One Liners : एका ओळीत सारांश, 21 एप्रिल 2020
एका ओळीत सारांश, 21 एप्रिल 2020
दिनविशेष
- जागतिक कल्पकता व नवसंशोधन दिन – 21 एप्रिल.
- राष्ट्रीय नागरी सेवा दिन – 21 एप्रिल.
- जागतिक कल्पकता व नवसंशोधन आठवडा – 15 एप्रिल ते 21 एप्रिल.
संरक्षण
- 22 ते 23 एप्रिल या काळात नियोजित असलेली देशातली ही सर्वोच्च लष्करी परिषद कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर अनिश्चित काळासाठी रद्द करण्यात आली आहे – युनिफाइड कमांडर्स कॉन्फरन्स (UCC).
अर्थव्यवस्था
- भारतातील पहिली खासगी बँक जीने आपल्या ग्राहकांसाठी ‘व्हॉईस असिस्टन्स’ आधारित बँकिंग सेवा सुरू केली – ICICI बँक.
पर्यावरण
- गेल्या दोन दशकांमध्ये प्रथमच, या देशाच्या समुद्रकिनारी दुर्मिळ लेदरबॅक समुद्री कासवांनी सर्वाधिक घरटे (11 घरटे) बांधली आहेत – थायलंड (फुकेत आणि फांग नगाच्या आसपासचे क्षेत्र).
आंतरराष्ट्रीय
- 20 एप्रिल रोजी भारताने या देशाच्या हुमासिस लिमिटेड या कंपनीसोबत करार केला, ज्यामार्फत भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेला पाच लक्ष कोविड-19 टेस्ट किट पुरवण्यात येणार – दक्षिण कोरिया.
राष्ट्रीय
- कोविड-19 लस विकसित करण्याकडे लक्ष देण्यासाठी नेमलेल्या उच्चस्तरीय कृती दलासाठी केंद्रीय समन्वय संस्था – जैवतंत्रज्ञान विभाग.
- स्वयं घोषित कोरोना मुक्त राज्य – गोवा, मणीपूर.
- या राज्यांमधल्या कोविड-19 महामारीच्या परिस्थितीचे जागेवरच आकलन करण्यासाठी केंद्र सरकारने सहा आंतर-मंत्रिमंडळस्तरीय गटांची स्थापना केली आहे – राजस्थान, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल आणि मध्यप्रदेश.
- महामारीचा सामना करण्यासाठी आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने महत्वपूर्ण मनुष्यबळाची माहिती या ऑनलाईन व्यासपीठावर उपलब्ध करून दिली – कोविड वॉरियर्स.
- जियोटॅग प्राप्त सामुदायिक स्वयंपाकगृहे असणारे देशातले पहिले राज्य – उत्तरप्रदेश.
व्यक्ती विशेष
- राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यासाठी नवनियुक्त सचिव – कपिल देव त्रिपाठी.
राज्य विशेष
- बंदीच्या दरम्यान, या राज्य सरकारने विद्यार्थ्यांना शाळापर्यंत पोहचविण्याच्या उद्देशाने ‘संपर्क दीदी’ नावाचे मोबाइल अॅप तयार केले – उत्तराखंड.
- या राज्य सरकारने CET आणि NEET 2020 या परीक्षेची तयारी करण्यात राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी “GetCETGo” नावाने एक विनामूल्य ऑनलाईन क्रॅश कोर्स सुरू केला – कर्नाटक.
ज्ञान-विज्ञान
- या संस्थेतील शास्त्रज्ञांनी फिश गिलमधून एक कार्यक्षम, कमी किमतीची इलेक्ट्रो-कॅटेलिस्ट प्रणाली विकसित केली आहे जी पर्यावरण अनुकूल ऊर्जा परिवर्तनाची साधने विकसित करण्यास मदत करू शकते – इंस्टीट्यूट ऑफ नॅनो सायन्स अँड टेक्नॉलॉजी, मोहाली.
सामान्य ज्ञान
- सर्व शिक्षण अभियानाचा आरंभ – वर्ष 2000-2001.
- शिक्षणाचा हक्क कायदा (RTE), 2009 या दिवशी लागू झाला – 1 एप्रिल 2010.
- 2018 साली या नावाने राष्ट्रीय माध्यमिक शिक्षण अभियानासह सर्व शिक्षा अभियान आरंभ करण्यात आले – समग्र शिक्षा अभियान.
- आयुर्वेद, योग व निसर्गोपचार, युनानी, सिद्ध आणि होमिओपॅथी (आयुष) मंत्रालयाची स्थापना – वर्ष 1995.
- राष्ट्रीय साक्षरता अभियान (NLM) हा भारत सरकारने या साली सुरू केलेला देशव्यापी कार्यक्रम आहे – वर्ष 1988.
- वर्ष 1952-57 या कालावधीत भारताचे पहिले वित्त आयोग नेमले गेले होते आणि अध्यक्षस्थानी ही व्यक्ती होती – के. सी. नेओगी.
- अखिल भारतीय नागरी सेवा – भारतीय प्रशासकीय सेवा (IAS), भारतीय वन सेवा (IFoS) आणि भारतीय पोलीस सेवा (IPS).
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे टेलीग्राम चॅनल जॉईन करा Join Us on Telegram
ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे WhatsApp चॅनल जॉईन करा. Join Us on WhatsApp
अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज Join Us on Facebook
आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.
Table of Contents