दिनविशेष : २७ डिसेंबर
२७ डिसेंबर : जन्म
१५७१: जर्मन खगोलशास्त्रज्ञ आणि गणितज्ञ योहान्स केप्लर यांचा जन्म. (मृत्यू: १५ नोव्हेंबर १६३०)
१६५४: स्विस गणितज्ञ जेकब बर्नोली यांचा जन्म. (मृत्यू: १६ ऑगस्ट १७०५)
१७७३: इंग्लंडचे शास्त्रज्ञ, शोधक आणि राजकारणी जॉर्ज केली यांचा जन्म.
१७९७: उर्दू कवी मिर्झा गालिब यांचा आग्रा येथे जन्म. (मृत्यू: १५ फेब्रुवारी १८६९)
१८२२: रेबीज किंवा हैड्रोफोबिया रोगावर लस शोधणारें रसायनशास्त्रज्ञ लुई पाश्चर यांचा जन्म. (मृत्यू: २८ सप्टेंबर १८९५)
१८९८: विदर्भातील सामाजिक नेते, शिक्षण प्रसारक आणि केंद्रीय कृषिमंत्री पंजाबराव देशमुख यांचा जन्म. (मृत्यू: १० एप्रिल १९६५)
१९२७: उत्तराखंडचे पहिले मुख्यमंत्री नित्यानंद स्वामी यांचा जन्म. (मृत्यू: १२ डिसेंबर २०१२)
१९४४: हिन्दी चित्रपट आणि टीव्ही अभिनेता विजय अरोरा यांचा जन्म. (मृत्यू: २ फेब्रुवारी २००७)
१९६५: हिंदी चित्रपट अभिनेता सलमान खान यांचा जन्म.
१९८६: दोन वेळा वर्ल्ड आणि ऑलिम्पिक चॅम्पियन बनणारी जमैका ची धावपटू शैली एन फ्रेजर प्राईस यांचा जन्म.
२७ डिसेंबर : मृत्यू
१९००: ब्रिटीश स्थापत्यशास्त्री विल्यम जॉर्ज आर्मस्ट्रॉंग यांचे निधन.
१९२३: फ्रेंच वास्तुरचनाकार, आयफेल टॉवरचे निर्माते गुस्ताव अलेक्झांद्रे आयफेल यांचे निधन. (जन्म: १५डिसेंबर १८३२)
१९४९: भालकर भोपटकर यांचे निधन.
१९६५: मराठी साहित्यिक, ज्ञानोदयचे संपादक देवदत्त नारायण टिळक यांचे निधन.
१९७२: कॅनडाचे १४ वे पंतप्रधान आणि नोबेल पारितोषिक विजेते लेस्टर बी. पिअर्सन यांचे निधन. (जन्म: २३एप्रिल १८९७)
१९९७: मराठी भावगीत गायिका मालती पांडे-बर्वे यांचे निधन.
२००२: आसामी लोकगीत गायिका प्रतिमा बरुआ-पांडे यांचे निधन.
२००७: पाकिस्तानच्या पंतप्रधान बेनझीर भूट्टो यांची हत्या. (जन्म: २१ जून १९५३)
२०१३: अभिनेता फारुख शेख यांचे निधन.
२७ डिसेंबर : महत्वाच्या घटना
१९११: कॉंग्रेस अधिवेशनात जन गण मन राष्ट्रगीत पहिल्यांदा गायले गेले.
१९१८: बृहद पोलंडमध्ये पोलिश लोकांचे जर्मन सत्तेविरूद्ध बंड पुकारले गेले.
१९४५: २८ देशांनी एकत्रित जागतिक बँक (World Bank) आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (International Monetary Fund) स्थापन केले.
१९४५: कोरिया देशाची फाळणी झाली.
१९४९: इंडोनेशिया देशाला नेदरलँड्स पासून स्वातंत्र्य मिळाले.
१९७५: बिहारमधील (हल्लीचे झारखंड) चासनाला येथे कोळशाच्या खाणीत अचानक पाणी शिरून झालेल्या दुर्घटनेत ३७२ कामगार ठार झाले.
१९७८: ४० वर्षाच्या हुकुमशाहीनंतर स्पेन प्रजासत्ताक बनले.
२००४: मॅग्नेटर एसजीआर १८०६-२० ला स्फोट झाल्यामुळे उत्सर्जित किरण पृथ्वीला पोहोचते.
२००७: पाकिस्तानातील माजी पंतप्रधान बेनझीर भुट्टो यांची गोळी मारून हत्या करण्यात आली.
पंजाबराव देशमुख यांच्या जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा !!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे टेलीग्राम चॅनल जॉईन करा Join Us on Telegram
ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे WhatsApp चॅनल जॉईन करा. Join Us on WhatsApp
अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज Join Us on Facebook
आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.
Table of Contents