One Liners : एका ओळीत सारांश, 24 एप्रिल 2020

118

एका ओळीत सारांश, 24 एप्रिल 2020

Admin

दिनविशेष

  • माहिती व दळणवळण तंत्रज्ञान क्षेत्रात मुलींचा सहभाग विषयक आंतरराष्ट्रीय दिन (23 एप्रिल 2020) – एप्रिल महिन्याचा चौथा गुरुवार.
  • जागतिक प्रयोगशाळ प्राणी दिन – 24 एप्रिल.
  • राष्ट्रीय पंचायती राज दिन (राष्ट्रीय स्थानिक स्वराज्य दिन) – 24 एप्रिल.

संरक्षण

  • हा देश येत्या काही महिन्यांत जहाज-रोधी M-22 टिसिरकॉन किंवा झिरकॉन मॅच 9 हायपरसॉनिक क्षेपणास्त्राची चाचणी घेणार – रशिया.

अर्थव्यवस्था

  • भारतीय रिझर्व्ह बँकेकडून मिळालेल्या इतक्या निधीसह SIDBI यांनी कोविड-19 महामारीमुळे प्रभावित झालेल्या सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगांसाठी (MSME) लिक्विडिटी समर्थन योजना सादर केली – 15 हजार कोटी रुपये.

आंतरराष्ट्रीय

  • 23 एप्रिल 2020 रोजी या देशाने व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमाने दक्षिण आशियाई प्रादेशिक सहकार्य संघाची (SAARC) बैठक आयोजित केली – पाकिस्तान.
  • हा देश जगातले पहिले डिजिटल चलन (डिजिटल युआन) सादर करणार – चीन.

राष्ट्रीय

  • कोविड-19 महामारीमुळे प्रभावित झालेल्या दरिद्री लोकांचे संरक्षण करण्यासाठी सरकारने या योजनेच्या अंतर्गत 33 कोटीहून अधिक लाभार्थ्यांना 31,235 कोटी रुपयांची आर्थिक मदत दिली – प्रधानमंत्री गरीब कल्याण निधी.
  • DRDOच्या या प्रयोगशाळेनी एक मोबाइल व्हायरलॉजी रिसर्च अँड डायग्नोस्टिक्स लॅबोरेटरी विकसित केली – रिसर्च सेंटर इमारत, हैदराबाद.

व्यक्ती विशेष

  • ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, आशियातली सर्वात श्रीमंत व्यक्ती – मुकेश अंबानी (3.2 अब्ज डॉलर).

सामान्य ज्ञान

  • पीपल फॉर द एथीकल ट्रीटमेंट ऑफ अॅनिमल्स (PETA) – स्थापना: 22 मार्च 1980; संस्थापक: इंग्रीड न्यूकिर्क आणि अ‍ॅलेक्स पाचेको; ठिकाण: नॉरफोक, व्हर्जिनिया, अमेरिका.
  • या साली घटनात्मक दुरुस्तीद्वारे पंचायती राज व्यवस्था सादर केली गेली – वर्ष 1992.
  • 2 ऑक्टोबर 1959 रोजी पंचायत राज प्रणाली प्रथम राजस्थान राज्यातल्या या जिल्ह्यात स्वीकारली गेली – नागौर.
  • रशिया – राजधानी: मॉस्को; राष्ट्रीय चलन: रशियन रूबल.
  • भारतीय लघु-उद्योग विकास बँक (SIDBI) – स्थापना: 02 एप्रिल 1990; मुख्यालय: लखनऊ, उत्तरप्रदेश.
  • दक्षिण आशियाई प्रादेशिक सहकार्य संघ (SAARC) – स्थापना: 08 डिसेंबर 1985; मुख्यालय: काठमांडू, नेपाळ.
  • SAARCचे सदस्य – अफगाणिस्तान, बांग्लादेश, भुटान, भारत, मालदीव, नेपाळ, पाकिस्तान आणि श्रीलंका.
  • सीमा रस्ते संघटना (BRO) – स्थापना: 07 मे 1960; मुख्यालय: नवी दिल्ली; संस्थापक: जवाहरलाल नेहरू.

 


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Click Here : MPSC मराठी व्याकरण

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम