दिनविशेष : १९ जून जागतिक सांत्वन दिन
१९ जून : जन्म
१५९५: सहावे सिख गुरु गुरु हर गोविंद यांचा जन्म. (मृत्यू: ३ मार्च १६४४)
१६२३: फ्रेंच गणितज्ञ तत्त्वज्ञानी ब्लेस पास्कल यांचा जन्म. (मृत्यू: १९ ऑगस्ट १६६२)
१७६४: उरुग्वेचा राष्ट्रपिता जोसेगेर्व्हासियो आर्तिगास यांचा जन्म.
१८७७: पुण्याच्या कृषी महाविद्यालयाचे पहिले प्राचार्य पांडुरंग चिमणाजी पाटील यांचा जन्म.
१९४१: चेकोस्लोव्हाकियाचा राष्ट्राध्यक्ष वाक्लाव क्लाउस यांचा जन्म.
१९४५: म्यानमारची राजकारणी ऑँगसान सू की यांचा जन्म.
१९४७: ब्रिटिश लेखक सलमान रश्दी यांचा जन्म.
१९७०: भारतीय राजकारणी राहुल गांधी यांचा जन्म.
१९७६: फोरस्क्वेअरचे सह-संस्थापक डेनिस क्रॉवले यांचा जन्म.
१९ जून : मृत्यू
१७४७: पर्शियाचा सम्राट नादिर शहा यांचे निधन. (जन्म: २२ ऑक्टोबर १६९८)
१८७७: शतायुषी कृषिशास्त्रज्ञ डॉ.पांडुरंग चिमाजी पाटील-थोरात यांचे निधन.
१९३२: मराठी संतवाङमयाचे अभ्यासक आणि प्रचारक रेव्ह. जस्टिन एडवर्ड यांचे निधन.
१९४९: भारतीय तत्त्वज्ञ सैयद जफरुल हसन यांचे निधन. (जन्म: १४ फेब्रुवारी १८८५)
१९५६: अमेरिकन उद्योगपती, आय. बी. एम. (IBM) चे अध्यक्ष थॉमस वॉटसन यांचे निधन. (जन्म: १७ फेब्रुवारी १८७४)
१९९३: नोबेल पारितोषिक विजेते इंग्लिश लेखक विल्यम गोल्डिंग यांचे निधन. (जन्म: १९ सप्टेंबर १९११)
१९९६: समाजसेविका कमलाबाई पाध्ये यांचे निधन.
१९९८: प्रवासवर्णनकार, कथाकार आणि विनोदी लेखक रमेशमंत्री यांचे निधन. (जन्म: ६ जानेवारी १९२५)
२०००: मराठी- हिंदी रंगभूमी चित्रपट अभिनेत्री माणिक मुदलियार तथा माणिक कदम यांचे निधन.
२००८: बंगाली पत्रकार बरुण सेनगुप्ता यांचे निधन. (जन्म: २३ जानेवारी १९३४)
१९ जून : महत्वाच्या घटना
१६७६: शिवाजी महाराजांनी प्श्चात्त्पादग्ध सरनोबत नेताजी पालकर यांना विधीपूर्वक शुद्ध करून हिंदू धर्मात पुन्हा समाविष्ट केले.
१८६२: अमेरिकेने गुलामगिरीची प्रथा बेकायदा जाहीर केली.
१८६५: अमेरिकेतील गॅल्व्हेस्टन येथील गुलामांना मुक्ती. हा दिवस येथपासून जून्टीन्थ या नावाने साजरा केला जातो.
१९१२: अमेरिकेत कामगारांसाठी ८ तासांचा दिवस निश्चित करण्यात आला.
१९४९: चार्लोट मोटर स्पीडवे येथे पहिल्यांदा नासकारची स्पर्धा आयोजित केली गेली.
१९६१: कुवेतला इंग्लंडकडून स्वातंत्र्य मिळाले.
१९६६: शिवसेनेची स्थापना.
१९७७: ट्रान्स अलास्कन पाइपलाइन मधुन आर्क्टिक प्रदेशातुन तेलवाहतुक सुरू झाली.
१९७८: ईंग्लंडच्या इयान बोथम याने पाकिस्तान विरुद्ध लॉर्डसवर ८ बळी घेऊन शतक सुधा केले.
१९७८: गारफील्डया कार्टून व्यक्तिमत्त्वाचे वर्तमानपत्रात पदार्पण.
१९८१: भारताच्या ‘अॅपल’ उपग्रहाचे प्रक्षेपण.
१९८९: ई. एस. वेंकटरामय्या यांनी भारताचे १९ वे सरन्यायाधीश म्हणून कार्यभार सांभाळला.
१९९९: मैत्रेयी एक्स्प्रेस या कोलकाता ते ढाका बस सेवेचे पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी उद्घाटन केले.
निमित्त हार्दिक शुभेच्छा !!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे टेलीग्राम चॅनल जॉईन करा Join Us on Telegram
ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे WhatsApp चॅनल जॉईन करा. Join Us on WhatsApp
अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज Join Us on Facebook
आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.
Table of Contents