दिनविशेष : १९ एप्रिल

144

दिनविशेष

१९ एप्रिल : जन्म

१८६८: रोटरी क्लबचे संस्थापक पॉल हॅरिस यांचा जन्म. (मृत्यू: २७ जानेवारी १९४७)
१८९२: शिक्षणतज्ज्ञ ताराबाई मोडक यांचा जन्म. (मृत्यू: ३१ ऑगस्ट १९७३)
१९१२: नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ ग्लेन सीबोर्ग यांचा जन्म. (मृत्यू: २५ फेब्रुवारी १९९९)
१९३३: ख्यातनाम क्रिकेट पंच डिकी बर्ड यांचा जन्म.
१९५७: भारतीय उद्योगपती मुकेश अंबानी यांचा जन्म.
१९७७: भारतीय लाँग जम्पर अंजू बॉबी जॉर्ज यांचा जन्म.
१९८७: रशियन लॉनटेनिस खेळाडू मारिया शारापोव्हा यांचा जन्म.

 

१९ एप्रिल : मृत्यू

१८८१: इंग्लंडचे पंतप्रधान बेंजामिन डिझरेली यांचे निधन. (जन्म: २१ डिसेंबर १८०४)
१८८२: ब्रिटिश जीवशास्त्रज्ञ चार्ल्स डार्विन यांचे निधन. (जन्म: १२ फेब्रुवारी १८०९)
१९०६: नोबेल पारितोषिक विजेते फ्रेन्च भौतिकशास्त्रज्ञ पिअर क्यूरी यांचे निधन. (जन्म: १५ मे १८५९)
१९१०: क्रांतिकारक अनंत कान्हेरे यांचे निधन.
१९५५: ब्रिटिश-भारतीय वन्यजीव तज्ज्ञ आणि लेखक जिम कॉर्बेट यांचे निधन. (जन्म: २५ जुलै १८७५)
१९७४: फील्ड मार्शल आणि पाकिस्तानचे दुसरे राष्ट्राध्यक्ष आयुब खान यांचे निधन. (जन्म: १४ मे १९०७)
१९९३: स्वातंत्र्यसैनिक डॉ. उत्तमराव पाटील यांचे निधन.
१९९४: पंजाबचे माजी मंत्री मेजर जनरल राजिंदरसिंग उर्फ स्पॅरो यांचे निधन.
१९९८: उद्योजीका सौ. विमलाबाई गरवारे यांचे निधन. (जन्म: १८ डिसेंबर १९२८)
२००३: भारतीय-इंग्रजी खलीफा मिर्जा ताहिर अहमद यांचे निधन. (जन्म: १२ ऑगस्ट १९२५)
२००४: गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड चे सहसंस्थापक नॉरिस मॅक्विहिर यांचे निधन.
२००८: लेखिका, संतसाहित्याच्या अभ्यासिका व राजकारणी सरोजिनी बाबर यांचे निधन. (जन्म: ७ जानेवारी १९२०)
२००९: मार्क्सवादी कम्युनिस्ट नेत्या अहिल्या रांगणेकर यांचे निधन. (जन्म: ८ जुलै १९२२)
२०१०: लेखक आणि टीकाकार मंगेश विठ्ठल राजाध्यक्ष यांचे निधन. (जन्म: ७ जून १९१३)

 

१९ एप्रिल : महत्वाच्या घटना

१५२६: मोगल साम्राज्याचा संस्थापक बाबर यांचा मोगलसत्तेचा पाया घातला.
१९४५: सोविएत रशिया आणि ग्वाटेमालामधे राजनैतिक संबंध प्रस्थापित झाले.
१९४८: ब्रह्मदेशचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश.
१९५६: गीतरामायणातील शेवटचे गाणे पुणे आकाशवाणीवरुन प्रसारित झाले.
१९७१: सिएरा लिओन प्रजासत्ताक बनले.
१९७५: आर्यभट्ट हा भारताचा पहिला उपग्रह रशियन अंतराळस्थानकावरून प्रक्षेपित करण्यात आला.

 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Join Us on Telegram

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

 

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम