दिनविशेष : २४ एप्रिल – भारतीय पंचायती राज दिन

दिनविशेष

२४ एप्रिल  : जन्म

१८८९: इंग्लिश राजकारणी सर स्टॅफोर्ड क्रिप्स यांचा जन्म. (मृत्यू: २१ एप्रिल १९५२)
१८९६: रसाळ लेखन करणारे कादंबरीकार रघुनाथ वामन दिघे यांचा जन्म. (मृत्यू: ४ जुलै १९८०)
१९१०: चित्रपट दिग्दर्शक, निर्माते आणि अभिनेते राजा परांजपे यांचा जन्म. (मृत्यू: ९ फेब्रुवारी १९७९)
१९२९: कन्नड चित्रपट अभिनेता व गायक राजकुमार यांचा जन्म. (मृत्यू: १२ एप्रिल २००६)
१९४२: अमेरिकन अभिनेत्री, गायिका, चित्रपट निर्माती व दिग्दर्शिका बार्बारा स्ट्रायसँड यांचा जन्म.
१९७०: ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू डॅमियन फ्लेमिंग यांचा जन्म.
१९७३: भारतीय क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांचा जन्म.

 

२४ एप्रिल  : मृत्यू

१९४२: नाट्यसंगीत, गायक आणि अभिनेते मास्टर दीनानाथ मंगेशकर यांचे निधन. (जन्म: २९ डिसेंबर १९००)
१९६०: नामवंत वकील लक्ष्मण बळवंत तथा अण्णासाहेब भोपटकर यांचे निधन.
१९७२: चित्रकार जामिनी रॉय यांचे निधन. (जन्म: ११ एप्रिल १८८७)
१९७४: देशभक्त तसेच हिंदी साहित्यिक रामधारी सिंह दिनकर यांचे निधन. (जन्म: २३ सप्टेंबर १९०८)
१९९४: उद्योगपती, किर्लोस्कर उद्योग समूहाचे आधारस्तंभ शंतनुराव किर्लोस्कर यांचे निधन. (जन्म: २८ मे १९०३)
१९९९: चित्रपट कला दिग्दर्शक सुधेंदू रॉय यांचे निधन.
२०११: आध्यात्मिक गुरू सत्य साईबाबा यांचे निधन. (जन्म: २३ नोव्हेंबर १९२६)
२०१४: भारतीय राजकारणी शोभा नेगी रेड्डी यांचे निधन. (जन्म: १६ नोव्हेंबर १९६८)

 

२४ एप्रिल  : महत्वाच्या घटना

१६७४: भोर-वाई प्रांतातील केंजळगड शिवाजी महाराजांनी स्वारी करून जिंकला.
१७१७: खंडेराव दाभाडे यांनी अहमदनगर येथे मोगलांचा पराभव केला.
१८००: जगातील सर्वोत्तम ग्रंथालय लायब्ररी ऑफ काँग्रेसची अमेरिकेत सुरवात.
१९६७: वेळेवर पॅराशूट न उघडल्यामुळे व्लादिमीर कोमारोव्ह हे मरण पावणारे पहिले अंतराळवीर आहेत.
१९६८: मॉरिशस देशाचा संयुक्त राष्ट्रांचा (United Nations) प्रवेश.
१९७०: गाम्बिया देश प्रजासत्ताक बनले.
१९९०: अंतराळात हबल ही दुर्बीण सोडण्यात आली.
१९९३: इंडियन एअरलाइन्सच्या फ्लाइट ४२७ या दिल्लीहून श्रीनगरला जाणाऱ्या विमानाचे अतिरेक्यांनी अपहरण केले. सर्व १४१ प्रवाशांची सुखरूप मुक्तता झाली.
२०१३: ढाका, बांगलादेश मध्ये इमारत कोसळून ११२९ जणांचा बळी गेला आणि २५०० जण जखमी झाले.

READ  दिनविशेष : २९ मे – जागतिक पचन स्वास्थ्य दिन

 

 

२४ एप्रिल – भारतीय पंचायती राज दिन निमित्त हार्दिक शुभेच्छा !!!

 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Join Us on Telegram

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

 

Be the first to comment

आपली प्रतिक्रिया नोंदवा