One Liners : एका ओळीत सारांश, 26 एप्रिल 2020

एका ओळीत सारांश, 26 एप्रिल 2020

दिनविशेष

 • प्रथम, आंतरराष्ट्रीय प्रतिनिधी दिन – 25 एप्रिल 2020.
 • 2020 सालासाठी जागतिक बौद्धिक संपदा दिनाची (26 एप्रिल) संकल्पना  – इनोव्हेट फॉर ग्रीन फ्युचर”.

आंतरराष्ट्रीय

 • संयुक्त राष्ट्रसंघ व्यापार व विकास परिषद (UNCTAD) या संस्थेनी कोविड-19 महामारीच्या पार्श्वभूमीवर विकसनशील देशांकडून थकलेले इतके कर्ज माफ केले – एक लाख कोटी डॉलर.
 • या संघटनेनी जागतिक भागीदारांच्या गटासहीत कोविड-19 साठी नवीन अत्यावश्यक तंत्रज्ञानाच्या विकासासाठी “अॅक्सेस टू कोविड-19 टूल्स एक्सेलिरेटर” (किंवा ACT एक्सेलिरेटर) कार्यक्रमाची सुरुवात केली – जागतिक आरोग्य संघटना (WHO).

राष्ट्रीय

 • केंद्र सरकारने औद्योगिक तंटा कायद्यातल्या तरतुदींनुसार 21 ऑक्टोबरपर्यंत सहा महिने या उद्योग क्षेत्राला सार्वजनिक उपयुक्तता सेवा म्हणून घोषित केले म्हणजे या क्षेत्रातल्या कर्मचार्‍यांकडून कोणत्याही प्रकारचा संप होणार नाही – बँकिंग उद्योग.
 • ‘टाइम्स हायर एज्युकेशन (THE) इम्पॅक्ट रँकिंग 2020’ याच्या शीर्ष संस्थांच्या यादीमध्ये समाविष्ट झालेले पंजाबमधले एकमेव विद्यापीठ – चित्रकारा विद्यापीठ (59 वा).

व्यक्ती विशेष

 • जागतिक आरोग्य संघटना (WHO) याचे विद्यमान महासंचालक – टेड्रोस एडनॉम गेब्रेयसूस.
 • नवीन केंद्रीय दक्षता आयुक्त – संजय कोठारी.
 • भारतीय वंशाचे अमेरिकावासी, ज्यांची शिक्षण आणि शैक्षणिक नेतृत्व क्षेत्रातल्या योगदानासाठी अमेरिकन अकादमी ऑफ आर्ट्स अँड सायन्स यामध्ये निवड झाली – रेणू खाटोर.

राज्य विशेष

 • या सरकारने स्थानिक पातळीवर उपलब्ध नसलेली औषधे रूग्णांपर्यंत पोहचविण्याकरिता ‘धनवंतरी’ उपक्रम सुरू केला – आसाम.
 • या नदीवरील कालेश्वरम सिंचन प्रकल्पाचा भाग असलेल्या सिद्दीपेट जिल्ह्यातल्या रंगानायक सागर प्रकल्पाचे उद्घाटन तेलंगणाचे मंत्री के. टी. रामा राव यांनी केले – गोदावरी नदी.
 • या राज्य सरकारने 1891 ब्रिटिश-मणीपूरी युद्धाच्या स्मरणार्थ 23 एप्रिल 2020 रोजी खोंगजोम दिन पाळला – मणीपूर.

ज्ञान-विज्ञान

 • या संस्थेच्या शास्त्रज्ञांनी मास्कसाठी हर्बल डिकंन्जेस्टंट स्प्रे विकसित केला आहे जो गुदमरण्यापासून बचाव करू शकतो – CSIR-नॅशनल बोटॅनिकल रिसर्च इन्स्टिट्यूट (NBRI), लखनऊ.
 • “चित्रा मग्न” नावाची एक अभिनव RNA एक्सट्रॅक्शन किट विकसित करणारी संस्था – श्री चित्रा तिरुनल इन्स्टिट्यूट फॉर मेडिकल सायन्सेस अँड टेक्नोलॉजी.

सामान्य ज्ञान

 • जगातला सर्वात मोठा बहुउद्देशीय सिंचन प्रकल्प – कालेश्वरम उपसा सिंचन प्रकल्प.
 • प्राप्तिकर अपील न्यायपीठ याची स्थापना – 25 जानेवारी 1941.
 • जागतिक बौद्धिक संपदा संघटना (WIPO) – स्थापना: 14 जुलै 1967; मुख्यालय: जिनिव्हा, स्वित्झर्लंड.
 • केंद्रीय दक्षता आयोग (CVC) – स्थापना: वर्ष 1964; मुख्यालय: नवी दिल्ली.
 • संयुक्त राष्ट्रसंघ व्यापार व विकास परिषद (UNCTAD) – स्थापना: वर्ष 1964; मुख्यालय: जिनिव्हा, स्वित्झर्लंड.

 


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Click Here : MPSC मराठी व्याकरण

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

READ  One Liners : एका ओळीत सारांश,28 मे 2020

Be the first to comment

आपली प्रतिक्रिया नोंदवा