

१५९८: राजमाता जिजाऊ यांचा जन्म. (मृत्यू: १७ जून १६७४)

१८५४: विख्यात गणिती व आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ज्योतिर्विद व्यंकटेश बापूजी केतकर यांचा जन्म. (मृत्यू: ३ ऑगस्ट १९३०)

१८६३: भारतीय तत्त्वज्ञानाची महती जगभर पसरवणारे नरेन्द्रनाथ दत्त उर्फ स्वामी विवेकानंद यांचा जन्म. (मृत्यू: ४ जुलै १९०२)

१८९३: जर्मन नाझी हर्मन गोअरिंग यांचा जन्म. (मृत्यू: १५ ऑक्टोबर १९४६)

१८९९: नोबेल पारितोषिक विजेते स्विस रसायनशास्त्रज्ञ पॉल हर्मन म्युलर यांचा जन्म. (मृत्यू: १२ ऑक्टोबर १९६५ – बेसल, स्वित्झर्लंड)

१९०२: महर्षी न्यायरत्न धोंडीराजशास्त्री विनोद यांचा जन्म. (मृत्यू: १३ जुलै १९६९)

१९०६: भारतीय संस्कुतीकोशाचे संपादक महादेवशास्त्री जोशी यांचा जन्म. (मृत्यू: १२ डिसेंबर १९९२)

१९१७: महर्षी महेश योगी यांचा जन्म. (मृत्यू: ५ फेब्रुवारी २००८)

१९१८: ज्येष्ठ संगीतकार सी. रामचंद्र यांचा जन्म. (मृत्यू: ५ जानेवारी १९८२)

१२ जानेवारी  : मृत्यू

१९४४: लोकमान्य टिळकांचे निकटचे सहकारी, चित्रशाळेचे विश्वस्त वासुदेव गणेश तथा वासुकाका जोशी यांचे निधन. (जन्म: २८ एप्रिल १८५४)

१९६६: स्वातंत्र्यसैनिक, लेखक, वक्ते, राजकीय नेते, केंद्रीय मंत्री आणि पंजाबचे राज्यपाल नरहर विष्णू तथा काकासाहेब गाडगीळ यांचे निधन. (जन्म: १० जानेवारी १८९६)

१९७६: इंग्लिश रहस्यकथालेखिका अ‍ॅगाथा ख्रिस्ती यांचे निधन. (जन्म: १५ सप्टेंबर १८९०)

१९९२: शिवपुत्र सिद्धरामय्या कोमकलीमठ ऊर्फ कुमार गंधर्व यांचे निधन. (जन्म: ८ एप्रिल १९२४)

१९९७: हिंदी चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, लेखक व अभिनेते ओ. पी. रल्हन यांचे निधन.

२००५: ज्येष्ठ हिंदी चित्रपट कलावंत अमरीश पुरी यांचे निधन. (जन्म: २२ जून १९३२ – लाहोर, पंजाब, पाकिस्तान)

१२ जानेवारी: महत्वाच्या घटना

१७०५: सातारा ही मराठा साम्राज्याची राजधानी करण्यात आली.

१९१५: महिलांना मतदानाचा अधिकार देण्याचा प्रस्ताव अमेरिकन संसदेने फेटाळला.

१९३१: सोलापूरचे क्रांतिवीर किसन सारडा, मल्लाप्पा धनशेट्टी व कुरबान हुसेन यांना फाशी देण्यात आली.

१९३६: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची धर्मांतराची त्रिवार घोषणा.

१९९७: सामाजिक कार्यकर्त्या गंगुताई पटवर्धन यांना महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेतर्फे दिला जाणारा पहिला बाया कर्वे पुरस्कार प्रदान.

२००५: राष्ट्रीय ज्ञान आयोगाची स्थापना.

२००६: हज यात्रेत झालेल्या चेंगराचेंगरीत ३६२ यात्रेकरुंचा मृत्यू.

 

 

 

जागतिक युवा दिन निमित्त हार्दिक शुभेच्छा !!! #NationalYouthDay

 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Join Us on Telegram

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

 

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम