दिनविशेष : १६ जानेवारी

239

  १६ जानेवारी : जन्म

१८५३: मिचेलीन टायर्स कंपनी चे संस्थापक फ्रेन्च उद्योगपती आंद्रे मिचेलिन यांचा जन्म. (मृत्यू: ४ एप्रिल १९३१)

१९२०: कायदेपंडित आणि अर्थतज्ञ नानाभॉय अर्देशीर ऊर्फ नानी पालखीवाला यांचा जन्म. (मृत्यू: ११ डिसेंबर २००२)

१९२६: संगीतकार ओंकार प्रसाद तथा ओ. पी. नय्यर यांचा जन्म. (मृत्यू: २८ जानेवारी २००७)

१९४६: चित्रपट अभिनेते कबीर बेदी यांचा जन्म.

१६ जानेवारी : मृत्यू

१९०९: समाजसुधारक, धर्मसुधारक, अर्थशास्त्रज्ञ व न्यायाधीश न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांचे निधन. (जन्म: १८ जानेवारी १८४२)

१९३८: बंगाली साहित्यिक शरदचंद्र चट्टोपाध्याय यांचे निधन. (जन्म: १५ सप्टेंबर १८७६)

१९५४: चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, चित्रकार, शिल्पकार आणि कलामहर्षी बाबूराव पेंटर यांचे निधन. (जन्म: ३ जून १८९०)

१९६६: आध्यात्मिक गुरु व शिक्षणतज्ञ साधू वासवानी यांचे निधन. (जन्म: २५ नोव्हेंबर १८७९)

१९६७: अमेरिकन पदार्थवैज्ञानिक रॉबर्ट व्हॅन डी ग्राफ यांचे निधन. (जन्म: २० डिसेंबर १९०१)

१९८८: आंतरराष्ट्रीय कीर्तीचे अर्थतज्ञ डॉ. लक्ष्मीकांत झा यांचे निधन. (जन्म: २२ नोव्हेंबर १९१३ – भागलपूर, बिहार)

१९९७: कामगार नेते डॉ. दत्ता सामंत यांची गोळ्या घालून हत्या.

२०००: मुरब्बी मुत्सद्दी, परराष्ट्र सचिव, रशिया, अमेरिका व इराणमधील भारताचे राजदूत त्रिलोकीनाथ कौल यांचे निधन.

२००३: सुदर्शन केमिकल्स उद्योगसमुहाचे संस्थापक रामविलास जगन्नाथ राठी यांचे निधन.

२००५: संगीतकार, पेटीवाले मेहेंदळे उर्फ श्रीकृष्ण हरी मेहेंदळे यांचे निधन.

१६ जानेवारी : महत्वाच्या घटना

१६६०: रुस्तुम झमान आणि फाजल खान हे आदिलशहाचे सेनापती शिवाजी महाराजांवर चालुन आले आणि पराभूत होऊन परत गेले.

१६६६: नेताजी पालकर वेळेवर न आल्याने पन्हाळगड जिंकण्याचा शिवाजीराजांचा डाव फसला.

१६८१: छत्रपती संभाजी राजे यांचा छत्रपती म्हणून राज्याभिषेक झाला.

१९०५: लॉर्ड कर्झनने बंगालची फाळणी केली, तेव्हा वायभंगाच्या चळवळीत देशभक्तानी वंदे मातरम् चा जल्लोष केला.

१९१९: अमेरिकेच्या संविधानात १८ वा बदल करण्यात आला आणि संपूर्ण देशात दारूबंदी लागू करण्यात आली.

१९२०: अमेरिकेचे अध्यक्ष वूड्रो विल्सन यांच्या १४ कलमी कार्यक्रमानुसार स्थापन झालेल्या राष्ट्रसंघाची (League of Nations) पहिली बैठक झाली.

१९४१: नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे देशाबाहेर प्रयाण.

१९५५: पुणे येथील नॅशनल डिफेन्स अकॅडमीच्या इमारतीचे (तात्कालीन) मुंबई राज्याचे मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांच्या हस्ते उद्घाटन.

१९७८: रु. १,००० आणि अधिक किमतीच्या नोटा चलनातून रद्द.

१९७९: शहा ऑफ इराण यांनी कुटुंबासह इजिप्तमध्ये पलायन केले.

१९९५: आयएनएस विद्युत या संपूर्ण देशी बनावटीच्या क्षेपणास्त्र नौकेचे गोवा येथे जलावतरण झाले.

१९९६: पुण्याचे शिल्पकार दिनकर शंकरराव थोपटे यांची ललित कला अकादमीच्या पुरस्कारासाठी निवड.

१९९८: ऊर्दू लेखक व कवी अली सरदार जाफरी यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर.

२००८: टाटा मोटर्सच्या नॅनो या एक लाख रुपये किंमतीच्या पीपल्स कारचे अनावरण.

 

 

 

 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Join Us on Telegram

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

 

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम