दिनविशेष : १६ फेब्रुवारी

349

[irp]

१६ फेब्रुवारी : जन्म

१२२२: जपानमधील निचिरेन बौद्ध पंथाचे स्थापक निचिरेन यांचा जन्म. (मृत्यू: १३ ऑक्टोबर १२८२)
१८२२: बोटांचे ठसे, रंगांधळेपणा आणि स्त्रियांच्या सौंदर्यावर संशोधन करणाऱ्या सर फ्रान्सिस गाल्टन यांचा जन्म.
१८७६: भारतातील पहिले सीनियर रँग्लर आणि फर्ग्युसन महाविद्यालयाचे प्राचार्य रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे यांचा जन्म. (मृत्यू: ६ मे १९६६)
१९०९: मॅकडोनाल्ड चे सहसंस्थास्थापक रिचर्ड मॅकडोनाल्ड यांचा जन्म. (मृत्यू: १४ जुलै १९९८)
१९५४: वेस्ट इंडिजचा क्रिकेटपटू मायकेल होल्डिंग यांचा जन्म.
१९६४: ब्राझीलचा फुटबॉलपटू बेबेटो यांचा जन्म.
१९७८: भारतीय क्रिकेटपटू वासिम जाफर यांचा जन्म.

[irp]

१६ फेब्रुवारी  : मृत्यू

१९४४: भारतीय चित्रपटाचे जनक धुंडिराज गोविंद फाळके उर्फ दादासाहेब फाळके यांचे निधन. (जन्म: ३० एप्रिल १८७० – त्र्यंबकेश्वर, नाशिक, महाराष्ट्र)
१९५६: खगोल भौतिकशास्त्रज्ञ आणि संसद सदस्य मेघनाथ साहा यांचे निधन. (जन्म: ६ ऑक्टोबर १८९३)
१९६८: कृषी शिरोमणी आणि पहिले मराठी साखर कारखानदार नारायणराव सोपानराव बोरावके यांचे निधन. (जन्म: १७ ऑक्टोबर १८९२)
१९९४: जयपूर-अत्रौली घराण्याचे गायक पं. निवृत्तीबुवा सरनाईक यांचे निधन. (जन्म: ४ जुलै१९१२)
१९९६: उद्योगपती, थरमॅक्स उद्योगसमुहाचे संस्थापक आर. डी. आगा यांचे निधन.
२०००: सुप्रसिद्ध ग्रंथालय शास्रज्ञ बेल्लारी शामण्णा केशवान यांचे निधन.
२००१: मराठी चित्रपटांचे नृत्यदिग्दर्शक रंजन साळवी यांचे निधन.

[irp]

१६ फेब्रुवारी  : महत्वाच्या घटना

१६५९: पहिला धनादेश ब्रिटीश बँकेतून काढण्यात आला, तो नँशनल वेस्टमिन्स्टर बँकेत जपून ठेवण्यात आला आहे.
१७०४: औरंगजेबाने राजगड किल्ला जिंकून त्याचे नाव नबिशहागड असे ठेवले.
१९१८: लिथुएनियाने रशिया व जर्मनीपासून स्वातंत्र्य जाहीर केले.
१९५९: फिडेल कॅस्ट्रो क्युबाच्या अध्यक्षपदी रुजू झाले.
१९६०: अमेरिकी अणुपाणबुडी ट्रायटन ने पाण्याखालून पृथ्वी प्रदक्षिणा करण्यास प्रस्थान केले.
१९८५: लेबनॉनमध्ये हिजबोल्ला या कट्टरपंथीय शिया मुस्लीम संघटनेची स्थापना झाली.

[irp]


 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Join Us on Telegram

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

 

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम